ETV Bharat / state

Grampanchayat Election 2022 : नंदुरबारमधील १९८ ग्रामपंचायतींसाठी सव्वा तीन लाख मतदार आज बजावणार हक्क

author img

By

Published : Oct 16, 2022, 10:19 AM IST

Updated : Oct 16, 2022, 3:43 PM IST

Grampanchayat Election 2022
ग्रामपंचायतींसाठी सव्वा तीन लाख मतदार आज बजावणार हक्क

ग्रामपंचायतींसाठी निवडणूक ( Grampanchayat Election 2022 ) प्रक्रिया पार ( Election process for Gram Panchayats ) पडत आहे. १९८ ग्रामपंचायतींसाठी सव्वा तीन लाख मतदार आज बजावणार हक्क. ( Quarter of three lakh voters will use their rights today )

नंदुरबार : जिल्ह्यातील २०६ ग्रामपंचायतींसाठी निवडणूक ( Grampanchayat Election 2022 ) प्रक्रिया पार पडत आहे. ( Election process for Gram Panchayats ) यात माघारीअंती तळोदा तालुक्यातील ४, नवापूर ३ तर अक्कलकुवा तालुक्यातील १ ग्रामपंचायत अशा एकूण ८ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. उर्वरित १९८ ग्रामपंचायतींसाठी आज प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया पार पडणार असून यात लोकनियुक्त सरपंच पदासाठी एकूण ७८१ उमेदवार नशीब आजमावणार आहेत.

धडगाव तालुक्यातील २५ ग्रामपंचायतींसाठी ३९ हजार, नवापूर तालुक्यातील ७८ग्रामपंचायतींसाठी १ लाख २२ हजार २०८ मतदार हक्क बजावणार आहेत. तसेच तळोदा तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतींसाठी ७३ हजार २५२ मतदार तर व अक्कलकुवा तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींसाठी ९० हजार १२९ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. कालच मतदान कर्मचारी मतदान केंद्रांवर रवाना झाले आहेत. कायदा आणि सुव्यवस्थेच्यादृष्टीने सुमारे १३५० पोलीस कर्मचाऱ्यांचा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. १९८ ग्रामपंचायतींसाठी सव्वा तीन लाख मतदार आज बजावणार हक्क. ( Quarter of three lakh voters will use their rights today )

ग्रामपंचायतींसाठी सव्वा तीन लाख मतदार आज बजावणार हक्क



अक्कलकुवा येथे 44 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक : अक्कलकुवा तालुक्यात तालुक्यातील ४४ ग्राम पंचायतींच्या निवडणूकीच्या मतदानासाठी निवडणूक यंत्रणेचे कर्मचारी मतदान केंद्राकडे रवाना झाले आहेत. अक्कलकुवा तालुक्यातील ४४ ग्रामपंचायतींसाठी आज दि.१६ ऑक्टोबर रोजी मतदान होणार आहे. ४४ ग्रामपंचायतींसाठी १५५ मतदान केंद्रावर मतदानाची प्रकिया पार पडणार आहे. ४४ सरपंच व ४०९ सदस्यांच्या निवडीसाठी मतदान होत आहे. मतदान प्रक्रियेसाठी आज सकाळी ९ वाजेपासून तहसिल कार्यालयात कर्मचाऱ्यांची आपले निवडणूक साहित्य घेण्यासाठी गर्दी जमली होती.

१५५ टीममधुन ७७५ कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना वेगवेगळ्या काउंटरवरुन नेमुन दिलेल्या ग्रामपंचायतींचे साहित्य कर्मचाऱ्यांनी ताब्यात घेतले. काल सकाळी ११ वाजेनंतर नेमुन दिलेल्या १६ बसेस व ६५ चारचाकी वाहनाद्वारे १५५ टीममधुन ७७५ कर्मचारी मतदान केंद्रांकडे रवाना झालेत तर १५ टीममधुन ७५ कर्मचारी हे राखीव ठेवण्यात आले आहेत. पोलीस बंदोबस्तात १ पोलीस उप अधिक्षक, १ पोलीस निरीक्षक, ८ पोलीस उप निरीक्षक, १५५ पोलीस, ३५ महिला पोलीस, २ एस.आर.पी. प्लाटून, १०४ होम गार्ड,१८ महिला होम गार्ड असा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस निरीक्षक अन्साराम आगरकर यांनी दिली. ग्रामपंचायतीच्या निवडणूकीसाठी ९० हजार १२९ मतदार मतदानाचा अधिकार बजावणार आहेत. मतदानासाठी यंत्रणा पाठविण्यासाठी सकाळपासुन तहसिलदार सचिन मस्के, निवासी नायब तहसीलदार दिलीप गांगुर्डे व तहसिल कार्यालयातील कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.


नवापुरात 81 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक : नवापूर तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने उद्या दि.१६ रोजी रविवारी ७८ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे. शनिवारी प्रशासनाने मतदान प्रक्रिया पार पाडण्यासाठी १५०० कर्मचाऱ्यांना मतदान केंद्रावर रवाना केले.
नवापूर तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीत ३ ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने ७८ ग्रामपंचायतीसाठी प्रत्यक्ष होणाऱ्या मतदान प्रक्रियेसाठी प्रशासन सज्ज झाले असून शनिवारी येथील वरिष्ठ महाविद्यालयाचा प्रशस्त प्रांगणात निवडणूक साहित्य वितरण करण्यात आले. नियुक्त कर्मचाऱ्यांनी आपापले निवडणुकीचे साहित्य घेवून तालुक्यातील ७८ ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी नवापूर तालुक्यातील एकूण २५४ मतदान केंद्रावर प्रत्येकी ६ कर्मचारी असे जवळपास १५२४ कर्मचारी रवाना झालेत. नवापूर तालुक्यातील ८१ ग्रामपंचायतीं पैकी ३ बिनविरोध झाल्याने रविवारी ७८ ग्रामपंचायतीसाठी मतदान होणार आहे.


