ETV Bharat / state

Nanded Crime : दारू पार्टी करताना मित्रांमध्ये पेटला वाद; गोळीबारात एक जण जखमी

author img

By

Published : Feb 10, 2023, 1:38 PM IST

दारू पार्टी करताना मित्रांमध्ये वाद झाला आणि त्यातूनच एका मित्राने दुसऱ्या मित्रावर गोळी झाडल्याचा प्रकार नांदेडमध्ये घडला. यात एक मित्र गंभीर जखमी झाला. त्यानंतर त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात भरती करण्यात आले. ही घटना शहरातील विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नूरी चौक परिसरात रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली.

Nanded Crime
नांदेड क्राईम

नांदेड : नांदेडच्या विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नूरी चौक, माळटेकडी परिसरात मित्रांची दारू पार्टी सुरू होती. यावेळी आरोपी संतोष लक्ष्मण कर्नेवार आणि त्याचा मित्र शेख इरफान शेख गुड्डू यांच्यात खाण्यापिण्याच्या क्षुल्लक कारणावरून वाद झाला. त्यातूनच संतोष कर्नेवार याने गावठी कट्ट्यातून फायरिंग केली. यावेळी शेख इरफान शेख गुड्डू ( वय २५ ) रा. मगदूमनगर, नई आबादी नांदेड हा जखमी झाला आहे. त्याला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. शेख इरफान याच्या पोटाजवळ गोळी लागल्याची माहिती मिळत आहे.


पोलिसांकडून तपास सुरू : घटनेची माहिती मिळताच अपर पोलीस अधीक्षक भरणे, पोलीस उपअधीक्षक सिद्धेश्वर भुरे, विमानतळ ठाण्याचे पोलीस निरीक्षक अनिरुद्धकाकडे यांच्यासह सहायक पोलीस निरीक्षक विजय जाधव, पोलीस उपनिरीक्षक बिरकुले आदींनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. त्याचबरोबर स्थानिक गुन्हे शाखेचे माने, पोलीस उपनिरीक्षक दत्ता काळे गंगाधर कदम, गणेश धुमाळ, तानाजी येळगे आणि त्यांच्या टीमने भेट देवून पाहणी केली. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून परिसरातील नागरिकांकडून घटनेची माहिती घेतली जात आहे. रात्री उशिरापर्यंत पोलिसांचे पथक नुरी चौक परिसरातच होते.


आरोपी अन् जखमीची गुन्हेगारी पार्श्वभूमी : नांदेड शहरातील गोळीबाराच्या घटना पोलिसांसमोर आव्हान निर्माण करणाऱ्या ठरत आहेत. अनेकांकडे गावठी पिस्टल आढळून येत आहेत. इतवारा परिसरात काही दिवसांपूर्वीच गोळीबाराच्या दोन घटना घडल्या होत्या. त्या घटना ताज्या असतानाच आता विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गोळीबाराची घटना घडली आहे. या घटनेतील आरोपी हे गुन्हेगारी पार्श्वभूमीचे असल्याचे स्थानिक गुन्हे शाखेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.


उशिरा गुन्हा दाखल : नूरी चौक परिसरात मित्रांची पार्टी सुरु होती. त्यात आरोपी संतोष कर्नेवार याने गावठी पिस्टलमधून गोळी झाडली, ती शेख इरफान शेख गुड्डू याला लागली. त्यात तो जखमी झाला आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु असल्याचे पोलिस निरीक्षक अनिरुद्ध काकडे यांनी सांगितले.

शनिवारीही असाच प्रकार: काँग्रेस कार्यकर्ता सविता गायकवाड हिने आपल्या साथीदाराच्या मदतीने स्वतवर गोळी झाडून दोघांना अडकविण्याचा प्रयत्न केला होता. त्यानंतर नांदेडात गोळीबाराची घटना घडली नव्हती. उलट पोलिसांनी अनेकांकडून गावठी पिस्तूल जप्त केले होते. नांदेडमध्ये शनिवार दि.4 तारखेला देखील अशीच घटना घडली होती. सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास वर्दळीच्या असलेल्या जुना मोंढा परिसरात गोळीबार झाला. सचिन कुलथे राहणार गाडीपुरा हा तरुण शारदा टॉकिज रस्त्यावर उभा होता. दुचाकीवरून आलेल्या गजानन बालाजी मामीलवाड याने त्यांच्यावर एक गोळी झाडली. ही गोळी कुलथे यांच्या दंडातून आरपार गेली. त्यामुळे ते जागेवर कोसळले होते.

हेही वाचा : Palghar Crime : बहिणीला त्रास देतो म्हणून मेव्हण्याने केला बहिणीच्या नवऱ्याचा खून

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.