ETV Bharat / state

नाशिक : डीपीडीसीच्या मुद्द्यावर मंत्री भुजबळांचा आमदार सुहास कादेंना सल्ला; म्हणाले, त्यांनी शांतपणे विचार करावा

author img

By

Published : Oct 31, 2021, 3:21 PM IST

Updated : Oct 31, 2021, 3:48 PM IST

जिल्हा नियोजन समितीची बैठकीत आमदार सुहास कांदेंनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर पालकमंत्री भुजबळ यांनी त्यांना शांतपणे पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी न्यायालयात दाखल केलेली याचिका स्टॅण्ड होण्यास वेळ लागेल. आगामी निवडणुकीची आचारसंहिता लागली तर आमदार व लोकप्रतिनिधींचा विकास निधी खर्चावर निर्बंध येतील. निधी परतदेखील जाऊ शकतो. हे सर्व पाहता बैठक होणे महत्त्वाचे असून आमदार कांदे यांनी त्यांच्या निर्णयाचा शांतपणे विचार करावा, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे.

minister chhagan bhujbal given advice to mla suhas kande nashik
डीपीडीसीच्या मुद्द्यावर मंत्री भुजबळांचा आमदार सुहास कादेंना सल्ला

नाशिक - जिल्हा नियोजन समितीची बैठकीत आमदार सुहास कांदेंनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर पालकमंत्री छगन भुजबळ यांनी त्यांना शांतपणे पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. आचारसंहिता लागली तर आमदार व लोकप्रतिनिधींचा विकास निधी खर्चावर निर्बंध येतील.

याबाबत बोलताना नाशिकचे पालकमंत्री छगन भुजबळ

जिल्हा नियोजन समितीची बैठकीत आमदार सुहास कांदेंनी आत्मदहनाचा इशारा दिल्यानंतर पालकमंत्री भुजबळ यांनी त्यांना शांतपणे पुन्हा एकदा विचार करण्याचा सल्ला दिला आहे. त्यांनी न्यायालयात दाखल केलेली याचिका स्टॅण्ड होण्यास वेळ लागेल. आगामी निवडणुकीची आचारसंहिता लागली तर आमदार व लोकप्रतिनिधींचा विकास निधी खर्चावर निर्बंध येतील. निधी परतदेखील जाऊ शकतो. हे सर्व पाहता बैठक होणे महत्त्वाचे असून आमदार कांदे यांनी त्यांच्या निर्णयाचा शांतपणे विचार करावा, अशी प्रतिक्रिया भुजबळ यांनी दिली आहे.

आमदार कांदेंना कशाची भीती?
आमदरा कांदे यांनी लेटर बाॅम्ब टाकत जिल्हा नियोजन समितीची बैठकीच्या दिवशी आत्मदहनाचा इशारा दिल‍ा आहे. त्यामुळे पालकमंत्री भुजबळ यांच्या प्रतिक्रियेकडे लक्ष लागून होते. भुजबळांनी रविवारी याबाबत माध्यंमाना प्रतिक्रिया दिली. अनुसूचित जमाती समिती जिल्हा दौर्‍यावर येणार असल्याने ९ नोव्हेंबरला होणारी जिल्हा नियोजन समितीची बैठक पुढे ढकलण्यात आली आहे. ती १६ नोव्हेंबरला होणार आहे. आमदार कांदे यांनी पाठवलेल्या पत्राबाबत मुख्यमंत्र्यांना कळवले आहे. ते याबाबत भूमिका घेतील. पुढील काळात महापालिका, जिल्हापरिषद, नगरपंचायंतीचा निवडणूका असून त्यांची आचारसंहिता लागेल. जिल्ह्यात १५ आमदार असून इतर लोकप्रतिनिधींचे विकासाचे कामे खोळंबतील. निधी परत देखील जाऊ शकतो. ते बघता बैठक होणे गरजेचे असल्याचे भुजबळ यांनी सांगितले.

Last Updated : Oct 31, 2021, 3:48 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.