ETV Bharat / state

Eknath Khadase On SS-BJP Alliance Break : 2014 मध्ये भाजपनेच युती तोडली होती; मोदी जे बोलले ते अर्धसत्य - एकनाथ खडसे

author img

By

Published : Aug 9, 2023, 4:56 PM IST

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजपच्या खासदारांची बैठक आयोजित केली होती. यामध्ये 2014 ला शिवसेनेने युती तोडली, आम्ही तोडली नाही असे ते म्हणाले. नरेंद्र मोदी जे बोलले ते अर्धसत्य बोलले. 2014 मध्ये भाजपनेच युती तोडली होती, असे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी सांगितले. खडसे नाशिकला आले असता ते पत्रकारांशी बोलत होते.

Eknath Khadase On Alliance Break
एकनाथ खडसे

शिवसेना-भाजप युती तुटण्यावर एकनाथ खडसे यांचे मत

नाशिक : भाजप शिवसेना युतीमध्ये 2014 मध्ये जागा वाटप हा एक मुद्दा होता. 171 जागेवर शिवसेना लढत होती. भाजपचे वातावरण देशात होते म्हणून अधिकच्या जागा मिळाव्या यासाठी युती तोडली. आपली सत्ता येईल असा विश्वास भाजपला वाटत होता; म्हणून युती तोडली असावी, असे मलावाटत होते. यापेक्षा पक्षाला काय वाटत होते हे महत्त्वाचे होते; पण तेव्हा मला बदनाम केले गेले, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.


ठाकरे, सेनेला टार्गेट केले जातेय : लोकसभेच्या निवडणुका येऊ घातल्या आहेत. त्या जिंकायच्या असेल तर शिवसेना आव्हान देऊ शकते. म्हणून शिवसेनेला (ठाकरे) टार्गेट केले जातेय. देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना पक्ष फोडला तेव्हा शिंदे आणि भाजप, असे बहुमत होते. तिसऱ्याची आवश्यकता नव्हती. शिंदे अधिक प्रभावी होऊ नये यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसला सोबत घेतले. सिनियर आणि ज्युनिअर उपमुख्यमंत्री केले. जागावाटप हा येणारा काळ ठरवेल, असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.

किळसवाणे राजकारण : एवढे किळसवाणे राजकारण इतिहासात कधीही नव्हते. कोणता नेता कुठे आहे हेच समजत नाही. हेच तिन्ही पक्ष एकमेकांवर टीका करायचे, आता कोणावर टीका करणार असेही एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.



सर्वच पक्ष दौरे करत आहेत : प्रत्येकाला पक्ष वाढविण्याचा अधिकार आहे. आपल्या जागा वाढाव्या, अशी अपेक्षा काँग्रेस करत असली तरी उद्धव ठाकरे यांनी यापूर्वी दौरे केले आहेत. शरद पवार यांचेही दौरे झाले आहेत. बीड आणि जळगावला सभा होणार आहे. राज्यातील एकही पक्ष 48 जागा लढवू शकत नाही. निवडणूक तोंडावर असल्याने प्रत्येकजण पक्ष जोडायला लागला आहे. बच्चू कडू यांना देखील जवळ केले. महाविकास आघाडीला राज्यात चांगला प्रतिसाद मिळेल, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले आहे.


खडसेंचा भाजपला टोला : पूर्वी भाजपमध्ये सामूहिक निर्णय व्हायचे. तेव्हा चर्चा व्हायची यानंतर वरिष्ठांना कळवून अंतिम निर्णय घेतला जायचा. अलीकडे देवेंद्र फडणवीस यांचे मत हे वरच्या लोकांचे असते. ज्यांनी राष्ट्रवादीला नॅशनल करप्ट पार्टी म्हटले होते, तेच आज राष्ट्रवादी कॉंग्रेससोबत आहेत, असा टोलाही एकनाथ खडसे यांनी भाजपला लगावला.


रस्ते चांगले नाही मग टोल का भरायचा : रस्त्यात खड्डा आहे की, खड्ड्यात रस्ते आहे. मी आलो तेव्हा कोणी मालिश करणारा आहे का म्हणून विचारले. सगळी हाडं मोकळी झाली. आता खड्डे मोजता येणार नाहीत. नाशिक आणि मुंबई नाहीतर तर संपूर्ण ग्रामीण भागातील रस्ते असेच आहेत. असे असताना नागरिकांनी टोल का भरायचा? असा सवाल त्यांनी केला. सरकारकडे पैसे नाहीत. 40 हजार कोटी रुपयांची देणी बाकी आहेत. ठेकेदार उपोषणाला बसले होते. त्यांना पैसे द्याल तर ते कामे करतील असे एकनाथ खडसे यांनी म्हटले.

हेही वाचा:

  1. Rahul Gandhi Flying Kiss : राहुल गांधींचा लोकसभेत फ्लाइंग किस? स्मृती इराणी बरसल्या...
  2. Devendra Fadnavis on Aditya Thackeray : निंदकाचे घर असावे शेजारी; फडणवीसांचा आदित्य ठाकरेंना टोला
  3. Rahul Gandhi in Parliament Updates :आम्ही शौचालयावर बोलतो, तेव्हा काँग्रेसचे खासदार हसतात- स्मृती इराणी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.