ETV Bharat / state

Look Back 2022 : घात, अपघात, अत्याचार नैसर्गिक आपत्ती, राजकीय उलथापालथ सारख्या घटनांनी नाशिक चर्चेत

author img

By

Published : Dec 23, 2022, 4:52 PM IST

Updated : Jan 1, 2023, 7:26 AM IST

नाशिक जिल्ह्यासाठी 2022 वर्ष (Look Back 2022) घात (Ambush), अपघात (Accidents), बलात्कार (Rape), वाद- विवाद, राजकीय उलथापालथ (Political Upheavals), नैसर्गिक आपत्ती (Natural Disasters) यामुळे चर्चेत राहील. यात बस अपघातात 13 जणांचा होरपळून झालेला मृत्यू, गोदावरी नदीला आलेला पूर, शिंदे सरकारमध्ये नाशिक दिग्गज नेत्यांचा प्रवेश, आध्यत्मिक धर्मगुरूचा मालमत्तासाठी खून ,हनुमानाच्या जन्मस्थळावरून साधू-महंतामध्ये झालेला वाद, स्मार्ट सिटीचा शेअरिंग प्रकल्प गुंडाळला, सहा अल्पवयीन मुलींवर आश्रम संचालकाने केले अत्याचार, 1100 किलो शेंदूर काढल्यानंतर सप्तशृंगी देवीला प्राप्त झालेले मूळ रूप, शिंदे कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांकडून दिलेला चोप, बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरातील पिंडीवर अचानक साचलेला बर्फ यामुळे 2022 वर्षे नाशिककरांसाठी चर्चेत राहिले.

Nashik Review 2022
नाशिक आढावा 2022

  1. बस अपघातात 13 जणांचा होरपळून मृत्यू
    नाशिक-औरंगाबाद महामार्गावर भीषण अपघात झाला. (Nashik Look Back 2022) यवतमाळहून मुंबईकडे जाणारी चिंतामणी ट्रॅव्हल्स कंपनीच्या लक्झरी बसने 7 ऑक्टोबर 2022 शनिवार पहाटे गुजरात होऊन कोळसा वाहून येणाऱ्या ट्रकला धडक (Accidents) दिली. या धडकेत ट्रकची डिझेल टाकी फुटल्याने बसला आग लागून यात 13 प्रवाशांच्या बस मध्येच होरपळून मृत्यू झाला. तर 36 प्रवाशी जखमी झाले होते. (Nashik Crime) पोलिसांनी ट्रक चालका विरोधात गुन्हा दाखल करत संशयित चालक रामजी जगबिर यादव (वय 27 राहणार तारागाव तालुका,हांडीया उत्तर प्रदेश) अटक करण्यात आली. (Latest news from Nashik) या घटनेत बहुतेक मृतदेहाचा कोळसा झाल्याने त्यांची ओळख पटवणे अशक्य झाले होते. अखेर जिल्हा प्रशासनाने या सर्वांची डीएनए चाचणी केल्यानंतर सर्व 13 मृतदेहाची ओळख पटली.या बस मध्ये क्षमतेपेक्षा अधिक प्रवाशी असल्याचे समोर आले.त्यांनतर पोलिसांनी आणि आरटीओ विभागाने नाशिक मध्ये दाखल होणाऱ्या खाजगी ट्रॅव्हल्स बसची तपासणी मोहीम सुरू केली. यात एक हजाराहून अधिक वाहनांची तपासणी करण्यात येऊन अवैध वाहतूक करणाऱ्यांकडून पाच लाखांचा दंड वसूल करण्यात आला.


  2. नाशिक गोदावरी पूर; अनेक मंदिर पाण्याखाली
    नाशिकमध्ये उशिराने मान्सून दाखल झाला,11 ते 16 सप्टेंबर 2022 रोजी पावसाची संततधार सुरु होती,गंगापूर धरणाच्या पाणलोट क्षेत्रातही पावसाने हजेरी लावल्याने गंगापूर धरणातून गोदावरीच्या पात्रात पाण्याचा विसर्ग करण्यात आला होता. या विसर्गामुळे गोदावरीच्या पाणीपातळीत वाढ झाली आणि पुराची ओळख म्हणून समजल्या जाणाऱ्या दुतोंड्या मारुतीच्या छातीपर्यंत सध्या पाणी लागलं. तसेच गोदावरी नदीपात्रा जवळील लहान मोठी मंदिरे देखील पाण्याखाली गेली होती,त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला होता.अशात नाशिक जिल्ह्यात सर्वत्र समाधानकारक पाऊस झाल्याने जिल्ह्यातील सर्व धरण हे शंभर टक्के भरले असल्याने नाशिककरांचा पाणी प्रश्न मात्र मिटला


