ETV Bharat / state

नाशिक : पुनद धरणातून तीन हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग

author img

By

Published : Jul 30, 2019, 9:01 PM IST

संततधार पावसामुळे कळवण, सटाणा, मालेगाव, देवळाली या तालुक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या पुनद धरणातून तीन हजार क्‍युसेक पाणी टप्प्या-टप्प्याने सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.

संततधार पावसामुळे कळवण, सटाणा, मालेगाव, देवळाली या तालुक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या पुनद धरणातून तीन हजार क्‍युसेक पाणी टप्प्या-टप्प्याने सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.

नाशिक - संततधार पावसामुळे कळवण, सटाणा, मालेगाव, देवळाली या तालुक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या पुनद व चणकापूर धरणांच्या पातळीत वाढ झाली आहे. धरण परिसरातील सततच्या पावसाने जलसंपदा विभागाने पुनद धरणातून तीन हजार क्‍युसेक पाणी टप्प्या-टप्प्याने गिरणा नदीपात्रात सोडण्याचा निर्णय घेतला आहे.

सध्या पुनद मध्ये 50% व चणकापूर धरणात 39% पाणीसाठा झाल्याने हा निर्णय घेण्यात आला असून, प्रशासनाने गिरणा काठच्या गावांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

संततधार पावसामुळे कळवण, सटाणा, मालेगाव, देवळाली या तालुक्यांना पाणीपुरवठा करणाऱ्या पुनद धरणातून तीन हजार क्‍युसेक पाणी टप्प्या-टप्प्याने सोडण्याचा निर्णय जलसंपदा विभागाने घेतला आहे.

हवामान खात्याकडून पुढील दोन दिवसात पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. यामुळे खरिप हंगामातून मोठ्या प्रमाणात उत्पादन होण्याच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत. यंदाच्या पावसाने जनावरांचा चारा तसेच कसमादे परिसरातील पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही सुटणार आहे.

नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यात सर्वात कमी पाऊस पडल्याने स्थानिक शेतकरी वर्गात नाराजी होती परंतू, दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने शेतकरी सुखावला आहे.

कसमादे परिसरात जून व जुलै महिन्यात पडलेल्या पाऊसाची आकडेवारी -

1) देवळाली 3.2 / 167.9 मिमी
2)मालेगाव 4.0 / 278.0 मिमी
3)बागलाण. 24.0 /305.0मिमी
4)कळवण. 12.0 /168.0 मिमी

Intro:दोन दिवसांपासून संततधार पावसामुळे कळवण सटाणा मालेगाव देवळा या तालुक्यांना वरदान धरणारे पुनद व चणकापूर धरणात झपाट्याने पाणी वाढ होत आहे पुनद 50 टक्के तर चणकापुर 39 टक्के पाणिसाठा झाल्याने कसमादे परिसरातील जनतेमध्ये आनंदाचे वातावरण आहे...Body:धरण परिसरात पावसाची संततधार सुरूच असल्याने जलसंपदा विभागाने पुनद धरणातुन तीन हजार क्‍युसेक पाणी हे टप्प्या-टप्प्याने गिरणा नदीपात्रात सोडनार आहेत प्रशासनाने गिरणा नदीकाठच्या गावाना संर्तकतेचा ईशारा दिला आहे हे पाणी गिरणा नदीपात्रातील बंधारे भरत भरत मालेगाव पर्यंत पोहोचणार आहेConclusion:येत्या दोन दिवसात पुन्हा पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्या कडुन व्यक्त करण्यात आला आहे त्यामुळे आता खरिपाच्या पिकांच्या आशाही पल्लवित झाल्या आहेत
या पावसामुळे जनावरांचा चारा तसेच कसमादे परिसरातील पिण्याच्या पाण्याचाही प्रश्न सुटणार आहे

नाशिक जिल्ह्यात कळवण तालुक्यात सर्वात कमी पाऊस पडल्याने येथील शेतकरी वर्गात मोठी नाराजी दिसून येत होती परंतु दोन दिवसाच्या मुसळधार पावसाने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत

* कसमादे परिसात जुन,जुलै मध्ये पडलेल्या पाऊसाची आकडेवारी..
1) देवळा. 3.2 / 167.9 मिमी
2)मालेगाव 4.0 / 278.0 मिमी
3)बागलाण. 24.0 /305.0मिमी
4)कळवण. 12.0 /168.0 मिमी
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.