ETV Bharat / state

नंदुरबार जिल्ह्यात 64 ग्रामपंचायतींसाठी 78 टक्के मतदान

author img

By

Published : Jan 16, 2021, 7:46 PM IST

Updated : Jan 16, 2021, 8:46 PM IST

नंदुरबार तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींसाठी 82.47 टक्के मतदान झाले आहे. नंदुरबार तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींपैकी 15 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 7 ग्रामपंचायतींसाठी काल (दि.15 जाने.) मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ठिकठिकाणी मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी मतदान केंद्रांना भेट देवुन मतदान प्रक्रियेची पाहणी केली.

gramPanchayat
नंदुरबार

नंदुरबार - जिल्ह्यातील 87 ग्रामपंचायतींपैकी 23 ग्रामपंचायती या आधीच बिनविरोध झाल्याने काल 64 ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान पार पडले. ग्रामीण भागात दिवसभर मतदारांचा उत्साह दिसून आल्याने मतदान केंद्राबाहेर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. नंदुरबार जिल्ह्यात 64 ग्रामपंचायतींसाठी 77.80 टक्के मतदान झाले.

नंदुरबार जिल्ह्यात 64 ग्रामपंचायतींसाठी 78 टक्के मतदान

तालुकानिहाय मतदान टक्केवारी

नंदुरबार तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींसाठी 82.47 टक्के, शहादा तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींसाठी 73.09 टक्के, अक्कलकुवा तालुक्यातील 1 ग्रामपंचायतीसाठी 81.31 टक्के, नवापूर तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींसाठी 85.61 टक्के, तळोदा तालुक्यातील 7 ग्रामपंचायतीसाठी 79.24 टक्के मतदान झाले आहे. धडगांव-अक्राणी तालुक्यातील 16 ग्रामपंचायतींसाठी 76.51 टक्के मतदान झाले आहे.

मतदान प्रक्रियेत वृद्धांना तरुणांची मदत

सकाळपासूनच ग्रामीण भागातील मतदारांसह वृद्धांनी मतदानाचा मतदानाचा हक्क बजावला. युवकांनी वृध्दांना मदतकार्य करीत मतदान केंद्रांपर्यंत पोहोचवले. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनीही मतदान केंद्रांना भेटी देवुन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. दरम्यान सोमवार दि.18 जानेवारी रोजी तहसिल कार्यालयाच्या ठिकाणी मतमोजणी प्रक्रियेला प्रारंभ होणार आहे.

जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी मतदान केंद्रांना भेट

नंदुरबार तालुक्यातील 7 ग्रामपंचायतींसाठी 82.47 टक्के मतदान झाले आहे. नंदुरबार तालुक्यातील 22 ग्रामपंचायतींपैकी 15 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्याने 7 ग्रामपंचायतींसाठी काल मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. ठिकठिकाणी मतदान केंद्रावर पोलीस बंदोबस्त लावण्यात आला होता. जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारुड यांनी मतदान केंद्रांना भेट देवुन मतदान प्रक्रियेची पाहणी केली. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मतदान केंद्रांवर सॅनिटायझरची व्यवस्था करण्यात आली होती. सकाळपासूनच मतदान केंद्रावर मतदारांचा उत्साह दिसुन आला. दुपारी 11 वाजेनंतर मतदान केंद्रांवर मोठ्या प्रमाणावर मतदारांच्या रांगा लागल्या होत्या. कोपर्ली ग्रा.पं.साठी 82.43 टक्के, भालेर ग्रा.पं.साठी 76.40 टक्के, वैंदाणे ग्रा.पं.साठी 81.90 टक्के, कंढरे ग्रा.पं.साठी 91.56 टक्के, हाटमोहिदा ग्रा.पं.साठी 83.08 टक्के, भादवड ग्रा.पं.साठी 89.60 टक्के तर कार्ली ग्रा.पं.साठी 82.12 टक्के मतदान झाले आहे. नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक मतदान कंढरे ग्रा.पं.साठी 91.56 टक्के झाले आहे.

