ETV Bharat / state

Nashik Bribe Case : मुख्याध्यापकाला 10 हजारांची लाच स्वीकारताना रंगेहाथ पकडले

author img

By

Published : Mar 16, 2022, 3:41 PM IST

वेतन काढून देण्यासाठी लाच स्वीकारताना एका मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडले ( Headmaster Arrested Accepting Bribe ) आहे. याप्रकरणी मुख्याध्यापकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला ( Register Fir Against Headmaster Bribe Case ) आहे.

शासकीय माध्यमिक आश्रमशाळा
शासकीय माध्यमिक आश्रमशाळा

नाशिक - दहा वर्षापासून कंत्राटी कर्मचाऱ्याकडून वेतन काढून देण्यासाठी 10 हजारांची लाच स्वीकारताना एका मुख्याध्यापकाला रंगेहाथ पकडले ( Headmaster Arrested Accepting Bribe ) आहे. माणिकलाल रोहिदास पाटील (५२) असे या मुख्याध्यापकाचे नाव ( Maniklal Patil Arrested Bribe Case Nashik ) आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, इगतपुरी तालुक्यातील आदिवासी विकास विभागाची वैतरणानगर येथे शासकीय माध्यमिक आश्रमशाळा आहे. या शाळेत तक्रारदार गेल्या १० वर्षांपासून कंत्राटी कर्मचारी म्हणून मानधनावर काम करत आहे. १६ नोव्हेंबर 2021 ते ११ जानेवारी 2022 पर्यंत आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय नाशिक येथील आदेश काढून देण्यासाठी तसेच, वरील कालावधीचे वेतन काढून देण्याच्या मोबदल्यात मुख्याध्यापक माणिकलाल रोहिदास पाटील याने १० हजारांची लाच 11 मार्चला मागितली होती.

यासंदर्भात तक्रारदाराने नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. त्यानुसार नाशिकच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक अनिल बागुल यांनी 15 मार्च रोजी सापळा रचला. मुख्याध्यापक माणिकलाल रोहिदास पाटील याने तक्रारदार यांच्याकडे पंचासमक्ष 10 हजार रुपये लाचेची मागणी केली. ही 10 हजार लाचेची रक्कम स्वीकारताना माणिकलाल रोहिदास पाटील याला रंगेहाथ पकडण्यात आले आहे. याप्रकरणी माणिकलाल पाटील यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या नाशिक परिक्षेत्राचे पोलीस अधीक्षक सुनील कडासने, अप्पर पोलीस अधीक्षक एन. एस. न्याहळदे, वाचक सतीश डी. भामरे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी तथा पोलीस निरीक्षक अनिल बागुल, पोलीस नाईक अजय गरुड, किरण आहिरराव, एकनाथ बाविस्कर, पोलीस हवालदार संतोष गांगुर्डे यांनी ही कारवाई केली आहे.

हेही वाचा - Bhagwant Mann Oath Ceremony : पंजाबचे मुख्यमंत्री म्हणून 'आप'चे भगवंत मान यांनी शपथ घेतली

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.