ETV Bharat / state

Malegaon Corona Updatse : मालेगावात कोरोना नियंत्रणात; आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे पथक घेणार आढावा

author img

By

Published : Jan 14, 2022, 10:06 AM IST

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर व जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटे संदर्भात झालेल्या चर्चेत मालेगाव मॅजिक वर शास्त्रीय संशोधन संकल्पना समोर आली आहे. मालेगावात कोरोनाच्या पहिला टप्पात हजारो नागरिक संक्रमित झाले होते. मात्र आता तिसर्‍या लाटेत सर्वत्र मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असतांना मालेगावात केवळ 27 रुग्ण उपचार घेत आहे.

Malegaon Corona Updatse
Malegaon Corona Updatse

नाशिक - जिल्ह्यातील मालेगाव हे पहिल्या लाटेत कोरोनाचे हॉटस्पॉट ठरले होते. त्यानंतर दुसऱ्या लाटेत रुग्णसंख्या वाढली. मात्र तिसर्‍या लाटेत देशात आणि राज्यात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहे. मात्र मालेगाव याला अपवाद आहे. याची शास्त्रीय कारणमीमांसा करण्यासाठी नाशिक आरोग्य विज्ञान विद्यापीठाने संशोधन मोहीम हाती घेतली आहे. मालेगाव महापालिका आरोग्य यंत्रणेच्या मदतीने विद्यापीठाने निवृत्त 40 तज्ञांचे पथक यासाठी सर्वेक्षण करणार असून पंधरा दिवसात निकष हाती येण्याचा अंदाज आहे.

आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे पथक घेणार आढावा

आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. माधुरी कानिटकर व जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांच्यात कोरोनाच्या तिसऱ्या लाटे संदर्भात झालेल्या चर्चेत मालेगाव मॅजिक वर शास्त्रीय संशोधन संकल्पना समोर आली आहे. मालेगावात कोरोनाच्या पहिला टप्पात हजारो नागरिक संक्रमित झाले होते. मात्र आता तिसर्‍या लाटेत सर्वत्र मोठ्या संख्येने कोरोना बाधित रुग्ण आढळून येत असतांना मालेगावात केवळ 27 रुग्ण उपचार घेत आहे. लोकसंख्येच्या तुलनेत रुग्णांची टक्केवारी वाढत कमी कशी आहे याचं सर्वांनाच कुतूहल आहे. नागरिकांनी कोरोनावर मात करताना नेमकी कोणती जीवन शैली वापरली. त्याचा शास्त्रीय अभ्यास करणे हा मालेगाव मॅजिक अभियानाच्या उद्देश आहे. जगभर व आपल्या देशातही कोरोनावर मात करण्यासाठी संशोधनात्मक प्रयत्न सुरू आहेत. त्याच उत्तर मालेगावात दडले आहे ते शोधण्याची गरज आहे. मालेगाव पॅटर्नवर तज्ञांकडून शास्त्रीय कारणमीमांसा पण झाली पाहिजे.

आरोग्य विद्यापीठात पेपर सादर केले जातील

आरोग्य विज्ञान विद्यापीठाची चर्चा झाली यावर निर्णय झाला, त्यांनी याचा अभ्यास करून संशोधन पेपर सादर जागतिक स्तरावर व देशातील आरोग्य विद्यापीठामध्ये प्रकाशित केले जातील,मालेगाव पॅटन कसा आहे, हे यातून संशोधनातून कोरोनावर मात करण्यासाठीचे उत्तर मिळेल असा दावा जिल्हाधिकारी सुरज मांढरे यांनी केले आहे.

अँटीबॉडी तपासणार -

कोरोना नियंत्रण कार्याचा अभ्यास वैद्यकीय तज्ज्ञांची टीम करणार आहे,येथील जीवन शैली,लसीकरण झाले की नाही ? कोरोना संक्रमणात झालेले उपचार, परिसर अभ्यास ,नागरिकांचे वर्तन,त्यांची हिम्मत कशी वाढली यावर एक प्रश्नावली भरून घेतली जाईल, यसेच 2500 व्यक्तींचे अँटीबॉडी तपासण्यासाठी रक्ताचे नमुने घेतले जातील,या सर्व प्रक्रियेत सर्व कॉलेजचे तज्ञ या अभियानात भाग घेणार असल्याचं डॉ माधुरी कानिटकर यांनी सांगितलं त्यांनी सांगितलं.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.