ETV Bharat / state

सावरकरांना भारतरत्न चुकीचा म्हणणाऱ्या काँग्रेस नेत्यांना भ्रष्टाचारत्न मिळू शकतो - फडणवीस

author img

By

Published : Oct 18, 2019, 11:22 AM IST

महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकच्या गोदाघाट परिसरात महाजनदेश संकल्प सभा पार पडली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांवर अनेक आश्वासनांचा पाऊस पाडला.

देवेंद्र फडणवीस

नाशिक - "सावरकर यांना भारतरत्न देण्यास काँग्रेसचा विरोध का? मग काँग्रेसच्या भ्रष्टाचार्‍यांना भारतरत्न द्यायचा का?," असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. नाशिकला आयोजित महाजनादेश संकल्प सभेत ते बोलत होते. सभेत त्यांनी कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस यांच्यावर घणाघाती टीका केली.

देवेंद्र फडणवीस

हेही वाचा- चार हाडांचा बीएमसी चोर कोकणात आला होता - निलेश राणे

नाशिक ते मुंबई अवघ्या सव्वा तासात जाता येइल

अन्नधान्य, फळे, दूध यांनी समृद्ध असलेल्या नाशिकमध्ये केंद्र शासनाने फूडपार्क मंजूर केला आहे. त्यानिमित्ताने निर्णयक्षमता उद्योग उभारण्याचे नवे केंद्र निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले. त्यासाठी राज्य शासन स्वस्तात वीज देईल. तसेच डिफेन्स इनोव्हेशन सेंटरमुळे कोट्यवधीची गुंतवणूक नाशिकमध्ये येईल. नाशिक शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत पंधराशे कोटी रुपयांची कामे सुरू आहेत. यात नाशिक शहरात हायब्रीड मेट्रो, स्मार्ट बससेवा सुरू होत आहेत. त्यासाठी एकाच कार्डवर नाशिककरांना प्रवास करता येणार आहे. समृद्धी महामार्गामुळे नाशिक ते मुंबई अवघ्या सव्वा तासात जाता येईल. वर्षभरात नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार आहोत. नाशिकला स्टार्टअप कॅपिटल कसे बनवता येईल याकडे लक्ष दिले जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले.

शरद पवारांची शोलेमधील जेलर सारखी परिस्थिती

शरद पवारांची शोलेमधील जेलर सारखी परिस्थिती झाली आहे. आधे एधर जाओ, आधे उधर जाओ, बाकी उरलेले थोडे मागे, पवारांच्या मागे आज कोणीही नाही, जेवढ्याना आम्ही नाकारले तेवढेच शिल्लक आहेत. आमच्याकडे नीतिमत्ता असल्याने पैलवान आहेत, पवारांच्या पैलवानाकडे काय आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली.

राहुल गांधी हे आपलेच प्रचारक त्यांच्यामुळे आपल्या उमेदवारांचे मत्ताधिक्य वाढेल

निवडणुका जाहीर झाल्यानंतर राहुल गांधी कुठे गायब झाले होते. हे कळतच नव्हते. नंतर कळाले ते बँकॉकमध्ये आहेत. त्यानंतर त्यांच्यावर होणारी टीका लक्षात घेता ते मैदानात आले. मात्र, भाषणात त्यांनी सत्तर वर्षात कसा भ्रष्टाचार झाला आहे, हे सांगितले. यातील साठ वर्षे हे काँग्रेसचे सरकार असल्यामुळे त्यांच्या उमेदवारांची अडचण झाली. त्यामुळे काळजी करू नका राहुल गांधी हे आपलेच प्रचारक असून उद्या ते नाशिकमध्ये आले तर आपल्या उमेदवारांच्या मत्ताधिक्यात वाढ होईल, असा चिमटा मुख्यमंत्र्यांनी काढला.

काँग्रेसने सावरकर यांना कधीच आपलं मानलं नाही, आता काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सावरकर यांच्याबद्दल आदर आहे, असे सांगितले. स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी मागणी केली. मात्र, काँग्रेसने म्हटले की हा निर्णय दुर्दैवी आहे. सावरकरांना भारतरत्न द्यायचा नाही, तर मग काय काँग्रेसला भ्रष्टाचाररत्न पुरस्कार दिला पाहिजे, असा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला.

