ETV Bharat / state

Dispute between MP Chikhlikar and MLA Shinde : आमदार-खासदारामध्ये नियोजन भवनात जुंपली, जिल्हा नियोजन समितीमध्ये झाला वाद

author img

By

Published : Jan 21, 2023, 6:51 PM IST

Dispute between MP Chikhlikar and MLA Shinde
खासदार चिखलीकर आणि आमदार शिंदे वाद

नांदेड जिल्हा नियोजन मंडळाची बैठक मतदारसंघाची आचारसंहिता असल्यामुळे पालकमंत्री गिरीष महाजन यांनी व्हिडीओ कॉन्फ्ररन्सिंगच्या माध्यमातून या बैठकीत सहभाग घेतला. या बैठकीत नांदेडचे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर तसेच लोहा-कंधारचे आमदार श्यामसुंदर शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाल्याचे समजते.

नांदेड : लोहा-कंधार मतदारसंघातील चिखली येथे नव्याने प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर झाले आहे. परंतु, जागेअभावी हे आरोग्यकेंद्र सुरू होऊ शकत नाही. ही बाब बैठकीत चर्चेला आल्यानंतर आमदार श्यामसुंदर शिंदे म्हणाले की, चिखलीची मंडळी आरोग्यकेंद्रासाठी जागा देणार नसतील तर जवळच असलेल्या माझ्या हाळदा गावात मी स्वतः आरोग्यकेंद्रासाठी जागा देण्यास तयार आहे. यावरून खासदार चिखलीकर आणि आमदार शिंदे यांच्यात जोरदार खडाजंगी झाली.


अधिकारीदेखील अवाक् : दाजी व मेव्हण्याचे नाते असलेल्या या दोघांमधील वाद सर्वश्रुत आहे. त्याची एक छोटी झलक पुन्हा नियोजन समितीच्या बैठकीत पहावयास मिळाली. वाद वाढणार त्यापूर्वीच स्वतः पालकमंत्र्यांनी ऑनलाईन मध्यस्थी करून बैठकीला वेगळे वळण लागू नये याची खबरदारी घेतली. तसेच पुढचा विषय चर्चेला घेऊन या वादावर पडदा टाकल्याचे सांगण्यात आले. वैयक्तिक हेव्यादाव्यातून घडलेल्या या प्रकारामुळे बैठकीला हजर असलेले अधिकारी देखील अवाक् झाल्याचे कळते. जिल्हा नियोजन मंडळाच्या बैठकीत जिल्हाधिकाऱ्यासह जिल्ह्यातील सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी उपस्थित असताना लोकप्रतिनिधींचे हे वर्तन अनेकांना रुचले नाही.

आमदार शिंदेंच्या मागण्या : माळेगाव यात्रेत पाण्याची सुविधा उपलब्ध नाही. त्यासाठी साठवण टँक बांधण्याची गरज आहे. कलंबर येथे ज्या शेतकऱ्यांची तलावात जमीन गेली त्यांना मोबदला मिळावा, लोहा येथे छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या सुशोभिकरणासाठी निधी देण्यात यावा आदी मागण्याही आमदार श्यामसुंदर शिंदे यांनी या बैठकीत केल्या. अनेक गावांमध्ये स्मशानभूमीसाठी शेड उपलब्ध नाही. तर काही ठिकाणी जागे अभावी स्मशानभूमीचे काम होऊ शकले नाही, ही बाबही बैठकीस उपस्थित असलेल्या आमदारांनी पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली.

पालकमंत्र्यांचे आश्वासन : जिल्हा परिषदेच्या इयत्ता आठवी ते दहावीच्या शाळांमध्ये मुलींसाठी चेंजिंग रूम असावी, अशी सूचना जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी केली. त्यावर पालकमंत्र्यांनी मॉडेल म्हणून सुरुवातीला २० ते २५ शाळांमध्ये हा उपक्रम राबविण्यात यावा, असे सांगितले. यासाठी जिल्हा परिषदेकडून प्रस्ताव प्राप्त झाल्यास जिल्हा नियोजन मंडळाकडून निधी उपलब्ध करून देण्यात येईल, असे आश्वासनही पालकमंत्री गिरीष महाजन यांनी दिले.

हेही वाचा : Anganwadi Servants March : विविध मागण्यांसाठी आयटक अंगणवाडी सेविकांचा गंगापूर तहसीलवर मोर्चा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.