ETV Bharat / state

शिवसेनेच्या मजबूत गडाला राष्ट्रवादीचा दे धक्का; दिलीप बनकर विजयी

author img

By

Published : Oct 25, 2019, 11:53 AM IST

आमदार अनिल कदम, माजी आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांच्यासह तीन अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र, प्रमुख लढत दोन कदम व बनकर यांच्यात होणार होती. ती झाली देखील. जितकी जास्त मते यतीन कदम घेत गेले तितका पराभव आमदार अनिल कदम यांचा होत गेला.

दिलीप बनकर विजयी

नाशिक - शिवसेनेचा मजबूत गड समजल्या जाणाऱ्या निफाड मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार अनिल कदम यांचा 17 हजार 728 मतांनी राष्ट्रवादीचे दिलीप बनकर यांनी पराभूत करत दे धक्का दिला आहे. जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांनी तब्बल 24 हजार मते घेत दिलीप बनकर यांचा विजयाचा मार्ग सुखकर केला. निफाड मतदारसंघात हॅट्रिक करू पाहणारे आमदार अनिल कदम यांचे मात्र मंत्रिपदाचे स्वप्न भंगले आहे.

दिलीप बनकर विजयी

हेही वाचा- यवतमाळ जिल्ह्यात शिवसेना-भाजपच्या नेत्यांची बंडखोरी सपशेल फेल

आमदार अनिल कदम, माजी आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांच्यासह तीन अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले होते. मात्र, प्रमुख लढत दोन कदम व बनकर यांच्यात होणार होती. ती झाली देखील. जितकी जास्त मते यतीन कदम घेत गेले तितका पराभव आमदार अनिल कदम यांचा होत गेला. हे वास्तव निकालाच्या वेळी पाहायला मिळाले.

हेही वाचा- LIVE महाराष्ट्र विधानसभा निकाल : काँग्रेसच्या नाना पटोलेंचा दणदणीत विजय; डॉ.परिणय फुकेंचा पराभव

निफाडच्या कर्मवीर गणपतराव मोरे विद्यालयात मतमोजणीला सकाळी आठ वाजता प्रारंभ झाला. एकूण वीस फेऱ्या मोजण्यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांना तब्बल सहा तास वेळ लागला. पहिल्या फेरीपासून दिलीप बनकर यांनी अनिल कदम यांच्यावर आघाडी घेत अखेरचा विसाव्या फेरीपर्यंत ही आघाडी घेत विजय संपादित केला. पहिल्या फेरीत दिलीप बनकर यांनी 837 मतांची आघाडी घेतली होती.

आमदार अनिल कदम यांना ओझर, सुकेणा, या गटातून चांगली आघाडी मिळेल अशी अपेक्षा होती. मात्र, यतिन कदम यांनी या ठिकाणी चांगली मते घेत अनिल कदम यांना जोर का धक्का धिरे से दिला आहे. गेली दहा वर्षे आमदारपदासाठी झुंजणारे दिलीप बनकर यांना ओझर वगळता तालुक्याच्या सर्वच भागात मताधिक्य घेत विजय खेचून आणला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप बनकर यांना 96 हजार 354 मते, शिवसेनेचे अनिल कदम 78 हजार 680 मते, अपक्ष यतिन कदम 24हजार 46 मते, अपक्ष उत्तम निरभवणे 808 मते, विष्णू आहेरराव 2 हजार 667, सैय्यद लियाकत 480 मते मिळाली आहेत.

निफाडच्या उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे तहसीलदार दीपक पाटील यांच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रिया यशस्वी पार पाडली. उपविभागीय पोलीस अधिकारी माधव पडीले यांनी चोख पोलीस बंदोबस्त या परिसरात तैनात ठेवलेला होता.

'राष्ट्रवादीचे नेते शरदचंद्र पवार यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत आलो आहे. निफाड तालुक्यातील शेतकरी कामगार मजूर सर्वसामान्य व्यापारी यांनी बनकर परिवारावर भरभरुन प्रेम केले आहे. आजचा झालेला हा विजय हा जनतेचा विजय आहे. आणि तो मी त्यांनाच अतिशय सन्मानपूर्वक अर्पण करत आहे,' अशी प्रतिक्रिया आमदार दिलीप बनकर यांनी विजयानंतर दिली.