Intro:सावरकर यांना भारतरत्न देण्यास काँग्रेसचा विरोध का,मग काँग्रेसच्या भ्रष्टाचार्‍यांना भारतरत्न ह्यायचा का? -मुख्यमंत्री फडणवीस...


Body:सावरकर यांना भारतरत्न देण्यास काँग्रेसचा विरोध का,मग काँग्रेसच्या भ्रष्टाचार्‍यांना भारतरत्न ह्यायचा का असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला,नाशिकला आयोजित महाजनदेश संकल्प सभेत ते बोलत होते..ह्यावेळी त्यांनी कॉग्रेस राष्ट्रवादी कॉग्रेसवर घणाघात टीका केली.. महायुतीच्या उमेदवारांसाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची नाशिकचा गोदाघाट परिसरात महाजनदेश संकल्प सभा पार पडली, यावेळी मुख्यमंत्र्यांनी नाशिककरांवर अनेक आश्वासनाचा पाऊस पडला, अन्नधान्य, फळे, दूध आधीच सर्वांसाठी समृद्ध असलेल्या नाशिक मध्ये केंद्र शासनाने फूडपार्क मंजूर केला असून त्यानिमित्ताने निर्णयक्षमता उद्योग उभारण्याचे नवे केंद्र निर्माण होणार असल्याचे त्यांनी सांगितले, त्यासाठी राज्य शासन स्वस्तात वीज देईल तसेच डिफेन्स इनोव्हेशन सेंटरमुळे कोट्यावधीची ही गुंतवणूक नाशिकमध्ये येईल,नाशिक शहरात स्मार्ट सिटी अंतर्गत पंधराशे कोटी रुपयांची कामे सुरू असून यात नाशिक शहरात हायब्रीड मेट्रो, स्मार्ट बससेवा सुरू होत असून त्यासाठी एकाच कार्डवर नाशिककरांना प्रवास करताना येणार आहे.. समृद्धी महामार्गा मुळे नाशिक ते मुंबई अवघ्या सव्वा तासात जाता येइल असेही मुख्यमंत्र्यांनी म्हटले, तसेच वर्षभरात नाशिकमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू करणार असल्याचंही त्यांनी सांगितलं, नाशिकला स्टार्टअप कॅपिटल कसे बनवता येईल असे मुख्यमंत्री म्हणालेत... शरद पवारांची शोले मधील जेलर सारखी परिस्थिती झाली असून,आधे एधर जाओ, आधे उधर जाओ ,बाकी उरलेले थोडे मागे,पवारांच्या मागे आज कोणीही नाही,जेवढ्यानां आम्ही नाकारले तेवढेच शिल्लक आहे...आमच्याकडे नीतिमत्ता असल्याने पहिलवान आहेत, पवारांच्या पैलवान कडे काय आहे, अशी टीका फडणवीस यांनी केली ... राहुल गांधी यांचा देखील मुख्यमंत्र्यानी समाचार घेतला, निवडणुका जाहीर झाल्यानंतर ते कुठे गायब झाले होते,हे कळतच नव्हते, नंतर कळाले ते बँकॉक मध्ये आहेत, त्यानंतर त्यांच्यावर होणारी टीका लक्षात घेता ते मैदानात आले,मात्र भाषणात त्यांनी सत्तर वर्षात कसा भ्रष्टाचार झाला आहे हे सांगितलं, यातील साठ वर्ष हे काँग्रेसचे सरकार असल्यामुळे त्यांच्या उमेदवारांची अडचण झाली, त्यामुळे काळजी करू नका राहुल गांधी हे आपलेच प्रचारक असून उद्या ते नाशिक मध्ये आले तर आपल्या उमेदवारांच्या मत्ताधिक्यात वाढ होईल असा चिमटा देखील मुख्यमंत्र्यांनी काढला... काँग्रेसने सावरकर यांना कधीच आपलं मानलं नाही ,आता काही दिवसांपूर्वी माजी पंतप्रधान मनमोहनसिंग यांनी सावरकर यांच्या बद्दल आदर आहे असे सांगितले, स्वातंत्र्यवीर सावरकर यांना भारतरत्न देण्यासाठी मागणी केली मात्र काँग्रेसने म्हटले की हा निर्णय दुर्दैवी आहे,सावरकरांना भारतरत्न द्यायचा नाही तर मग काय काँग्रेसला भ्रष्टाचार रत्न पुरस्कार दिला पाहिजे असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला....


Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.