ETV Bharat / state

खैरवे धरण फुटल्याची अफवा, कालव्याला गळती लागल्याने पडले मोठे भगदाड

author img

By

Published : Nov 2, 2019, 8:28 PM IST

नवापूर तालुक्यातील खैरवे धरणाच्या उजव्या कालव्याला गळती असल्याने मोठे भगदाड पडल्याची अफवा. कालव्याला लागलेल्या गळतीमुळे शेतीचे नुकसान.

खैरवे कालव्याला गळती

नंदुरबार - नवापूर तालुक्यातील खैरवे धरणाचा उजवा कालव्याला गळती असल्याने मोठे भगदाड पडल्याची माहिती ग्रामस्थांना मिळाली. यासंदर्भातील माहिती सकाळच्या सुमारास समजल्यानंतर सरपंच आणि ग्रामस्थांनी संबधित जलसंपदा विभागाचे अभियंत्यांना संपर्क करून उपाययोजना करण्यास सांगितले. मात्र, या प्रकरणाची पहाणी करण्यासाठी जलसंपदा विभागाचे कर्मचारी रात्री उशीरा पोहोचले.

खैरवे कालव्याला गळती

खैरवे धरण फुटल्याच्या अफवांनी नवापूर तालुक्यातील चिमणीपाडा, आसलीपाडा, आंबाफळी, बोरचक, शेगवे गावातील गावकरी भयभीत झाले होते. उजव्या कालव्यात विमोचक जवळ गळती लागल्याने जवळील शेतात पाणी शिरले. यामुळे पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. या विषयी बोलताना धरण सुरक्षित आहे. धरणाला धोका नाही, कालवा बंद करण्यात आला आहे. धरणाच्या उजव्या कालव्यात विमोचन जवळ गळती लागली आहे. धरणाला कोणताही धोका नाही, असे सहायक अभियंते सुमान गावित यांनी सांगितले.

Intro:नंदुरबार- नवापूर तालुक्यातील खैरवे धरणाचा उजवा कालवा येथे लिंक असल्याने मोठे भगदाडे पडले आहे. सकाळच्या सुमारास लिंक झाल्याचे समजले. यासंदर्भात गावातील सरपंच व ग्रामस्थांनी संबंधित जलसंपदा विभागाचे अभियंते यांना संपर्क करून उपाययोजना करण्यास सांगितले, परंतू लवकर न येता जलसंपदा विभागाचे कर्मचारी रात्री उशीराने पाहणी करण्यासाठी आले.Body:खैरवे धरण फुटल्याचा अफवाने नवापूर तालुक्यातील चिमणीपाडा, आसलीपाडा, आंबाफळी, बोरचक, शेगवे गावातील भयभीत झाले आहे. उजवा कालव्याचा विमोचक जवळ लिंक झाल्याने जवळील शेतात पाणी गेल्याने पीक मालाचे नुकसान झाले आहे.

धरण सुरक्षित आहे धरणाला धोका नाही कालवा बंद करण्यात आला आहे. धरणाचा उजव्या कालव्या विमोचक नादुरुस्त झाल्याने लिंक झाले. ग्रामस्थांनी घाबरू नये. धरणाला कोणताही धोका नाही
सुमान गावित,
सहा अभियंते, जलसंपदा नंदुरबारConclusion:धरण सुरक्षित आहे धरणाला धोका नाही कालवा बंद करण्यात आला आहे. धरणाचा उजव्या कालव्या विमोचक नादुरुस्त झाल्याने लिंक झाले. ग्रामस्थांनी घाबरू नये. धरणाला कोणताही धोका नाही
सुमान गावित,
सहा अभियंते, जलसंपदा नंदुरबार
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.