ETV Bharat / state

खासदार भारती पवार यांच्याकडून सार्वजनिक बांधकाम अधिकाऱ्यांची कानउघडणी

author img

By

Published : Nov 15, 2019, 9:44 AM IST

मनमाड शहरातील पुणे-इंदूर हा राज्यमहामार्ग मालेगावपासून कोपरगावपर्यंत पूर्णपणे खराब झाला आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होऊन अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएमकेपीएल टोल कंपनी याबाबत कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही.

भाजप खासदार डॉ. भारती पवार

नाशिक - सतत पडणाऱ्या पावसाने नाशिक जिल्ह्यातील सर्व रस्त्याची अवस्था बिकट झाली आहे. दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ. भारती पवार यांनी नांदगांव तालुक्यातील मनमाड येथे गुरूवारी भेट दिली. रस्त्यांची अवस्था पाहून त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची कानउघडणी केली. कर्तव्यात कसूर करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही डॉ. पवार यांनी दिला.

खासदार भारती पवार यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची कान उघडणी केली


मनमाड शहरातील पुणे-इंदूर हा राज्यमहामार्ग मालेगावपासून कोपरगावपर्यंत पूर्णपणे खराब झाला आहे. जागोजागी पडलेल्या खड्ड्यांमुळे वारंवार अपघात होऊन अनेकांनी आपले प्राण गमावले आहेत. याबाबत सतत टीव्ही आणि वर्तमान पत्रांतून बातम्या दिल्या गेल्या आहेत. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएमकेपीएल टोल कंपनी याबाबत कुठल्याही प्रकारची कारवाई करत नाही.

हेही वाचा - नाशिकच्या माया सोनवणेच्या भेदक फिरकीने महाराष्ट्र क्रिकेट संघाचा विजय; तामिळनाडूवर केली मात


सार्वजनिक बांधकाम विभागाविरोधात अनेक तक्रारी मिळाल्याने खासदार डॉ. भारती पवार यांनी मनमाड येथे भेट देऊन पाहणी. त्यानंतर शासकीय विश्रामगृहात बैठक घेऊन सर्व अधिकाऱ्यांना जाब विचारला. कामात दिरंगाई करणाऱ्या अधिकाऱ्यांची कान उघडणी करत लवकरात लवकर रस्त्यांची कामे करण्याचे आदेश पवार यांनी दिले. येत्या पंधरा दिवसात रस्ते पूर्णपणे खड्डेमुक्त करण्याचे आश्वासन सार्वजनिक बांधकाम उपविभागाच्या अधिकाऱ्यांनी दिले. डॉ. पवार यांच्या सोबत भाजपचे युवा जिल्हा उपाध्यक्ष सचिन दराडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष नितीन पांडे, मनमाड शहर अध्यक्ष जय फुलवानी हेही उपस्थित होते.


नाशिक जिल्ह्यातील सर्व रस्त्यांवर टोल कंपन्यांची टोल वसुली सुरूच आहे. प्रवाशांकडून टोल घेऊनही सुविधा देण्यास टोल कंपन्या असमर्थ आहेत. याबाबत निर्णय घेऊन टोल मुक्ती द्यावी किंवा उत्कृष्ट रस्ते आणि सुविधा पुरवाव्यात, अशी मागणी जनतेतून होत आहे.

Intro:सतत पडणाऱ्या पावसाने नाशिक जिल्ह्यातील सर्व रस्त्याची अक्षरशः चाळण केली असुन आज दिंडोरी लोकसभा मतदार संघाच्या खासदार डॉ भारती पवार यांनी नांदगांव तालुक्यातील मनमाड येथे सार्वजनिक बांधकाम विभागाला भेट देऊन रस्त्याबाबत विचारणा करत अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले तसेच काम लवकरात लवकर करा अन्यथा कर्तव्यात कसूर करणाऱ्यावर कारवाई करण्याचे त्यांनी यावेळी सांगितले.Body:मनमाड शहरातील पुणे इंदोर हा राज्यमहामार्ग मालेगाव ते कोपरगाव पूर्णपणे खराब झालेला आहे जागोजागी पडलेले खड्डे यामुळे रोज अपघात होऊन अनेकांना आपले प्राणही गमवावे लागले आहे याबाबत सतत टीव्ही तसेच वर्तमान पत्रातून बातम्या देऊनही सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच एमएमकेपीएल टोल कंपनी कुठल्याही प्रकारची दुरुस्ती करत नाही याबाबत अनेक तक्रारी मिळाल्याने आज खासदार डॉ भारती पवार यांनी सायंकाळी मनमाड येथे भेट देऊन पाहणी केली तसेच शासकीय विश्रामगृह येथे बैठक घेऊन सर्व अधिकाऱ्यांना जाब विचारला यात जे जे आपल्या कर्तव्यात दिरंगाई करत आहे अशाना चांगलेच झापत लवकरात लवकर या रस्त्याचे काम करण्याचे आदेशच दिले यावर सार्वजनिक बांधकाम उपविभागाचे अधिकारी यांनी येत्या पंधरा दिवसांत रस्ते पूर्णपणे खड्डेमुक्त करण्याचे सांगितले आहे.यावेळी त्यांनी रस्त्याची पाहणी केली व आवश्यक सूचनाही केल्या. यावेळी त्यांच्यासोबत भाजपाचे युवा जिल्हाउपाध्यक्ष सचिन दराडे भाजपा जिल्हाउपाध्यक्ष नितीन पांडे मनमाड शहर अध्यक्ष जय फुलवानी आदीजन उपस्थित होतेConclusion:नाशिक जिल्ह्यातील सर्वच्या सर्व रस्त्यावर टोल कंपनीच्या वतीने टोल वसुली सुरूच आहे त्यातच टोल घेऊनही कुठल्याही प्रकारची सुविधा देण्यास कंपन्या असमर्थ आहेत याबाबत लवकरच काहीतरी पाऊल उचलून एकतर टोल मुक्ती द्यावी किंवा उत्कृष्ट रस्ते आणि सुविधा पुरवाव्या अशी मागणी जनतेतून करण्यात येत आहे
आमिन शेख मनमाड
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.