  3. हनुमंताचे जन्मस्थळ वाद
    किष्किंधा हेच श्री हनुमंताचे जन्मस्थळ असल्याचं स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी दावा केला होता या संदर्भात ते नाशिकला आले होते,हनुमानाचे जन्मस्थळ कर्नाटक मधील किष्किंधा की नाशिक जवळील अंजनेरी हा वाद पुरावा आधारित सोडवण्यासाठी नाशिकला शास्त्रार्थ सभा पार पडली,मात्र या सभेमध्ये आसनव्यवस्था पासून सुरू झालेला वाद बूम उगारणे पर्यंत पोहोचला,अखेर पोलिसांना मध्यस्थी करावी लागली, या सभेमध्ये वाद-प्रतिवाद होऊन दोन्ही पक्षांनी पुराणातील दाखले दिले वाल्मिकी रामायणात उल्लेख असलेल्या दाखले नुसार किष्किंधाहेच श्री हनुमंताचे जन्मस्थळ असल्याचं स्वामी गोविंदानंद सरस्वती यांनी म्हटले आहे. मात्र आता चेन्नईतील सीपीआर एन्व्हायरमेंट एज्युकेशन सेंटरच्या शासकीय वेबसाइट नुसार नाशिकचे अंजनेरी हेच हनुमंताचे जन्मस्थळ असल्याचे दाखले गोदाप्रेमी देवांग जानी यांनी दिले,अशात नाशिकच्या साधू-महंतांनी अंजनेरी हीच हनुमानाचे जन्मस्थळ आहे याचे वेगवेगळे दाखले दिल्या नंतर आणि सभेत गोंधळ उडाल्याने स्वामी गोविंदानंद सरस्वती यांना पोलिसांनी पोलीस बंदोबस्तात नाशिक बाहेर सोडले..


  4. दादा भुसे सह नगरसेवक शिंदे गटात
    एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेत बंडखोरी करत 40 आमदारांना घेऊन भाजप सोबत युती करत महाराष्ट्रात सत्ता स्थापन केली.यात शिवसेनेचे जेष्ठ नेते कृषी मंत्री दादा भुसे देखील शिंदे गटात दाखल झाल्याने शिवसेनेचा बुरुज ढासळला.पक्षनिष्ठा पेक्षा भुसे यांनी मित्रप्रेमाला प्राधान्य देत ते शिंदे गटात सामील झाले,धर्मवीर चित्रपटातून दादा भुसे आणि एकनाथ शिंदे यांची मैत्री सर्वांसमोर आली. ठाणे येथील खासदार राजन विचारे हे भुसे यांचे व्याही आणि एकनाथ शिंदे यांचे तरुणपणाचे मित्र आहेत.यानंतर दादा भुसे यांना मंत्रिमंडळात घेण्यात आलं आणि नाशिकचे पालकमंत्री पद देण्यात आलं.तसेच वर्षाच्या अखेर ठाकरे गटातील 11 माजी नगरसेवक यांच्यासह संपर्कप्रमख,ग्रामीण जिल्हाध्यक्ष शिंदे गटात दाखल झाले


