ETV Bharat / state

Praveen Darekar: राज्यातील वादग्रस्त घटनांना विरोधकांचे खतपाणी, प्रवीण दरेकर यांचा आरोप

author img

By

Published : Jun 7, 2023, 10:01 PM IST

Updated : Jun 7, 2023, 10:17 PM IST

राज्यातील धार्मिक हिंसाचाराला भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी विरोधकांना जबाबदार धरले आहे. या घटनांना विरधक खतपाणी घालत असल्याचे ते म्हणाले. नांदेड दोऱ्यावर त्यांनी हा आरोप केला.

Praveen Darekar
प्रवीण दरेकर

माहिती देताना प्रवीण दरेकर

नांदेड : राज्यात ज्या दगंली घडत आहेत. तर राज्यात गुप्तचर यंत्रणा अस्तित्वात आहे की नाही, असा सवाल विरोधकांनी केला आहे. त्यावर भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली. अडीच वर्षाच्या कालावधीमध्ये देखील गुप्तचर यंत्रणा अस्तित्वात होतीच ना. गुप्तचर यंत्रनेकडून जे जे माहिती होते. त्या नुसार कारवाई केली जात आहे. लोकांना पकडले जात आहे. देवेंद्र फडणवीस हे कोणाचीही हायगाई करणार नाहीत. गुप्तचर यंत्रणांमध्ये जर काही असेल तर त्याची दखल फडणवीस घेतील.



प्रवीण दरेकर यांनी केली सभास्थळाची पाहणी : नांदेडमध्ये येत्या दहा जून रोजी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची सभा होणार आहे. या सभेच्या तयारीचा आढावा भाजप नेते प्रवीण दरेकर आणि खासदार प्रताप पाटील यांनी आज घेतला. गेल्या नऊ वर्षात देशात मोठी विकास कामे झाली. त्यामुळे नांदेडची ही सभा ऐतिहासिक अशीच होईल असा दावा, प्रवीण दरेकर यांनी व्यक्त केला.

नितेश राणेंची कार्यकर्ता म्हणून भूमिका : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शांततेचे आवाहन करत आहेत. परंतु नितेश राणे हे तलवार काढण्याची भाषा करत आहेत. राणेंच्या वक्तव्याचे प्रवीण दरेकर यांनी समर्थन केले आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरकारची भूमिका मांडत आहेत. तर नितेश राणे हे कार्यकर्ता म्हणून भूमिका मांडत आहेत. असे म्हणत दरेकर यांनी राणेंच्या वक्तव्याला समर्थन दिले आहे.



पटोलेंच्या रोज नाना तऱ्हा : काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर टीका करताना दरेकर म्हणाले की, नाना पटोले यांचे वक्तव्य कोणी सिरियसली घेत नाही. नाना पटोलेंच्या रोज नाना तऱ्हा असतात. त्यामुळे नाना कधी वैचारिक बोललेत, कधी विकासात्मक प्रॉपर टीका केली. अशा प्रकारचे नाना पटोले यांचे प्रदेशाध्यक्ष म्हणून वक्तव्य असायला हवे, दुर्दैवाने ते होत नाही. त्यामुळे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा राजीनामा मागणे ही त्यांची ठरलेली स्टाईल आहे.

मंत्र्यांशी साधला संवाद : दरेकर पुढे म्हणाले की, जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद जनसंपर्क अभियानाला मिळत आहे. समाजातील प्रतिष्ठित लोकांनी येऊन आमच्या नेत्यांशी, मंत्र्यांशी संवाद साधला आहे. अगदी केंद्रीय मंत्री निर्मला सितारामन, ज्योतीरादित्य सिंधीया असतील अनेक केंद्रीय मंत्री, नेते यांचा महाराष्ट्रात 48 लोकसभा क्षेत्रात कार्यक्रमानिमित्त प्रवास झाला आहे. यावळी भाजपा खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, नांदेड जिल्ह्याचे अध्यक्ष व्यंकटराव पाटील गोजेगावकर, नांदेडचे भाजपा प्रभारी गजानन घुगे, प्रदेश उपाध्यक्ष डॉ. अजीत गोपछेडे, आमदार भीमराव केराम, माजी आमदार सुभाष साबणे, बा खोमणे यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा -

  1. Praveen Darekar On Sanjay Raut संजय राऊत यांनी शिवसेना बुडवली आता ते महाविकास आघाडी बुडवायला निघाले प्रवीण दरेकर
  2. Pravin Darekar on Supriya Sule ३ महिन्यात ५५१० मुली बेपत्ता सुप्रिया सुळेंना गृह खात्यावर बोलायचा
Last Updated : Jun 7, 2023, 10:17 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.