ETV Bharat / state

नंदुरबार व शहादा या दोन तालुक्यातील सरपंचपद आरक्षण जाहीर

author img

By

Published : Jan 30, 2021, 5:31 PM IST

Nandurbar taluka sarpanch reservation
संरपंच आरक्षण जाहीर नंदुरबार

जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा या दोन तालुक्यातील 76 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत काल पार पडली. 76 पैकी 22 ग्रामपंचायतींचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी, 21 ग्रामपंचायतींचे नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गाकरीता, तर 3 ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जमाती आणि दोन ग्रामपंचायतींचे अनुसूचित जातीसाठी आरक्षण निश्‍चित झाले आहे.

नंदुरबार - जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा या दोन तालुक्यातील 76 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत काल पार पडली. 76 पैकी 22 ग्रामपंचायतींचे आरक्षण खुल्या प्रवर्गासाठी, 21 ग्रामपंचायतींचे नागरिकांच्या मागासवर्गीय प्रवर्गाकरीता, तर 3 ग्रामपंचायतींमध्ये अनुसूचित जमाती आणि दोन ग्रामपंचायतींचे अनुसूचित जातीसाठी आरक्षण निश्‍चित झाले आहे. या आरक्षण सोडतनुसार ग्रामपंचायतींच्या सरपंच पदावर विराजमान होण्याची संधी खुल्या प्रवर्गातील सदस्यांना मिळाली आहे.

माहिती देताना शहादाचे प्रांताधिकारी चेतन गिरासे

नंदुरबार तालुक्यात 41 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत

तालुक्यातील 41 ग्रामपंचायतींच्या 2020 ते 2025 या पाच वर्षातील सरपंच पदाची आरक्षण सोडत प्रक्रिया तहसील कार्यालयात घेण्यात आली. यावेळी तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्या उपस्थितीत ही सोडत घेण्यात आली. नंदुरबार तालुक्यातील 41 पैकी 28 ग्रामपंचायतींचे आरक्षण खुले निघाले असून हाटमोहिदा, बोराळे, सातुर्खे, तिसी, होळतर्फे रनाळे, समशेरपूर, कानळदे, नाशिंदे, आराळे, कार्ली, निंभेल, काकर्दे, विखरण, बलवंड, बह्याणे, सैताणे, कलमाडी, रजाळे, कंढरे, सिंदगव्हाण, भालेर, रनाळे, मांजरे, खोंडामळी, शनिमांडळ, तलवाडे खुर्द व असाणे या 22 ग्रामपंचायतींवर खुल्या प्रवर्गासाठी आरक्षण निश्‍चित झाले आहे.

हेही वाचा - कृषी कायद्याच्या विरोधात आंदोलन करताना आंबाबारीतील महिलेचा मृत्यू

तसेच, तलवाडे बु., अमळथे, कोपर्ली, तिलाली, बलदाणे, भादवड, नगाव, खोक्राळे, वैंदाणे, घोटाणे, खर्दे खुर्द अशा 11 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे आरक्षण निश्‍चित झाले आहे. तर, न्याहली या ग्रामपंचायतीसाठी अनुसूचित जमातीचे व जुनमोहिदा ग्रामपंचायतीकरीता अनुसूचित जातीचे आरक्षण निश्‍चित झाले. नंदुरबार तालुक्यातील 22 ग्रामपंचायती खुल्या प्रवर्गासाठी, 11 ग्रा.पं. नामाप्र, तर 2 ग्रामपंचायतींचे आरक्षण एस.टी. व एस.सीसाठी निश्‍चित झाले आहे.

शहादा तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींचे आरक्षण सोडत

शहादा तालुक्यातील बिगर आदिवासी क्षेत्रातील 35 ग्रामपंचायतींची आरक्षण सोडत काढण्यात आली. यात अनुसूचित जातीसाठी 1, अनुसूचित जमातीसाठी 2, नागरिकांच्या मागास प्रवर्गासाठी 10, तर सर्वसाधारण प्रवर्गासाठी 22 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण निश्‍चित झाले. शहादा येथील तहसील कार्यालयात 2020-25 या 5 वर्षासाठी तालुक्यातील 35 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाची आरक्षण सोडत प्रक्रिया पार पडली. प्रांताधिकारी डॉ. चेतन गिरासे, तहसीलदार डॉ. मिलिंद कुलकर्णी, निवडणूक नायब तहसीलदार राजेंद्र नांदेड, नायब तहसीलदार पी.सी. धनगर, महसूल सहाय्यक किरण साळवे यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली. यावेळी पुष्पा सुनील पाडवी या मुलीच्या हस्ते ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सोडत काढण्यात आले.

शहादा तालुक्यात पुसनद ग्रामपंचायतीत अनुसूचित जातीसाठी आरक्षण निश्‍चित झाले. तसेच, टेंबे त.श.व कुर्‍हावद त.सा. या दोन ग्रामपंचायतीच्या सरपंच पदाचे अनुसूचित जमातीसाठी आरक्षण निघाले. तसेच, कौठळ त.सा., सोनवद त.श., बामखेडा ता.सा., करजई, डामरखेडा, ससदे, दोंदवाडे, शिरुडदिगर, नांदरखेडा, पुरुषोत्तमनगर या दहा ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाकरीता नागरिकांच्या मागास प्रवर्गाचे आरक्षण निश्‍चित झाले. तर, अनरद, कळंबू, कानडी त.श., कुर्‍हावद, खैरवे/भडगाव, टेंबे त.सा., तोरखेडा, देऊर, कामखेडा, पळासवाडा, फेस, बामखेडा त.त., बिलाडी त.सा., मनरद, मोहिदे त.श., लांबोळा, वरूळ त.श., वर्ढे, शेल्टी, सारंगखेडा, सावळदा, हिंगणी, कोठली त.सा. या ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण प्रवर्गासाठी निश्‍चित झाले आहे.

शहादा तालुक्यातील 35 पैकी 22 ग्रामपंचायतींच्या सरपंच पदाचे आरक्षण सर्वसाधारण, 10 ग्रामपंचायतींचे आरक्षण नागरिकांच्या मागास प्रवर्ग, तर 1 ग्रा.पं.त अनुसूचित जाती आणि दोन ग्रामपंचायतीत अनुसूचित जमातीसाठी आरक्षण सोडत झाली आहे. दरम्यान, जिल्ह्यातील नंदुरबार व शहादा तालुका मिळून असलेल्या 76 ग्रामपंचायतींपैकी 50 ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी खुल्या प्रवर्गातील, 21 ग्रा.पं.मध्ये नामाप्र व तीन ग्रा.पं.मध्ये अनुसूचित जमाती आणि दोन ग्रामपंचायतींच्या सरपंचपदी अनुसूचित जातीतील सदस्यांना संधी मिळाली आहे.

प्रांताधिकारी यांच्या देखरेखीत आरक्षण सोडत

आरक्षण सोडत ही नंदुरबार व शहादा तालुक्यातील सरपंच पदाच्या आरक्षणाची सोडत तहसील कार्यालयात काढण्यात आल्या. या प्रसंगी शहादाचे प्रांत अधिकारी चेतन गिरासे उपस्थित होते. तर, नंदुरबार येथे नंदुरबार प्रांताधिकारी वसुमना पंत, तहसीलदार भाऊसाहेब थोरात यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

हेही वाचा - आफ्रिकेतील सर्वोच्च शिखरावर फडकला तिरंगा; अनिल वसावेंनी केला विश्वविक्रम

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.