Intro:शिवसेनेच्या मजबूत गडाला राष्ट्रवादीचा दे धक्का

-दिलीप बनकरांचा झाला विजय

निफाड 121विधानसभा मतदारसंघाच्या निवडणुकीत शिवसेनेचा मजबूत गड समजल्या जाणाऱ्या  निफाड मतदार संघात शिवसेनेचे उमेदवार अनिल कदम यांचा सतरा हजार 728 मतांनी राष्ट्रवादीचे दिलीप बनकर यांनी पराभूत करत दे धक्का दिला आहे जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांनी तब्बल 24000  मते घेत दिलीप बनकर यांचा विजयाचा मार्ग सुखकर केला. निफाड मतदारसंघात हॅट्रिक करू पाहणारे  आमदार अनिल कदम यांचे मात्र मंत्रिपदाचे स्वप्न  भंगले आहे. 

 Body:

  आमदार अनिल कदम, माजी आमदार दिलीप बनकर, जिल्हा परिषद सदस्य यतीन कदम यांच्यासह तीन अपक्ष उमेदवार रिंगणात उतरले होते मात्र प्रमुख लढत दोन कदम व बनकर यांच्यात होणार होती व ती झाली देखील. जितकी जास्त मते यतीन कदम घेत गेले तितका पराभव आमदार अनिल कदम यांचा होत गेला हे वास्तव निकालाच्या वेळी पाहायला मिळाले.

           निफाड चा कर्मवीर गणपतराव मोरे विद्यालयात मतमोजणीला सकाळी आठ वाजता प्रारंभ झाला. एकूण वीस फेऱ्या मोजण्यासाठी कर्मचारी व अधिकाऱ्यांना तब्बल सहा तास वेळ लागला. पहिल्या फेरीपासून दिलीप बनकर यांनी अनिल कदम यांच्यावर आघाडी घेत अखेरचा विसाव्या फेरीपर्यंत ही आघाडी घेत विजय संपादित केला पहिल्या फेरीत दिलीप बनकर यांनी 837 मतांची आघाडी घेतली होती.

          Conclusion:

          आमदार अनिल कदम यांना ओझर, सुकेणा , या गटातून चांगली आघाडी मिळेल अशी अपेक्षा होती माञ यतिन कदम यांनी या ठिकाणी चांगली मते घेत अनिल कदम यांना जोर का धक्का धिरे से दिला आहे. गेली दहा वर्षे आमदारपदासाठी झुंजणारे दिलीप बनकर यांना ओझर वगळता  तालुक्याच्या सर्वच भागात  मताधिक्य घेत विजयश्री खेचून आणला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिलीप बनकर यांना 96354 मते , शिवसेनेचे  अनिल कदम 78680 मते , अपक्ष यतिन कदम 24046 मते, अपक्ष उत्तम निरभवणे 808 मते , विष्णू आहेरराव 2667 ,सैय्यद लियाकत 480 मते मिळाली आहेत. 

        निफाडच्या उपविभागीय अधिकारी अर्चना पठारे तहसीलदार दीपक पाटील  यांच्या सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतमोजणी प्रक्रिया यशस्वी पार पाडली .उपविभागीय पोलिस अधिकारी माधव पडीले यांनी  चोख पोलीस बंदोबस्त या परिसरात तैनात ठेवलेला होता.

प्रतिक्रिया 

राष्ट्रवादीचे नेते शरद चंद्र पवार साहेब यांच्या नेतृत्वाखाली मी काम करत आलो आहे निफाड तालुक्यातील शेतकरी कामगार मजूर सर्वसामान्य व्यापारी यांनी बनकर परिवारावर भरभरून प्रेम केले आहे आजचा झालेला हा विजय हा जनतेचा विजय आहे आणि तो मी त्यांनाच अतिशय सन्मानपूर्वक अर्पण करत आहे आमदार दिलीप बनकर 
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.