ETV Bharat / state

Raut's Critics On Opposition:राम, हनुमान आमच्याच पाठिशी खा.राऊत यांचा विरोधकांना टोला

author img

By

Published : Apr 16, 2022, 11:44 AM IST

रामाचे धनुष्यबाण व हनुमानाची गदा आमच्याकडे आहे. कोल्हापुरच्या पोटनिवडणुकीने (Kolhapur by-election) या दैवतांचा आशीर्वाद आमच्या पाठिशी आहे. विरोधकांचा भोंगा जनतेने नाकारला, या शब्दात शिवसेना नेते खा.संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाजप व मनसेला (BJP and MNS ) टोला हाणला.

Sanjay Raut
संजय राऊत

नाशिक:काळारामाचे दर्शन घेण्यापुर्वी खा. राऊत यांनी पत्रकरांना कोल्हापूरच्या मतमोजणीवर प्रतिक्रिया दिली. कोल्हापूर पोटनिवडणुक (Kolhapur by-election) जिंकण्यासाठी या काळात भोंगा हे प्रकरण आणलं गेलं. पण त्यांचा भोंगा वाजला नाही. वाजणार नाही, असा टोला त्यांनी लगावला. तसेच सामना मुखपत्रातील अग्रलेखावरुन मनसेने इशार दिला याबाबत बोलताना त्यांनी 'जाता जाता दिला इशारा' हा चित्रपट पहावा, असा खोचक सल्ला दिला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.