ETV Bharat / state

नाशिक जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा फडकणार महाविकास आघाडीचा झेंडा

author img

By

Published : Dec 24, 2019, 1:36 PM IST

एकेकाळी संपूर्ण राज्यात भाजपचा बोलबाला सुरू होता. मात्र, भाजपला स्थानिक राजकारणात देखील ग्रहण लागल्याचे दिसत आहे. शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यामुळे समीकरणे बदलली आहेत. नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची धुरा ही शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर सोपवली आहे.

nashik-zila-parishad
नाशिक जिल्हा परिषद

नाशिक - अडीच वर्षांपूर्वी नाशिक जिल्हा परिषद निवडणुकीनंतर कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळाले नव्हते. त्यामुळे पहिल्यांदा स्थानिक पातळीवर भाजपला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येत जिल्हा परिषदेत सत्ता स्थापन केली होती. त्यानंतर परिषदेच्या अध्यक्षपदाची निवडणूक होऊ घातली आहे. याही निवडणुकीत भाजपला दूर ठेवण्यासाठी तीनही पक्ष एकत्र येणार हे निश्चित असले तरी अध्यक्ष पदावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्ये रस्सीखेच होण्याचा अंदाज आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांच लक्ष लागले आहे.

नाशिक जिल्हा परिषदेवर पुन्हा एकदा फडकणार महाविकास आघाडीचा झेंडा

हेही वाचा - समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा भाजपचा प्रयत्न झारखंडच्या जनतेने नाकारला - शरद पवार

एकेकाळी संपूर्ण राज्यात भाजपचा बोलबाला सुरू होता. मात्र, भाजपला स्थानिक राजकारणात देखील ग्रहण लागल्याचे दिसत आहे. शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यामुळे समीकरणे बदलली आहेत. नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची धुरा ही शिवसेनेचे नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ यांच्यावर सोपवली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा भाजपला जिल्हा परिषदेपासून दूर राहावे लागणार असल्याचे चित्र जाणवत आहे.

काँग्रेसच्या विद्यमान उपाध्यक्षा नयना गावित आणि अपक्ष शंकर धनवटे हे शिवसेनेकडे आले आहेत. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे संख्याबळ 43 झाले आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचा अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेवर शिवसेनेच्या शीतल सांगळे या अध्यक्ष आहेत. यावेळी मात्र अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस दावा करू शकते.

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छूक नागपुरला नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन आले आहेत. यामध्ये मोर्चेबांधणीसाठी राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. सर्वानुमते उमेदवार देण्याचा 'फॉर्म्युला' निश्चित केला आहे. मात्र, छगन भुजबळ आणि संजय राऊत अध्यक्ष ठरवणार आहे त्यामुळे जे वरिष्ठ ठरवतील तेच आम्हाला मान्य असेल असे स्थानिक नेत्यांच मत आहे.

हेही वाचा - #CAA कोलकाता : राज्यपालांना विद्यापीठात येण्यापासून रोखले, विद्यार्थ्यांसह कर्मचाऱ्यांनीही दाखवले काळे झेंडे


जिल्हा परीषदेतील पक्षीय बलाबल -

एकूण सदस्य संख्या - 73

शिवसेना - 25
भाजप - 15
राष्ट्रवादी काँग्रेस - 16
काँग्रेस - 8
माकप - 3
अपक्ष - 5

Intro:अडीच वर्षांपूर्वी नाशिक जिल्हा परिषद निवडणुकीनंतर कुठल्याही पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं नसल्याने पहिल्यांदा स्थानिक पातळीवर भाजपाला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी शिवसेना,राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस एकत्र येत नाशिक जिल्हापरिषद मध्ये सत्ता स्थापन केली होती... अडीच वर्षाच्या कार्यकाळ संपल्यानंतर पुन्हा नाशिक जिल्हा परिषदेत अध्यक्षपदाची निवडणूक होऊ घातली आहे.याही निवडणुकीत भाजपला दूर ठेवण्यासाठी तीनही पक्ष एकत्र येणार हे निश्चित असल तरी अध्यक्ष पदावर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन्ही पक्षांमध्य रस्सीखेच होण्याचा अंदाज आहे त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांच लक्ष लागलं आहे
Body:एकेकाळी संपूर्ण राज्यात भाजपचा बोलबाला असताना...आता मात्र भाजपला स्थानिक राजकारणात देखील ग्रहण लागल्याच दिसतय..शिवसेना आणि भाजपची युती तुटल्यामुळे सर्वच समीकरण वेगळी झालीयेत आता नाशिक जिल्हा परिषद अध्यक्ष निवडीची धुरा ही शिवसेनेचे संजय राऊत आणि राष्ट्रवादी कांग्रेसचे नेते,कॅबिनेट मंत्री छगन भुजबळ यांच्यावर सोपवलिये त्यामुळे पुनः एकदा भाजपला जिल्हा परिषदेपासून दूर राहावं लागणार आहे..
यामध्ये काँग्रेसच्या विद्यमान उपाध्यक्षा नयना गावित आणि अपक्ष शंकर धनवटे हे शिवसेनेकडे आले आहेत. त्यामुळे शिवसेना, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे संख्याबळ ४३ झाले आहे त्यामुळे महाविकास आघाडीचा अध्यक्ष होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे गेल्या तीन वर्षांपासून जिल्हा परिषदेवर शिवसेनेच्या शीतल सांगळे या अध्यक्ष आहेत त्यामुळे आता मात्र अध्यक्ष पदासाठी राष्ट्रवादी काँग्रेस दावा करू शकते

बाईट - 1) श्रीकांत सोनवणे - राजकीय विश्लेषक

जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष, उपाध्यक्षपदाचे शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसचे इच्छुक नागपुरला नेत्यांच्या गाठीभेटी घेऊन आले आहेत.यात मोर्चेबांधणीसाठी राष्ट्रवादीने आघाडी घेतली आहे. सर्वानुमते उमेदवार देण्याचा 'फॉर्म्युला' निश्चित केला आहे मात्र छगन भुजबळ आणि संजय राऊत अध्यक्ष ठरवणार आहे त्यामुळे जे वरिष्ठ ठवतील तेच आम्हाला मान्य असेल असं स्थानिक नेत्यांच ही मत आहे

बाईट 2)- महेश बडवे - शिवसेना महानगरप्रमुख

त्यामुळे या सर्व घडामोडी बघता भाजपला धोबीपछाड देऊन महाविकास आघाडी नाशिक जिल्हा परुषदेवर झेंडा फडकवेल हे नक्की मात्र एकेकाळी संकटमोचक म्हणून बोलबाला असलेल्या गिरीश महाजनांच्या हातून जिल्हा परिषद ही जाणार आहे त्यामुळे पुढील काळात भाजप काय रणनीती आखत हेच बघन महत्त्वाच ठरणार आहे...


Conclusion:नाशिक जिल्हा परीषदेतील पक्षीय बलाबल ..

एकूण सदस्य संख्या - ७३

शिवसेना - २५
भाजप - १५
राष्ट्रवादी काँग्रेस - १६
काँग्रेस - ८
माकप - ३
अपक्ष - ५
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.