ETV Bharat / state

Black Magic Act case in Nanded : उपचाराच्या नावाखाली भोंदू बाबाकडून लूट; बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

author img

By

Published : Feb 8, 2022, 3:42 PM IST

Updated : Feb 18, 2022, 2:58 PM IST

भोंदूबाबा रुग्णांना ( Black Magic by duplicate Baba ) आपला आजार दवाखान्यातला नसून जादूटोणा केल्यामुळे झाल्याचा भासवायचा. त्यांच्याकडून पैसे उकळायचा. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी या भोंदू बाबाचा भांडाफोड करण्यात आली आहे. स्ट्रिंग ऑपरेशन करत भोंदूबाबा तौफिक याच्यावर बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ( Biloli police case against Baba ) झाला आहे.

http://10.10.50.85//maharashtra/07-February-2022/mh-ned01-robberyofbhondubabainthenameoftreatmentacasehasbeenregisteredatbilolipolicestation-vis-byte-mhc10010_07022022192444_0702f_1644242084_85.jpg
http://10.10.50.85//maharashtra/07-February-2022/mh-ned01-robberyofbhondubabainthenameoftreatmentacasehasbeenregisteredatbilolipolicestation-vis-byte-mhc10010_07022022192444_0702f_1644242084_85.jpg

नांदेड- जिल्ह्यात भोंदू बाबाचा प्रताप समोर आला आहे. बिलोली तालुक्यातील कासराळी येथे आजाराच्या नावाने पैसे उकळणाऱ्या भोंदू बाबावर गुन्हा दाखल ( Police case against con baba in Nanded ) करण्यात आला आहे.

उपचाराच्या नावाखाली भोंदू बाबाकडून लूट

आजारावर उपचारांच्या नावाखाली भोंदू बाबा जादूटोणा ( Robbery of Con baba ) करत असल्याची माहिती अंधश्रध्दा निर्मूलन समितीकडे ( Maharashtra Andhshradha Nirmulan Samiti ) आली होती. हा भोंदूबाबा रुग्णांना आपला आजार दवाखान्यातला नसून जादूटोणा केल्यामुळे झाल्याचा भासवायचा. त्यांच्याकडून पैसे उकळायचा. मिळालेल्या माहितीवरून पोलिसांनी या भोंदू बाबाचा भांडाफोड करण्यात आली आहे. स्ट्रिंग ऑपरेशन करत भोंदूबाबा तौफिक याच्यावर बिलोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल ( Biloli police case against Baba ) झाला आहे.

हेही वाचा-बारामतीत महावितरण अभियंत्याची गळफास घेऊन आत्महत्या; आत्महत्येचे कारण अस्पष्ट

करणी केल्याचे भासवून रुग्णांची केली जाते आर्थिक लूट-
नांदेड जिल्ह्यातील बिलोली तालुक्यामधील कासराळी येथील दस्तगीर दर्ग्यावरील तौफिक याच्याकडे दैनंदिन समस्या किंवा आजारावरील उपचारासाठी स्थानिक आणि आजूबाजूचे लोक जात असत. आपल्या समस्या घेऊन आलेल्या लोकांकडून तो २५१, ५०१ आणि १००१ रुपये घेत होता. समस्या घेऊन गेलेल्या लोकांना तुमचा आजार दवाखान्यात दुरुस्त होणार नाही, असे आरोपी सांगत होता. करणी केल्याचे तो रुग्णांना भासवून आर्थिक लूट करत होता.

हेही वाचा-Prisoner Committed Suicide : हर्सूल कारागृहात कैद्याची आत्महत्या, रुमालाने घेतला गळफास

भोंदूबाबाच्या बतावणीमुळे शेजाऱ्यांत व्हायचे वाद-
करणीच्या प्रकारामुळे गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. कासराळी येथील ईरन्ना बोरोड यांचा पाय दुखत असल्यामुळे उपचारासाठी ते तौफिकबाबाकडे गेले. यावेळी तौफिक याने अंगात आल्याचे भासविले. आपली भावकी रुक्‍मीनबाई बोरोड यांनी तुमच्यावर जादूटोणा केला असल्याचे त्याने सांगितले. तौफिक याने नाव सांगितल्यामुळे रूक्‍मीनबाईकडे लोक संशयाने बघायला लागले. त्यांच्याशी वादावादी-भांडण करू लागले. याबाबत त्यांनी नांदेडमधील अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडे तक्रार केली होती. अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मार्गदर्शनाखाली स्ट्रिंग ऑपरेशनची योजना बनवली. त्या योजनेनुसार सापळा रचून तौफिक याला भोंदूगिरी करताना रंगेहात पकडले. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने त्याचा भांडाफोड करून जादूटोणा विरोधी कायद्यानुसार ( Anti Superstition and Black Magic Act ) गुन्हा दाखल केला.

हेही वाचा-Narendra Modi In Rajya Sabha : राजकीय पक्षांच्या काही नेत्यांनी गेल्या 2 वर्षात अपरिपक्वता दाखवली - पंतप्रधान

अंधश्रद्धेविरुद्ध नागरिकांनी पुढे यावे-
कासराळीत घडलेला प्रकार अत्यंत धक्कादायक आहे. बिलोली तालुक्यतील कासराळी येथे घडलेल्या प्रकारामुळे गावात मोठी दहशत पसरली आहे. या प्रकाराची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने पावले उचलली. भोंदूबाबाच्या बतावणीमुळे गावात अनेकांकडे संशयाने पाहिले जात होते. अशा घटनांना आळा घालण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे. अंधश्रद्धेला खतपाणी घलणार्विऱ्याविरुद्ध कडक कारवाई केली जाईल, असे आवाहन अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे सदस्य सम्राट हटकर आणि पोलीस पोलीस निरीक्षक शिवाजी डोईफोडे यांनी केले आहे.

हेही वाचा-Video : राज्यसभेत पंतप्रधान मोदींकडून शरद पवारांचं कौतुक...

Last Updated : Feb 18, 2022, 2:58 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.