  5. त्र्यंबकेश्वर मंदिरातील पिंडीवर बर्फ जमा
    बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेल्या त्र्यंबकेश्वर महादेव मंदिरातील भगवान शंकरांच्या पिंडीवर बर्फ जमा झाल्याची घटना सोशल मीडियातून झळकली,मात्र पिंडीवर बर्फ जमा होणे ही पूर्णतः नैसर्गिक प्रक्रिया आहे. वातावरणातील तापमानाची घट हे त्यामागील प्रमुख कारण आहे असं अंनिसचे म्हटलं.भारत-चीन युद्धा नंतर 1962 मध्येही अशाच प्रकारे पिंडीवर बर्फ जमा झाल्याची नोंद मंदिराकडे आहे,सामान्यपणे गाभार्‍यातील तापमान आणि बाहेरचे तापमान यामध्ये 12 ते 13 अंशापर्यंत तफावत असते.साहजिकच गाभाऱ्यातील बाष्पयुक्त हवेला थंडावा मिळाल्याने आणि पिंडीचा भाग गुळगुळीत असल्याने तेथे बर्फाचे लहान लहान थर जमा होतात.रात्रीच्या वेळी तापमानात अधिक घट झालेली असते.त्यामुळे पहाटेच्या वेळी बर्फ तयार होण्याचे प्रमाण वाढते .यात कोणताही दैवी चमत्कार किंवा चांगले-वाईट घडण्याचे दैवी संकेत नाहीत. भाविकांनी आणि सामान्य नागरिकांनी अशा नैसर्गिक घटनांना चमत्कार समजू नये. अफवा पसरविणाऱ्यांवर तातडीने कायदेशीर कारवाई करावी,असे अंनिसच्या वतीने आवाहन करण्यात आल होत..


  6. मालमत्तेसाठी धर्मगुरूचा खून
    अफगाणी सुफी जरीफ बाबा चिस्ती यांची नाशिकच्या येवला येथील चिंचोडी गावातील एमआयडीसी परिसरात गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. याप्रकरणी फरार हल्लेखोरांचा पोलिसांकडून शोध घेण्यात आला, गुन्हे शोध पथकासह तीन पथके हल्लेखोरंच्या मागावर पाठवण्यात आले, पोलिसांनी एकूण सहा संशयित आरोपींना ताब्यात घेतले, चिस्ती बाबा हे जंगम मालमत्तेचे व्यवहार अन्य स्थानिक सेविकारांच्या नावे करत होते,आणि यातूनच बाबांचा घात झाला.चार वर्षपूर्वी भारतात आलेल्या 29 वर्षीय जरीफ बाबांनी 3 कोटींची माया जमावल्याचे समोर आले


  7. स्मार्ट सिटीचा शेअरिंग प्रकल्प गुंडाळला
    नाशिक शहराच्या सार्वजनिक वाहतुकीला चालना देण्यासाठी आणि नागरिकांच्या आरोग्यासाठी स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन अंतर्गत गाजावाजा करून पीपीपी तत्त्वावर सुरू केलेला पब्लिक बायसिकल शेअरिंग प्रकल्प डब्यात गेला,या प्रकल्पात 20 कोटी हुन अधिक रुपयांचा घोटाळा झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.स्मार्ट सिटी कॉर्पोरेशन कंपनीने हिरो युऑन प्रायव्हेट लिमिटेड कंपनीशी पब्लिक बाइसिकल शेअरिंग प्रकल्पाचे पीपीटी तत्त्वावर काम दिले होते,यानंतर 10 ऑक्टोबर 2018 पासून नाशिक शहरात सायकल प्रकल्प सुरू करण्यात आला,नागरिकांचा चांगला प्रतिसाद वाढल्यानंतर शंभर डॉकिंग स्टेशन व एक हजार सायकल शहरातील नागरिकांसाठी उपलब्ध करून देण्यात मात्र कालांतराने नागरिकांचा प्रतिसाद कमी होत गेला.अशात हिरो युऑन कंपनीनेही या प्रकल्पाकडे दुर्लक्ष केलं,अशा सायकल नादुरुस्त होणे,चोरीला जाणे असे प्रकार वाढले,या बाबी स्मार्ट सिटीच्या अधिकाऱ्यांनी कंपनीला वारंवार निदर्शनास आणून दिल्या, मात्र कंपनीने सातत्याने त्याकडे दुर्लक्ष केलं.अखेर होरो युऑन सोबतचा करार रद्द झाला आणि हा प्रकल्प गुंडाळला गेला.


