ETV Bharat / state

कोरोनामुळे श्री. काळाराम मंदिरात रामनवमी उत्सवाचे सर्व सांस्कृतिक कार्यक्रम रद्द

author img

By

Published : Mar 12, 2020, 11:08 PM IST

मंदिर परिसरात शिंकणे, खोकणे या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यासाठी श्री. काळाराम संस्थानच्या वतीने भाविक आणि भक्तांचे हित लक्षात घेत २५ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत सुरू असणाऱ्या वासंतिक नवरात्र उत्सवातील व्याख्यान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा देण्याचे एकमताने ठरविण्यात आले आहे.

kalaram temple nashik
श्री. काळाराम मंदिर

नाशिक- जगभरात कोरोनो विषाणूच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे खबरदारी म्हणून श्री. काळाराम संस्थानच्या वतीने होणाऱ्या वासंतिक नवरात्रोत्सव कार्यक्रमातील सर्व सांस्कृतिक कार्यक्रम पहिल्यांदाच रद्द करण्यात आले आहेत. मात्र, उत्सवाच्या काळात मंदिरातील दैनंदिन पूजाअर्चा नियमित होणार असल्याची माहिती संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हा सत्र न्यायाधीश विकास कुलकर्णी यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

माहिती देताना श्री. काळाराम मंदिर संस्थानचे अध्यक्ष आणि जिल्हा सत्र न्यायाधीश विकास कुलकर्णी

रथ उत्सव होणार की नाही, याबाबत परवानगी कोणत्या नियमांवर मिळणार त्यावर अवलंबून असल्याचे सांगत न्यायाधीश कुलकर्णी यांनी साशंकता व्यक्त केली आहे. करोनो विषाणूचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी शासनस्तरावर कार्यक्रम आयोजित करणाऱ्या संस्थांना आणि मंदिरांना गर्दीचे कार्यक्रम घेणे टाळण्याचे आदेश देण्यात आले आहेत. मंदिरांमध्ये देशासह जगभरातील भाविक आणि पर्यटक मोठ्या संख्येने एकत्र येत असतात. अशा ठिकाणी शिंकणे, खोकणे या माध्यमातून कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. यासाठी श्री. काळाराम संस्थानच्या वतीने भाविक आणि भक्तांचे हित लक्षात घेत २५ मार्च ते ४ एप्रिल पर्यंत सुरू असणाऱ्या वासंतिक नवरात्र उत्सवातील व्याख्यान आणि सांस्कृतिक कार्यक्रमांना फाटा देण्याचे एकमताने ठरविण्यात आले आहे.

हात स्वच्छ करण्यासाठी मंदिरात सॅनिटायझरचे होणार वाटप -

श्री. काळाराम मंदिरात उत्सव काळात आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव जोपर्यंत कमी होत नाही, तोपर्यंत मंदिरात येणाऱ्या भाविकांना हात स्वच्छ करण्यासाठी सॅनिटायझरचे वाटप करण्यात येणार आहे. मात्र, यादरम्यान श्री. काळाराम मंदिरातील दैनंदिन पूजाअर्चा तसेच रामजन्म उत्सव सालाबाद प्रमाणे करण्यात येणार आहे. रामजन्मोत्सव नंतर येणाऱ्या एकादशीला शहरात श्री. राम आणि गरुड रथ काढण्याची ऐतिहासिक परंपरा आहे. श्री. काळाराम संस्थानच्या वतीने रथ उत्सव साजरा करण्यासाठी सज्ज असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, शासन रथ उत्सवाला परवानगी देणार की नाही आणि रथ उत्सवाला होणारी गर्दी लक्षात घेता रथ उत्सव रद्द केल्यास भाविकांचे हित जोपासले जाणार असल्याचे सांगितल्याने रथ उत्सवाबाबत साशंकता व्यक्त केली जात आहे.

हेही वाचा- नाशकात धुळवडीनिमित्त वीरांना नाचवण्याची 300 वर्षांपासूनची अनोखी परंपरा आजही कायम...

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.