ETV Bharat / state

Eknath Shinde Visit To Nashik : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नाशिक दौऱ्यातही शिंदे समर्थक 2 आमदारांची नाराजी उघड

author img

By

Published : Nov 16, 2022, 10:44 AM IST

Eknath Shinde Visit To Nashik : दरम्यान नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि नांदगावचे आमदार सुहास कांदे यांचे दोन्ही गट वेगवेगळ्या ठिकाणी शिंदेच्या स्वागताला उपस्थित असल्याचे चित्र दिसून आलं. काही दिवसांपूर्वी आमदार सुहास कांदे यांनी जिल्ह्यातील पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली.

Eknath Shinde Visit To Nashik
Eknath Shinde Visit To Nashik

नाशिक: नाशिकमध्ये भगवान बिरसा मुंडा यांच्या जयंती निमित्त जनजातीय गौरव दिवस महोत्सवाचे आयोजन करण्यात आलं होतं. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री एकनाथ शिदे उपस्थित होते. या दरम्यान नाशिकचे पालकमंत्री दादा भुसे आणि नांदगावचे आमदार सुहास कांदे यांचे दोन्ही गट वेगवेगळ्या ठिकाणी शिंदेच्या स्वागताला उपस्थित असल्याचे चित्र दिसून आलं. काही दिवसांपूर्वी आमदार सुहास कांदे यांनी जिल्ह्यातील पक्ष नेतृत्वावर नाराजी व्यक्त केली होती.

शिंदे समर्थक 2 आमदारांची नाराजी उघड

आमदारांची नाराजी: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे हेलिकॉप्टर ज्या ठिकाणी उतरणार आहे. त्याठिकाणी पालकमंत्री भुसे आणि कांदे उपस्थित होते. मात्र अशात पालकमंत्री दादा भुसे हे शासकीय अधिकाऱ्यांच्या सोबत तर सुहास कांदे जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांच्या बाजूला उभे होते. शिंदे गटातील आमदारांची नाराजी वाढल्याने पक्षातील मतभेद चव्हाट्यावर आल्याचं चित्र बघायला मिळाले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दौऱ्यातही उघड उघड नाराजी व्यक्त होत असल्याने राजकीय चर्चना उधाण आलं होतं.

आमदार कांदे का नाराज ? नाशिक जिल्ह्याचे पालकमंत्री दादा भुसे मला कुठल्याही बैठकीला बोलवत नाही, अशी नाराजी शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांनी व्यक्त केली आहे. या आधी देखील नाशिकचे माजी पालकमंत्री छगन भुजबळ हे निधी वाटपावरून दुजाभाव करत असल्याचा आरोप आमदार कांदे यांनी केला होता.

प्रमुख व्यक्तींवर आरोप करत चर्चेत: नाशिक जिल्ह्यातील आमदार सुहास कांदे यांनी माजी पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या नंतर आता पालकमंत्री दादा भुसे यांच्या विरोधात नाराजी व्यक्त केली आहे. भुसे हे आपल्याला बैठकीला बोलवत नाही. मात्र असे असले तरी आपण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना कधीही सोडणार नाही, असं आमदार कांदे म्हटलं आहे. मात्र प्रमुख व्यक्तींवर आरोप करत चर्चेत राहण्यासाठी कांदे स्टँस्टबाजी करत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

सुहास कांदे यांचा राजकिय प्रवास: सुहास कांदे यांनी आपल्या राजकीय प्रवासाची वाटचाल 2006 मध्ये मनसेतून केली. त्यानंतर 2008 मध्ये राष्ट्रवादी कॉग्रेस मध्ये प्रवेश केला. यानंतर 2014 मध्ये शिवसेना पक्षात प्रवेश, संजय राऊत यांच्याशी जवळचे संबंध, 2019 शिवसेनेकडून उमेदवारी करत राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते पंकज भुजबळ यांच्या पराभव करून ते नांदगाव मतदार संघाचे आमदार झाले. यानंतर उद्धव ठाकरे गटातून बाहेर पडून ते एकनाथ शिंदे गटात सामील झाले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.