ETV Bharat / state

नाशिक : महिला चोरट्यांनी लांबविल्या 90 हजार रुपये किमतीच्या साड्या; घटना सीसीटीव्हीत कैद

author img

By

Published : Feb 12, 2021, 10:32 PM IST

नाशिकच्या सातपूर परिसरात असलेला अशोकनगर परिसर नेहमीच वर्दळ तसेच मुख्य रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीने गजबजलेला असतो. मात्र, याच अशोकनगर भागात तसेच पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सुरत टेक्सटाईल्स या साडीच्या दुकानात प्रवेश करत दोघा महिलांनी सुमारे 90 हजारांच्या किमती साड्यांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

90 thousand rupees saree theft by womens in nashik
महिला चोरट्यांनी लांबविल्या 90 हजार रुपये किमतीच्या साड्या

नाशिक - महिला चोरट्यांनी दुकानाचे लॉक तोडून तब्बल 90 हजारांच्या साड्यांवर डल्ला मारल्याचा प्रकार नाशिकमध्ये समोर आला आहे. शहरातील अशोकनगर परिसरात सूरत टेक्सटाईल्स दुकानात ही घटना घडली. गुरुवारी पहाटेच्या सुमारास महिला चोरट्यानी संधी साधत दुकानाच लॉक तोडून आत प्रवेश करत, चांगल्या किमतीच्या साड्या लंपास केल्या आहेत. एक महिला या साड्या पिशवीत भरताना दुकानातील सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. सातपूर पोलिसांकडून या चोरट्यांचा शोध सुरू आहे.

दुकानमालक प्रतिक्रिया देताना.

नाशिकच्या सातपूर परिसरात असलेला अशोकनगर परिसर नेहमीच वर्दळ तसेच मुख्य रस्त्यावरील वाहनांच्या गर्दीने गजबजलेला असतो. मात्र, याच अशोकनगर भागात तसेच पोलीस चौकीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या सुरत टेक्सटाईल्स या साडीच्या दुकानात प्रवेश करत दोघा महिलांनी सुमारे 90 हजारांच्या किमती साड्यांची चोरी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. अशोकनगर येथे सुरत टेक्सटाईल नावाचे कल्लू चौधरी यांचे साडीचे दुकान आहे. बुधवारी नेहमीप्रमाणे रात्री दुकान बंद करून चौधरी घरी गेले. मात्र, गुरुवारी सकाळी जेव्हा ते दुकान उघडण्यासाठी आले तेव्हा दुकानाचे शटर अर्धवट उघडे असल्याच त्यांच्या निदर्शनास आले. दरम्यान, चौधरी यांनी आत जाऊन पाहिले असता काऊंटरसमोर रचलेल्या भारी अणि महागड्या साड्या चोरीला गेल्याचे त्यांच्या लक्षात आले. यानंतर त्यांनी पोलिसात धाव घेत याबाबत माहिती दिली.

हेही वाचा - गोपीचंद पडळकरांवर राष्ट्रवादीच्या नेत्यांची चौफेर टिका

दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत सीसीटीव्ही फुटेज तपासले असता महिला चोरट्यांनी या साड्या लांबवल्याचे उघड झाले आहे.

अज्ञात महिला चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल -

गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास तोंड बांधलेल्या दोघा महिलांनी तोंडात टॉर्च पकडत टॉर्चच्या प्रकाशात दोन मोठ्या प्लास्टिक पिशवीमध्ये साड्या गोळा करून दुकानातून पलायन केले, असे सीसीटीव्हीत दिसून आले आहे. याप्रकरणी सातपूर पोलिसात अज्ञात महिला चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहरातील वाढत्या चोरीच्या घटनांमुळे शहरातील व्यावसायिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.