ETV Bharat / state

नाशिक: केंद्रीय इंजिनिअरिंग कारखान्यातील १० ते १२ कर्मचाऱ्यांना कोरोनाचा संसर्ग

author img

By

Published : Mar 16, 2021, 10:10 PM IST

गेल्या अनेक वर्षांपासून मनमाडमध्ये ब्रिटिशकालीन केंद्रीय इंजिनिअरिंग कारखाना आहे. रेल्वेचे ब्रिज बनविण्यासाठी लागणारे गर्डर, नट-बोल्टसह इतर साहित्य तयार होते. या ठिकाणी हजारो कर्मचारी काम करतात.

central engineering factory
केंद्रीय इंजिनिअरिंग कारखाना

मनमाड (नाशिक) - रेल्वेच्या ब्रिटशकालीन कारखान्यातही कोरोनाचा प्रवेश झाला आहे. मनमाडमधील केंद्रीय इंजिनिअरिंग कारखान्यातील सुमारे 10 ते 12 कर्मचारी कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आज कारखाना बंद ठेवण्यात आला आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून मनमाडमध्ये ब्रिटिशकालीन केंद्रीय इंजिनिअरिंग कारखाना आहे. रेल्वेचे ब्रिज बनविण्यासाठी लागणारे गर्डर, नट-बोल्टसह इतर साहित्य तयार होते. या ठिकाणी हजारो कर्मचारी काम करतात. मागील वर्षी कोरोना वाढला असताना या कारखान्यात दोन पाळ्यांमध्ये काम केले जात होते. यानंतर पुन्हा नियमितपणे काम सुरू करण्यात आले. मात्र, या ठिकाणी कोरोनाचा प्रवेश झाल्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे. आजपासून कारखाना बंद करण्यात आला. संपूर्ण कारखाना सॅनिटायझेशन करण्याचे काम सुरू आहे.

हेही वाचा-डीएफआयच्या स्थापनेकरता २० हजार कोटींचे अर्थसहाय्य करण्याकरता केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी

हजारो कर्मचाऱ्यांना रोजगार...!
मनमाड स्थित असणाऱ्या रेल्वेच्या इंजिनिअरिंग कारखान्यात ब्रिटिश काळापासून रेल्वेचे ब्रिज बनवले जातात. याठिकाणी तेव्हापासून आजपर्यंत काम सुरू आहे. या ठिकाणी अनेक कर्मचारी काम करतात. येथील नोकऱ्यांवर हजारो कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. आज याठिकाणी कोरोनाचा शिरकाव झाला असल्याने भविष्यात काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.

हेही वाचा-अँटिलिया प्रकरण : आयुक्तालयातील वाझेंच्या कॅबिनमधून डॉक्युमेंट, मोबाईल, कॉम्प्यूटर जप्त

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.