  8. 1100 किलो शेंदूर काढल्यानंतर सप्तशृंगी देवीला मूळ रूप
    महाराष्ट्रातील देवींच्या साडेतीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी देवीची मूर्ती संवर्धन
    प्रक्रिया नंतर भगवती मातेचे मूळ रूप समोर आलं आहे,देवीच्या मूर्तीवरून अकराशे किलो शेंदूर काढण्यात आल्यानंतर सप्तशृंगी देवीचे मूळ रूप समोर आलं,45 दिवसापासून मूर्ती संवर्धन प्रक्रिया सुरू होती, त्यामुळे देवीचे दर्शन बंद ठेवण्यात आले होते. 26 सप्टेंबर 2022 घटस्थापनेपासून देवी दर्शन नागरिकांसाठी खुले झाले


  9. शिंदे कार्यकर्त्यांना शिवसेनेच्या महिला कार्यकर्त्यांकडून चोप
    मुंबईला होत असलेल्या दसरा मेळाव्याला जाताना शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या गटाच्या महिला आणि एकनाथ शिंदे गटाच्या पुरुष कार्यकर्त्यांमध्ये इगतपुरी घोटी परिसरात राडा झाला. यात शिंदे कार्यकर्त्यांना उद्धव ठाकरे यांच्या शिवसेना महिलांकडून चोप देण्यात आला. नाशिकच्या महिला पदाधिकारी या मुंबईला जात असताना महिंद्रा बोलेरो या चारचाकीमध्ये असलेल्या शिंदे गटाच्या समर्थकांमध्ये हाणामारी झाली.दारू पिलेल्या शिंदे गटाच्या समर्थकांना उद्धव ठाकरे गटाच्या महिला शिवसैनिकांकडून चोप देण्यात आला,महिला शिवसैनिकांना अरेरावी करत अर्वाच्या भाषेत बोलल्याचा राग आल्याने शिंदे समर्थकांना महिलांनी मारहाण केली.


  10. मुख्यमंत्र्यांनी पूल बांधून दिला
    त्र्यंबकेश्वर तालुक्यातील शेंद्री पाडा येथील लाकड्या बल्ल्यावरून महिलांचा हांडे घेऊन जातानाचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर मोठया प्रमाणत व्हायरल झाला होता.या व्हिडीओची दाखल घेत तत्कालीन पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी युवा सेनेच्या कार्यकर्त्यांच्या माध्यमातून येथे लोखंडी पूल देखील उभारण्यात आला होता.यानंतर आदित्य ठाकरे हे स्वतः या पुलाच्या उद्घाटन केले होते,मात्र गेल्या काही दिवसात नाशिक शहरा सह त्र्यंबकेश्वर तालुक्यात मोठ्या प्रमाणत पाऊस झाला,जिल्ह्यातील अनेक ठिकाणी पूर परिस्थिती देखील निर्माण झाली होती,याच पुराच्या पाण्यात हा लोखंडी पूल वाहून गेला आहे.त्यामुळे येथील महिलांना पुन्हा एकदा हंडाभर पाण्यासाठी लाकडी बाल्यावरून जीवघेणी कसरत करावी लागत.ही बातमी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी तात्काळ प्रशासनाला आदेश देत या ठिकाणी नव्याने पूल बांधून दिला..


  11. सहा अल्पवयीन मुलींवर आश्रम संचालकाने केलेले अत्याचार
    नाशिकच्या म्हसरूळ भागातील एका रो हाऊस मध्ये भाडेतत्त्वावर चालवल्या जाणाऱ्या ज्ञानदीप आश्रमातील 13 अल्पवयीन मुली अंघोळ करत असताना त्यांचे मोबाईलद्वारे व्हिडिओ शूटिंग करून संचालक संशयित हर्षल बाळकृष्ण मोरे यांने ब्लॅकमेलिंग करून पीडित मुलींवर अत्याचार केल्याचं पिढीत मुलीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे,आतापर्यंत सहा अल्पवयीन मुलीवर या नराधामाने अत्याचार केल्याचं समोर आलंय,सध्या संशयित मोरे हा नाशिकच्या तुरुंगात आहे.मोरे हा अकरा वर्षांपासून चालवत असलेले आश्रम हे अनधिकृत असल्याचं समोर आल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी नाशिक जिल्ह्यातील अनधिकृत आश्रम शाळेची चौकशी बाबत आदेश दिलेत.
Last Updated : Jan 1, 2023, 7:26 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.