पोलीस बंदोबस्तात रवाना : नवापूर तहसिलदार मंदार कुलकर्णी, नायब तहसिलदार जितेंद्र पाडवी, सुरेखा जगताप, दिलीप कुलकर्णी आदींच्या उपस्थितीत निवडणूक साहित्य वितरण करण्यात आले. मतदान प्रक्रियेसाठी मतदान केंद्राध्यक्ष, तीन सहकारी कर्मचारी व एक शिपाई असे कर्मचारी नियुक्त केले आहेत. यात प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिक, वरिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक महिला व पुरुष कर्मचारी असून तालुक्यातील विविध प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियुक्त कर्मचारी आपापल्या मतदान केंद्रावर ३७ एसटी बस तसेच निवडणूक विभागाने भाडे तत्वावर मागवलेल्या १५ खाजगी वाहनाद्वारे पोलीस बंदोबस्तात रवाना झाले. यावेळी आगार प्रमुख राजेंद्र अहिरे, वसंत गावीत, ज्ञानेश्वर पवार आदींसह नवापूर आगारातील कर्मचारी उपस्थित होते.


ग्रामपंचायत सदस्य पदासाठी १७१३ उमेदवार नशिब आजमावणार : निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पडावी यासाठी साठी पोलिस उपविभागीय पोलिस अधिकारी सचिन हिरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस अधिकारी व कर्मचारी व गृहरक्षक दलाचे जवानांसह असे २०० पोलिस कर्मचारी तैनात असणार आहे. ७८ ग्रामपंचायतींची निवडणूकीसाठी मतदान होणार आहे.सरपंच पदाच्या निवडणुकीत ३२२ उमेदवार रिंगणात आहेत तर ग्रामपंचायत सदस्य पदासाठी १७१३ उमेदवार नशिब आजमावणार आहेत. यांच्यासाठी ५९ हजार २६४ पुरुष तर ६४ हजार ४४ महिला असे एक लाख २२ हजार २०८ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत.


या गावात आज होणार मतदान : मोठे कडवान, लहान कडवान, खानापूर, चितवी,नगारे,निजामपूर, बिलमांजरे,भवरे,मेंहदीपाडा, वागदी, आमलाण,खातगाव,नागझरी, सोनपाडा, हळदाणी,घोडजामणे, चिखली,चौकी, नावली, बंधारफळी, बिजगाव, शिर्वे, कोकणीपाडा, झामट्यावड, देवमोगरा,भादवड, रायपुर, वडखुट, वडदे, करंजाळी, तारापूर, भरडू, लक्कडकोट, सावरट, चोरविहीर, बोकळझर-वडफळी, बोरपाडा, करंजी बुद्रुक, कामोद, दापूर, देवलीपाडा, निमदर्डा, मळवान, मौलीपाडा, वडसत्रा, अंजने, करंजीकेलपाडा, झामणझर, तलाविपाडा, नवागाव, बिलदा,उबर्डी, कोळदा, खांडबारा, देवलीपाडा, पांघराण, बंधारे, मोगरानी, आमपाडा, कारेघाट, खैरवे, जामदा, बालअमराई, वासदा, सोनारेदिगर, चिंचपाडा, डोगेगाव, थुवा, दुभवे,नवापाडा,


तळोद्यात 55 ग्रामपंचायतींसाठी निवडणूक : तळोदा तालुक्यातील ५३ ग्रामपंचायतीसाठी मतदान प्रक्रियेसाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली असून ५३ ग्रामपंचायतीसाठी १६२ पदके केंद्रावर रवाना झाले आहेत. १६२ मतदान केंद्रावर एकूण ७३ हजार २५२ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहे.
तळोदा तालुक्यातील ५५ ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकांचा कार्यक्रम राज्य निवडणूक आयोगामार्फत जाहीर करण्यात आला आहे. ५५ ग्रामपंचायतींपैकी २ ग्रामपंचायत बिनविरोध झाल्याने ५३ ग्रामपंचायतीच्या सरपंच पदासाठी सार्वत्रिक निवडणुकींचा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. १६ ऑक्टोबर रोजी मतदान घेण्यात येणार आहे. त्यासाठी मतदान पथके शनिवारी मतदान केंद्रांवर रवाना झाली असून मतदानाची तयारी प्रशासनामार्फत पूर्ण करण्यात आली आहे. ५३ सरपंच जागेसाठी १९५ उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत तर सदस्यांचा ३८९ जागेसाठी एकूण ९३४ उमेदवार निवडणूक रिंगणात नशीब आजमावत आहेत. आज १६२ केंद्रावर मतदान प्रक्रिया पार पडणार आहे. यासाठी मतदान यंत्रणा सज्ज झाली आहे.


१६२ मतदान केंद्र : मतदान केंद्राध्यक्षांसह पाच जण असे एकूण १६२ मतदान केंद्रांवर एकूण ८१० जण केंद्रांवर रवाना झाले आहेत. याशिवाय प्रत्येकी झोनल ऑफिसर सोबत १ पथक रवाना झाले आहे.

Last Updated :Oct 16, 2022, 3:43 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.