ETV Bharat / state

Employment Cheating : रेल्वेत टीसी पदावर नोकरी देण्याचे आमिष; तरुणांची 55 लाखांची फसवणूक

author img

By

Published : Oct 29, 2022, 6:55 PM IST

रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमीष (Lure to get job as TC in Railways) दाखवून 5 तरुणांना बोगस नियुक्तीपत्र (fraud appointment letter to youth) देत, तब्बल 55 लाखांची फसवणूक (55 lakh fraud with Nashik youth ) केल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघड झालाय. याबाबत अंबड पोलिसात ठाण्यात पती, पत्नी व मुलगी विरोधात फसवणुकीचा (Financial fraud name of railway job) गुन्हा दाखल झाला आहे. (Nashik Latest News), (Nashik Crime)

Employment Cheating
Employment Cheating

नाशिक : रेल्वेमध्ये नोकरी लावून देण्याचे आमीष (Lure to get job as TC in Railways) दाखवून 5 तरुणांना बोगस नियुक्तीपत्र (fraud appointment letter to youth) देत, तब्बल 55 लाखांची फसवणूक (55 lakh fraud with Nashik youth ) केल्याचा प्रकार नाशिकमध्ये उघड झालाय. याबाबत अंबड पोलिसात ठाण्यात पती, पत्नी व मुलगी विरोधात फसवणुकीचा (Financial fraud name of railway job) गुन्हा दाखल झाला आहे, मात्र गुन्हा दाखल होण्याआधीच हे कुटुंब फरार झाले आहे. (Nashik Latest News), (Nashik Crime)

बोगस नियुक्तीपत्रही दिले - पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार तक्रारदार स्वप्निल विसपुते यांनी दिलेल्या तक्रारीवरून संशयित भावसिंग साळुंखे, मनीषा साळुंखे, ऋतिका साळुंखे यांनी संगनमत करत रेल्वेमध्ये टीसी पदावर भरती होणार असल्याचे सांगत तुम्हाला नोकरी लावून देतो असे आमिष दाखवले. रेल्वेमध्ये मोठे अधिकारी माझ्या ओळखीचे असून ऑनलाईन परीक्षेमध्ये पास झाल्यानंतर तात्काळ नोकरी देण्यात येईल असे सांगितले. विसपुते यांनी नातेवाईक पंकज पवार, मनीषा सुरवाडे, शिवाजी मंगळकर आणि सोनाली पाटील यांना याबाबत माहिती दिली. नोकरी मिळणार असल्याने त्यांनी संशयितांच्या बोलण्यावर विश्वास ठेवला.

ऑनलाइन परीक्षा घेतल्या : संशयितांनी विसपुते आणि सोनाली पाटील यांच्याकडून 13 लाख 70 हजार, मनीषा सुरवाडे यांच्याकडून 10 लाख, शिवाजी मंगळकर यांच्याकडून 11 लाख, पंकज पवार यांच्याकडून 15 लाख घेतले. त्यांना ऑनलाइन परीक्षा देण्यास सांगितले. त्यात पास झाल्याचा बोगस रिझल्ट तयार केला. यात सर्व उमेदवार पास झाल्याचे दाखवत, त्यांचे बोगस नियुक्तीपत्र तयार करून त्यांना मुंबई,जबलपूर,नाशिक रोड येथे हजर होण्यास सांगितले. हे सर्व तरुण हजर होण्यासाठी गेले असता अशा प्रकारची कुठलीही नियुक्ती नसल्याचे सांगण्यात आले. यानंतर त्यांना आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आले. यानंतर त्यांनी अंबड पोलीस ठाण्यात संशयितां विरोधात गुन्हा दाखल केला आहे.




अशी केली फसवणूक - संशयित साळुंखे यांनी मुलगी ऋतिका रेल्वेमध्ये नोकरीला लागल्याचे सांगत इमारतीमध्ये पेढे वाटले. विसपुते यांनी अभिनंदन केले. कसे झाले याबाबत विचारले असता संशयिताने माझी रेल्वेमध्ये मोठ्या अधिकाऱ्यांसोबत ओळख आहे. अजून 11 जागा आहेत. त्यावर उमेदवार पाहिजे असे सांगितले. विसपुते यांना साळुंखे यांच्या बोलण्यावर विश्वास पटल्याने त्यांनी जवळच्या नातेवाईकांना सांगितले. त्यांना होकार दिला. संशयितांनी याचाच फायदा घेत त्यांच्याकडून पैसे घेतले. यानंतर त्यांना बोगस नियुक्तीपत्र देत पोबारा केला.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.