ETV Bharat / state

जितेंद्र आव्हाड रेणुका मातेच्या दर्शनाला माहूर गडावर

author img

By

Published : Jan 2, 2021, 7:21 AM IST

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी माहुरमध्ये येऊन माता रेणुका देवीचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या समवेत अनेक कार्यकर्ते देखील हजर होते.

जितेंद्र आव्हाड
जितेंद्र आव्हाड

नांदेड - संपूर्ण जगाला कोरोनाच्या सावटाखाली 2020 हे वर्ष काढावं लागलं. देशवासियांनी कोरोनावर मात करत नवा संकल्प घेत, नवीन वर्षाच्या उत्सवांमध्ये सरत्या 2020 ला निरोप दिला. राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी नव्या वर्षाच्या पहिल्याच दिवशी माहुरमध्ये येऊन माता रेणुका देवीचे दर्शन घेतलं. यावेळी त्यांच्या समवेत अनेक कार्यकर्ते देखील हजर होते.

राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड

जितेंद्र आव्हाड यांच्या हस्ते माता रेणुका देवीची विधिवत पूजा अर्चना करण्यात आली. यावेळी माहूर देवस्थानच्या विविध उपक्रमांची माहिती मंत्री आव्हाड यांनी घेतली. माहूर गड हे व महाराष्ट्रातील शक्तिपीठ मानले जाते. रेणुका देवीचे मंदिर शहरापासुन सुमारे 2.415 किमी अंतरावर डोंगरावर वसलेले आहे. देवगिरीच्या यादवाचा राजाने देवीचे मंदिर सुमारे आठशे ते नऊशे वर्षांपूर्वी बांधल्याचं म्हटलं जात. दरवर्षी दसरऱ्याच्या दिवशी रेणुका देवीच्या सन्मानार्थ एक मोठा मेळा भरतो.

देवीच्या साडेतीन शक्तिपीठांपैकी एक मूळ जागृत पीठ म्हणजे, माहूरची श्री रेणुकामाता होय. श्री परशुरामाची माता म्हणूनही रेणुकामातेला ओळखले जाते. महाराष्ट्रातील अनेक परिवारांची ही कुलदेवता आहे. देवीचे मंदिर १३ व्या शतकात देवगिरीच्या यादवकालीन राजाने बांधले आहे असे म्हटले जाते. माहूरगडावरच श्री दत्तात्रयांचा जन्म झाला अशी भाविकांची श्रद्धा आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.