ETV Bharat / state

Friend Murder For 4 Crores : चार कोटींच्या विम्यासाठी मित्राचा खून, बनावट महिलेला वारस दाखवत क्लेम लाटला

author img

By

Published : Dec 14, 2022, 5:35 PM IST

Updated : Dec 15, 2022, 9:54 AM IST

चार कोटींच्या विम्यासाठी मित्राचा खून केल्याची घटना नाशिकमध्ये झाली ( Friend Murder For 4 Crores Insurance ) आहे. एवढेच नव्हे तर बनावट महिलेला वारस दाखवण्यात आले. आणि क्लेम करण्यात आला.

Friend Murder For 4 Crores
चार कोटींच्या विम्यासाठी मित्राचा खून

चार कोटींच्या विम्यासाठी मित्राचा खून

नाशिक : खून करून अपघात झाल्याचा बनाव ( Fake Accident ) रचत पाच संशयितांनी मृत व्यक्तीच्या विम्याचे पैसे लाटल्याचा धक्कादायर प्रकार नाशिकमध्ये उघडकीस आला आहे. तब्बल चार कोटी रुपये विमा पत्नी असल्याचे दाखवत क्लेम ( Friend Murder For 4 Crores Insurance ) केले. या गुन्ह्यात एका महिलेसह पाच संशयितांना मुंबई नाका पोलिसांनी अटक केली आहे. यात मुख्य संशयित मंगेश सावकार, रजनी उकेप्रणव साळवी यांच्यासह आणखी दोघांना अटक करण्यात आली आहे.


एकूण घटना : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार 2 सप्टेंबर 2019 रोजी रात्री इंदिरानगर जॉगिंग ट्रॅक येथे रस्त्याच्या कडेला झाडीत एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता. दुचाकी बाजूला पडलेली असल्याने पोलिसांनी अपघाती मृत्यूचा गुन्हा दाखल केला होता. पोलिसांच्या तपासात मृत व्यक्ती अशोक रमेश भालेराव ( वय 46 राहणार देवळाली कॅम्प भगूर रोड) असल्याचे निष्पन्न झाले. या गुन्ह्यात पोलिसांनी अनोळखी वाहन चालकाविरोधात 304 (अ ) प्रमाने गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. दोन दिवसापूर्वी मयताच्या भावाने या अपघाताबाबत संशय व्यक्त करत सखोल तपास करण्याचे पोलीस यंत्रणेला पत्र दिले होते. पोलीस ठाण्यात येऊन हा अपघात नसून घातपात असल्याचे सांगितले होते. या माहितीच्या आधारे पोलिसांनी न्यायालयातून या गुन्ह्याची कागदपत्र मागून घेत तपास सुरू केला. तपासात विम्याचे चार कोटी रुपये रचनी उके या महिलेच्या नावावर जमा झाल्याच समोर आले. यानंतर संशयित महिलेला ताब्यात घेत चौकशी केली असता तिने मंगेश सावकार याच्यासह पाच संशयितांची नावे सांगितली. पोलिसांनी सावकार याला ताब्यात घेत चौकशी केली असता खून करून अपघात दाखवत विम्याची रक्कम एकमेकांत वाटप केल्याचे त्याने सांगितले.


मित्राचा घात केला : मिळलेल्या माहितीनुसार 2019 मध्ये मयत अशोक भालेराव संशयित मित्रांनी एकत्रित येत प्लॅन रचला. सुरवातीला अशोक भालेराव याचा चार कोटींचा विमा उतरविण्यात आला. एका महिलेला या प्लॅन मध्ये सामील करत तिला रमेशची पत्नी दाखवण्यासाठी तिचे नाव सरकारी गॅजेटमध्ये नोंदवून तिला वारस म्हणून दाखवण्यात आले. यानंतर रमेश म्हणून एखाद्या अनोळखी व्यक्तीला मारून त्याच्या नावाने विम्याची रक्कम लाटण्याचे ठरले होते. यानंतर अशोक हा काही वर्षे नाशिकच्या बाहेर जाणार होता. मात्र तीन वर्षे उलटून देखील प्लॅन सक्सेस होत नसल्याने इतर मित्रांनी एकत्र येत अशोकचाच खून करून अपघात दाखवत विम्याची चार कोटींची रक्कम लाटली. अशी माहिती पोलीस निरीक्षक सुनील रोहोकले यांनी दिली.


असे फुटले भिंग : संशयित महिलेच्या नावे विम्याची रक्कम बँकेत जमा होती. यातील बहुतांश रक्कम महिलेने संशयितांना वाटप केली होती. एक संशयितास रक्कम कमी मिळाल्याने या टोळीत वाद झाले होते. या संशयिताने मयताच्या भावाला अपघात नसून घात झाल्याची माहिती दिली होती.

मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता : ज्यावेळेस संशयित मंगेश सावकार याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्यांच्या दुचाकीच्या डिक्कीतून पिस्तूल आणि सहा काडतूसे पोलिसांनी जप्त केले आहेत. संशयितांनी यापूर्वी घातपात करत अपघात दाखवून विम्याची रक्कम हडप केल्याची दाट संशय पोलिसांना असून या गुन्ह्याची व्याप्ती वाढून मोठे रॅकेट उघडकीस येण्याची शक्यता देखील निर्माण झाली आहे.

Last Updated : Dec 15, 2022, 9:54 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.