ETV Bharat / state

Satyajit Tambe : वादळी घडामोडीनंतर वडिलांची माघार! नाशिक पदविधरमधून सत्यजीत तांबे अपक्ष मैदानात

author img

By

Published : Jan 12, 2023, 4:27 PM IST

Updated : Jan 12, 2023, 5:34 PM IST

नाशिक विभाग पदवीधर मतदारसंघातून विधानपरिषदेच्या द्विवार्षिक निवडणुकीसाठी काँग्रेस अध्यक्षांनी डॉ. सुधीर तांबे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांनी अर्ज भरला नाही. त्यांचा मुलगा सत्यजित तांबे यांनी अपक्ष म्हणून अर्ज दाखल केला. त्यानंतर काँग्रेसमध्ये जोरदार घडामोडी समोर आल्या. दरम्यान, आपली उमेदवारी तांबे यांच्या कुटुंबात राहील याची काळजी घेत सत्यजीत तांबे यांना उमेदवारी दिली आहे.

सत्यजीत तांबे
सत्यजीत तांबे

नाशिक - विधान परिषद पदवीधर नाशिक मतदारसंघातून काँग्रेसने मोठी खेळी खेळली. काँग्रेसने विद्यमान आमदार डॉ. सुधीर तांबे यांच्याऐवजी त्यांचे चिरंजीव आणि युवक काँग्रेसचे माजी अध्यक्ष सत्यजीत तांबे यांना उमेदवारी जाहीर केली. परंतु, सत्यजीत तांबे यांना भाजपकडून उमेदवारी मिळणार असल्याची चर्चा होती. मात्र, अर्ज दाखल करताना ऐनवेळी काँग्रेसचे सत्यजीत तांबे यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. काँग्रेसकडून वेळेत एबी फॉर्म न मिळाल्याने सत्यजीत तांबे हे महाविकास आघाडी पुरस्कृत उमेदवार असणार आहेत.

भाजप AB फॉर्म कोणाला याबाबत सस्पेन्स कायम : उमेदवारी अर्ज भरण्यासाठी अखेरचे काही क्षण उरले असताना भाजपचा नाशिक शिक्षक मतदारसंघातील उमेदवार ठरलेला नसल्याने मोठा संभ्रम निर्माण झाला होता. त्यामुळे अखेरच्या क्षणापर्यंत उत्सुकता ताणली गेली. तर, काँग्रेसकडून सुधीर तांबे यांना उमेदवारी अर्ज देण्यात आला होता. त्यांच्यासह त्यांचे चिरंजीव सत्यजित तांबे नाशिकच्या महसूल कार्यालयात अर्ज भरण्यासाठी दाखल झाले होते. त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज दाखल केला. त्याचवेळी वडील सुधीर तांबे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेत मुलाला संधी दिलीआहे. भाजप कोअर कमिटी पदाधिकारीही विभागीय कार्यालयात AB फॉर्म घेऊन दाखल झालेत. मात्र भाजप AB फॉर्म कोणाला याबाबत अद्यापही सस्पेन्स कायम

भाजपकडून चमत्कार होऊ शकतो : नाशिक पदवीधर निवडणूक प्रक्रियेत चमत्कार होऊ शकतो, असं मोठं वक्तव्य महसूल मंत्री राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केले होते. सत्यजित तांबे यांनी भाजपची उमेदवारी केली तर स्वागतच आहे, असं विधानही विखे पाटील यांनी केले होते. भाजपचा उमेदवार कोण यावर अजूनही सस्पेन्स कायम आहे. तर दुसरीकडे राधाकृष्ण विखे पाटील यांचे बंधू राजेंद्र विखे यांच्या नावाचीही उमेदवारीसाठी चर्चा आहे. मात्र राजेंद्र विखेंच्या उमेदवारीबाबत कल्पना नसल्याची माहिती विखे पाटील यांनी दिली.

काँग्रेसला दे धक्का देण्यासाठी भाजपने तयारी : काँग्रेसकडून सुधीर तांबे यांच्या नावाची घोषणा झाली होती. त्यांनी एबी फॉम दिला होता. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांच्याकडून तांबे यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात आले होते. दरम्यान, सत्यजित तांबे भाजपमध्ये जाणार अशी चर्चा होती. त्यामुळे काँग्रेसमध्ये उमदेवारी जाहीर करण्यावर पेच निर्माण झाला होता. तसेच, भाजपकडून जोरदार मोर्चेबांधणी करण्यात आली होती. काँग्रेसला दे धक्का देण्यासाठी भाजपने तयारी केली होती. मात्र, काँग्रेसने जोरदार सूत्र हलवत तांबे यांच्या घरात उमेदवारी राहिल याची अखरच्या क्षणी काळजी घेतली.

सत्यजित तांबे भाजपमध्ये ? : सत्यजित तांबे नाराज होते. ते भाजपमध्ये जाणार अशी चर्चा रंगली होती. दरम्यान, काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे स्वतः तांबे कुटुंबाच्या संपर्कात होते. नाशिकचा विधानपरिषद उमेदवार ठरवण्याची मुभा तांबे कुटुंबाला देण्यात आली होती. सत्यजित तांबे हे भाजपमध्ये जातील अशी चर्चा गेल्या काही दिवसांपासून सुरु आहे. त्यावर काँग्रेसच्या राष्ट्रीय नेतृत्वाने तातडीने पावले उचलल्याचे दिसत आहे. स्वत: राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांनी तांबे कुटुंबाशी चर्चा केली. काँग्रेसच्यावतीने अर्ज कोणी भरावा, सुधीर तांबे की मुलगा सत्यजित तांबेंनी भरावा याची मुभा खरगे यांनी तांबे कुटुंबालाच दिली होती. त्यानुसार अखेरच्या क्षणी वडिलांनी माघार घेत मुलाला संधी दिली आहे.

Last Updated : Jan 12, 2023, 5:34 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.