ETV Bharat / state

Yeola Water Scarcity : येवल्यात पाणीटंचाई, टँकरची मागणीत प्रचंड मागणी

author img

By

Published : Apr 26, 2022, 4:08 PM IST

नाशिक जिल्ह्यातील येवला तालुक्यातील पूर्व भागात पाणीटंचाई ( Yeola Water Scarcity ) जाणवू लागली असल्याने पाण्याच्या टँकरची मागणी होऊ लागली आहे. या वर्षीही चांगला पाऊस झाला. असूनही उन्हाळा सुरू होताच पाणीटंचाईने डोके वर काढले असून, उत्तर-पूर्व भागात अनेक गावांत टंचाईने पाणी पाणी म्हणण्याची वेळ आली आहे.

Yeola Water Scarcity
येवल्यात पाणीटंचाई

येवला ( नाशिक ) - येवला तालुक्यातील पूर्व भागात पाणीटंचाई ( Yeola Water Scarcity ) जाणवू लागली असल्याने पाण्याच्या टँकरची मागणी होऊ लागली आहे. या वर्षीही चांगला पाऊस झाला. असूनही उन्हाळा सुरू होताच पाणीटंचाईने डोके वर काढले असून, उत्तर-पूर्व भागात अनेक गावांत टंचाईने पाणी पाणी म्हणण्याची वेळ आली आहे. पाणीटंचाई जाणवू लागल्याने पूर्व भागातील 5 गावांनी टँकरने पाणीपुरवठा करण्याच्या मागणीचा प्रस्ताव पंचायत समितीकडे पाठवला आहे.

टँकरची मागणीत प्रचंड मागणी

पाण्याचे टँकर चालू करण्याची मागणी - यावर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असता तरी देखील येवला तालुक्यातील उत्तर - पूर्व भागामध्ये उन्हाळ्यामध्ये पाणीटंचाई भेडसावत असते. अक्षरशः तालुक्यातील ममदापूर भागातील महिलांना एक ते दोन किलोमीटर अंतरावरून पाणी आणण्याची वेळ येत आहे. तर पिण्याच्या पाण्यासाठी देखील म्हणून भटकंती करण्याची वेळ या महिलांवर येत असल्याने त्वरित गावाला पाण्याचा टॅंकर चालू करावे अशी मागणी स्थानिक महिला करीत आहे. उत्तर पूर्व तालुक्यातील गेल्या काही दिवसापासून विहिरींनी तळ गाठला असल्याने अक्षरशा महिलांना पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ येत आहे. पिण्याच्या पाण्याकरता गावात हातपंपावर मोठ्या प्रमाणात गर्दी होत असल्याने या गावांना पिण्याच्या पाण्याचा टँकर चालू करावे अशी मागणी जोर धरू लागली असून पाण्याचे टॅंकर चालू झाले तर महिलांना पिण्याच्या पाण्याकरिता भटकंती करावी लागण्याची वेळ येणार नाहीय.

Yeola Water Scarcity
येवल्यात पाणीटंचाई

5 ग्रामपंचायतीचे पिण्याचे पाण्याचे टँकरचे प्रस्ताव - तालुक्यातील पूर्व भागातील 5 ग्रामपंचायतीचे पिण्याच्या पाण्याचा टँकरचे प्रस्ताव पंचायत समितीकडे आले. पहिला ममदापूर गावाचा प्रस्तावाला जिल्हाधिकारी यांचेकडे मंजुरी करता पाठवला असून बाकीचे प्रस्ताव तहसील कार्यालयाकडे पाठवले असून मंजूर होऊन आल्यानंतर लगेच या गावांना पाण्याचे टँकर चालू करण्यात येईल. अशी माहिती येवला पंचायत समितीचे गटविकास अधिकारी अन्सार शेख यांनी दिली आहे.

Yeola Water Scarcity
येवल्यात पाणीटंचाई

हेही वाचा - Mumbai Police Rana Video : राणा दाम्पत्याला पोलिसांनी चहापाणी दिले; मुंबई पोलीस आयुक्तांकडून व्हिडिओ शेअर

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.