ETV Bharat / state

शिथीलता मिळताच नंदुरबारकरांची बाजारात गर्दी, सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

author img

By

Published : May 5, 2020, 9:53 AM IST

Updated : May 5, 2020, 11:08 AM IST

शिथीलता मिळताच बाजारात नंदुरबारकरांची गर्दी
शिथीलता मिळताच बाजारात नंदुरबारकरांची गर्दी

जिल्हाधिकार्‍यांनी सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत काही बाबींना शिथीलता देत व्यवहार सुरु करण्याचे आदेश जारी केले. परंतु, मिळालेल्या शिथीलतेचा फायदा घेत नागरिकांनी गर्दी केल्याने नंदुरबार शहरासह तळोद्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. बँकांसह दुकानांसमोर ग्राहकांची मोठी गर्दी झाल्याने बाजारपेठेला यात्रेचे स्वरुप आले.

नंदुरबार - दीड महिन्यांच्या लॉकडाऊननंतर जिल्हाधिकार्‍यांनी सकाळी 8 ते दुपारी 12 पर्यंत काही बाबींना शिथीलता देत व्यवहार सुरु करण्याचे आदेश जारी केले. परंतु, मिळालेल्या शिथीलतेचा फायदा घेत नागरिकांनी गर्दी केल्याने नंदुरबार शहरासह तळोद्यात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. बँकांसह दुकानांसमोर ग्राहकांची मोठी गर्दी झाल्याने बाजारपेठेला यात्रेचे स्वरुप आले.

नंदुरबार जिल्ह्यात कोरोनाचे रूग्ण वाढत असल्याने गेल्या दीड महिन्यापासून संपूर्ण जिल्ह्यात संचारबंदी लागू केली आहे. त्यामुळे, वर्दळीच्या रस्त्यांसह बाजारेपठांमध्ये शुकशुकाट होता. तर अत्यावश्यक सेवा वगळता सर्वच व्यवहार बंद होते. काही जीवनाश्यक वस्तुंच्या खरेदीसाठी दुपारी 12 पर्यंत मुभा दिली होती. अशात आता शिथीलता मिळताच नागरिकांना रस्त्यांवर गर्दी केली. नंदुरबार जिल्हा ग्रीनमधून ऑरेंज झोनमध्ये जात असून जिल्ह्यात कोरोनाबाधितांची संख्या 19 झाली आहे.

शिथीलता मिळताच नंदुरबारकरांची बाजारात गर्दी

शासनाच्या आदेशानुसार ग्रीन व ऑरेंज झोनमधील काही व्यवहारांना शिथीलता देण्याचे आदेश जिल्हा प्रशासनाला प्राप्त झाले. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांनी 4 मेपासून जिल्ह्यातील काही बाबींना सकाळी 8 ते 12 वाजेपर्यंत शिथीलता दिली. यामुळे नंदुरबार शहरातील नेहरु पुतळा, जुनी नगरपालिका, स्टेशन रोड, हाटदरवाजा, शास्त्री मार्केट, मंगळबाजार, माणिक चौक अशा विविध भागांमध्ये कपडे, मोबाईल, विद्युत साहित्य, कुलर, जनरल स्टोअर्सची दुकाने सुरु झाली. या वस्तुंच्या खरेदीसाठी नागरिकांची झुंबड उडाल्याने बाजारपेठेत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे दिसून आले.

सराफ बाजारही सकाळी सुरु करण्यात आला. मात्र, मर्यादित वेळ असल्याने ग्राहकांनी सराफ दुकानांकडे पाठ फिरवली. दरम्यान, पोलिसांनी बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारला. शहराबाहेरुन येणार्‍यांची वाहने जप्त करुन कारवाई केली. नंदुरबार शहरात शिथीलतेमुळे अनेक भागांमध्ये नागरिकांनी नियमांची पायमल्ली करत सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडविला. दरम्यान गर्दी करणार्‍या नागरिकांना प्रशासनातील पथक व पोलिसांनी सोशल डिस्टन्सिंगचा नियम पाळण्याचे सांगितल्यावर काही ठिकाणी वादही झाले.

Last Updated :May 5, 2020, 11:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.