ETV Bharat / state

'अर्धापूर तालुक्यातील खरीप पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे'

author img

By

Published : Sep 28, 2019, 7:32 PM IST

अर्धापूर तालुक्यातील खरीप पिकांचे नुकसान झाले आहे, या नुकसानीचे तातडीने पंचनामे करण्यात यावे आणि शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मिळावे, अशी मागणी शिवसेनेकडून करण्यात आली आहे.

अर्धापूर तालुक्यातील खरीप पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, यासाठी नायब तहसिलदारांना निवेहन

नांदेड - जिल्ह्यातील अनियमित व खंडीत पावसामुळे खरीपांच्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. यात जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान हे अर्धापूर तालुक्यात झाले असून, येथील शेतकऱ्यांना त्याचा मोठा आर्थिक फटका बसला आहे.

अर्धापूर तालुक्यातील खरीप पिकांच्या नुकसानीचे तातडीने पंचनामे करावे, शिवसेनेची मागणी

अर्धापूर तालुक्यातील झालेल्या नुकसानीचे कृषी विभागाने लवकरात लवकर सर्वेक्षण करावे. तसेच सरकारने येथील शेतकऱ्यांना तातडीने आर्थिक मदत द्यावी, अशा मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले आहे.

हेही वाचा... महाराष्ट्र बोलतोय... पाच वर्षांनंतरही गडचिरोलीतील बोदली गावातील समस्या कायम

अर्धापूर तालुका नायब तहसीलदारांना शिवसेनेकडून मागणीचे निवदेन

तालुक्यातील पावसाच्या लहरीपणाचा फटका खरीपातील सोयाबीन, मुग,उडीद यासह अन्य पिकांना बसला आहे. त्याचा परिणाम शेती उत्पन्नावर होत आहे. तसेच पिकांचेही खूप मोठे नुकसान झाले आहे. या झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून आर्थिक मदत देण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे. यासाठी या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने अर्धापूर तालुका नायब तहसीलदार डी. एन. जाधव यांना देण्यात आले आहे. यावेळी नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ता पाटील पांगरीकर, पंचायत समिती सदस्य अशोक कपाटे, शिवसेना तालुकाप्रमुख संतोष कपाटे आदी सदस्य उपस्थीत होते.

हेही वाचा... महाराष्ट्र बोलतोय : औरंगाबादचे नवमतदार म्हणतायत, 'निवडणूक ही मूलभूत प्रश्नांवर व्हावी'

Intro:अर्धापूर तालुक्यातील खरीपांच्या पिकांचे पंचनामे करून मदत घ्यावी शिवसेनेची मागणी....!


नांदेड : अनियमित व खंडीत पावसामुळे खरीपांच्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले असून शेतक-यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे. तालुक्यातील झालेल्या नुकासानीचे सर्वेक्षण करून शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले आहे.Body:अर्धापूर तालुक्यातील खरीपांच्या पिकांचे पंचनामे करून मदत घ्यावी शिवसेनेची मागणी....!


नांदेड : अनियमित व खंडीत पावसामुळे खरीपांच्या पिकांचे खूप मोठे नुकसान झाले असून शेतक-यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे. तालुक्यातील झालेल्या नुकासानीचे सर्वेक्षण करून शासनाने तातडीने आर्थिक मदत द्यावी या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने देण्यात आले आहे.

अर्धापूर तालुक्यात पावसाच्या लहरीपणाचा फटका खरीपातील सोयाबीन, मुग,उडीद यासह अन्य पिकांना मोठा फटका बसला असून त्याचा परिणाम उत्पन्नावर होणार आहे. तसेच पिकांचे खूप मोठे नुकसान झाले आहे. झालेल्या नुकसानीचे तातडीने सर्वेक्षण करून आर्थिक मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली असून या मागणीचे निवेदन शिवसेनेच्या वतीने नायब तहसीलदार डी.एन. जाधव यांना देण्यात आले..यावेळी नांदेड कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक दत्ता पाटील पांगरीकर, पं. स. सदस्य अशोक कपाटे, तालुकाप्रमुख संतोष कपाटे, प्रल्हाद इंगोले सदाशिव पाटील इंगळे, संतोष कदम, सचिन येवले, साहेबराव हट्टेकर, चेअरमन अवधुत कदम, संभाजी देशमुख,नंदकिशोर देशमुख, बाबुराव राजेगोरे, प्रभाकर किरकन, विलास कापसे, केरबा पिंपळपल्ले आदी उपस्थित होते.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.