शहादा तालुक्यात 73 टक्के मतदान

शहादा तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींसाठी 73.09 टक्के मतदान झाले असून ग्रामपंचायत मतदानासाठी ग्रामीण भागातील मतदारांमध्ये सकाळपासूनच उत्साह दिसुन आला. कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर खबरदारी घेत मतदान प्रक्रिया पार पडली. शहादा तालुक्यातील 27 ग्रामपंचायतींपैकी 6 ग्रामपंचायती याआधीच बिनविरोध झाल्याने 21 ग्रामपंचायतींचा 164 जागांसाठी 368 उमेदवारांचे राजकीय भविष्य मतदान यंत्रात बंद झाले. शहादा तालुक्यातील सोनवद त.श.ग्रामपंचायतसाठी सर्वाधिक 87.01 टक्के तर सर्वात कमी टेंभे त.सा.बु.54.13 टक्के, मतदान झाले आहे. सकाळपासूनच शहादा तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींच्या मतदानासाठी मतदारांनी उत्साह दाखविला. 21 ग्रामपंचायतींच्या 164 जागांसाठी 368 उमेदवार निवडणूक लढवित होते. यासाठी 15 हजार 651 पुरूष व 14 हजार 611 असे एकुण 30 हजार 262 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. सकाळी 7.30 वाजेपासून ते दुपारी 3.30 वाजेपर्यंत 65.77 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला होता.

गावनिहाय झालेली मतदानाची टक्केवारी

शहादा तालुक्यातील कुकावल ग्रा.पं.साठी 83.22 टक्के, कोठली त.स.79.59 टक्के, कुर्‍हावद त.सा.69.69 टक्के, कवठळ त.सा.82 टक्के, फेस 62.85 टक्के, शेल्टी 74.04 टक्के, टेंभे त.श. 73.26 टक्के, मनरद 67.07 टक्के, डामरखेडा 73.01 टक्के, बामखेडा त.त.82.60 टक्के, तोरखेडा 63.70 टक्के, पुसनद 79.76 टक्के, सोनवद त.श.87.01 टक्के, टेंभे त.स.बुु.54.13 टक्के, मोहिदे त.श.76.93 टक्के, सारंगखेडा 61.50 टक्के, कानडी त.श.71.01 टक्के, राणीपुर 87.10 टक्के, कोटबांधणी 80.83 टक्के, नागझिरी 74.84 टक्के, असलोद ग्रा.पं.साठी 78 टक्के मतदान झाले असून शहादा तालुक्यातील 21 ग्रामपंचायतींसाठी एकुण 73.09 टक्के मतदान झाले आहे..

तळोदा तालुक्यात 79.24 टक्के मतदान

तळोदा तालुक्यातील 7 ग्रा.पं.साठी काल शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली असून एकुण 79.24 टक्के मतदान झाले आहे. महसूल व पोलीस प्रशासनातर्फे चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता. यात राणीपुर ग्रा.पं.साठी 83.95 टक्के, पाडळपुर ग्रा.पं.साठी 79.25 टक्के, बंधारा ग्रा.पं.साठी 88.67 टक्के, नर्मदानगर ग्रा.पं.साठी 78.59 टक्के, रेवानगर ग्रा.पं.साठी 85.49 टक्के, सरदारनगर ग्रा.पं.साठी 65.52 टक्के, रोझवा पुर्नवसन ग्रा.पं.साठी 72.75 टक्के असे एकुण तळोदा तालुक्यात 7 ग्रामपंचायतींसाठी 79.24 टक्के मतदान झाले आहे.
नवापूर तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींसाठी 85.61 टक्के मतदान

नवापूर तालुका

नवापूर तालुक्यातील 12 ग्रामपंचायतींसाठी काल 85.61 टक्के मतदान झाले आहे. यात कोठडा, रायंगण, नांदवन, वडकळंबी, उकळापाणी, चेडापाडा, उमराण, बंधारपाडा, केळी, पळसून, ढोंग, धनराट या ग्रामपंचायतींसाठी शांततेत मतदान पार पडले.

शांततेत मतदान

शहादा तालुक्यातील सारंगखेडा, तोरखेडा, असलोद मोहिदे या गावांमधील काही मतदान बुथ संवेदनशील होते. मात्र या गावात शांततेत मतदान पार पडले.

निवडणूक निरीक्षक वसुमना पंत यांची मतदान केंद्रांना भेट

शहादा तालुक्यातील सारंगखेडा व मोहिदेतर्फे शहादा या संवेदनशील असणार्‍या गावांना निवडणूक निरीक्षक वसुमना पंत, निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. मिलिंद कुलकर्णी यांनी भेट देवुन मतदान प्रक्रियेची पाहणी केली.

Last Updated : Jan 16, 2021, 8:46 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.