ETV Bharat / state

Rain Affect Farmers : अवकाळी पावसाने आठ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान, जाचक अटीमुळे शेतकरी मदतीपासून वंचित

author img

By

Published : Apr 8, 2023, 7:52 PM IST

Updated : Apr 8, 2023, 7:59 PM IST

नाशिक जिल्ह्यात अवकाळी पावसाने आठ हजार हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झाले आहे. मात्र, अद्याप शेतकऱ्यांना सरकारतर्फे नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालेले आहेत. नाशिकमधील 437 गावातील 21 हजार 750 शेतकऱ्यांचे अवकाळी पावसाने मोठे नुकसान केले आहे. द्राक्षे, कांदा, आंबा या पिकांना मोठ्या प्रमाणात फटका बसला आहे.

Unseasonal Rains
Unseasonal Rains

मनमाड : मागील महिन्यात सलग पाच दिवस मनमाड, मालेगावसह नाशिक जिल्ह्यातील ग्रामीण भागात झालेल्या अवकाळी पाऊस आणि गारपीटीने तब्बल 8 हजार 79 हेक्टरवरील पिकांचे झाले आहे. तर 437 गावातील 21 हजार 750 शेतकऱ्यांना अवकाळीचा फटका बसला आहे. सर्वात जास्त नुकसान कांदा पिकाचे झाले असून 3 हजार 556 हेक्टर वरील पीक उध्वस्त झाले आहे. 1 हजार 595 हेक्टरवरील गहूचे नुकसान झाले असून या पिका सोबत हरभरा, द्राक्षे, आंबा यांना देखील मोठा फटका बसला आहे. पावसाळ्यात अतिवृष्टीमुळे खरीप हंगाम तर, आता अवकाळी, गारपीटमुळे रब्बीचा हंगाम हातातून जात असल्याचे पाहून शेतकरी आर्थिक संकटात सापडला आहे. आता नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या शेतकऱ्यांचे डोळे शासनाच्या मदतीकडे लागले होते. मात्र, शासनाने मदत जाहीर केली त्यात अटी, शर्तीमुळे शेतकऱ्यांना मदत मिळणे शक्य नाही.


कांदा अनुदानसह इतर मदतीला जाचक अटी : राज्य सरकारने कांदा पिकाला 350 रुपये अनुदान जाहीर केले मात्र ज्या शेतकऱ्याच्या ७/१२ उताऱ्यावर कांदा पिकाचा पिकपेरा (नोंद) आहे अशांना मदत मिळणार असल्याची जाचक अट लावली यामुळे अनेकांना या योजनेचा लाभ मिळणार नसल्याने शेतकरी वर्गाने नाराजी व्यक्त केली असुन जेवणाच ताट वाढून ठेवलं मात्र हात बांधून ठेवल्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

पिकनिहाय झालेले नुकसान : कांदा :3556.86 हेक्टर, गहू :1595.72हेक्टर, भाजीपाला : 436.20 हेक्टर, द्राक्षे : 782.67 हेक्टर, आंबा : 1034.30 हेक्टर, डाळिंब : 35 हेक्टर, कांदा रोपे : 510 हेक्टर, टोमॅटो : 14 हेक्टर, हरभरा :75 हेक्टर,

तालुकानिहाय नुकसान : नांदगाव : 2443.10 हेक्टर, पेठ : 1581.76 हेक्टर, निफाड : 1514.50 हेक्टर, कळवण : 832.30 हेक्टर, देवळा : 244.50 हेक्टर, येवला : 501.50 हेक्टर, चांदवड : 505 हेक्टर, दिंडोरी : 42 हेक्टर, नाशिक : 38.60 हेक्टर, त्र्यंबकेश्वर : 40.25 हेक्टर, इगतपुरी : 87 हेक्टर, सिन्नर : 8.50 हेक्टर, एकूण : 8079 हेक्टर पिकांचे अवकाळी पावसाने नुकसान झाले आहे.

हेही वाचा - Unseasonal Rains Affect Farmer : वर्ध्यात अवकाळी पावसाचा हाहाकार; शेतीतील पीके जमिनदोस्त

Last Updated : Apr 8, 2023, 7:59 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.