ETV Bharat / state

Bharat jodo yatra : राहुल गांधी- आदित्य ठाकरे आज येणार साथ-साथ.. भारत जोडो यात्रेत होणार सामील

author img

By

Published : Nov 11, 2022, 9:39 AM IST

महाराष्ट्रात दाखल झालेल्या भारत जोडो यात्राचा ( Bharat jodo yatra ) आज 5वा दिवस सुरु आहे. आज युवासेना प्रमुख व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Former Environment Minister Aditya Thackeray ) सुद्धा सहभाग होणार आहे.

Bharat jodo yatra
भारत जोडो यात्रेत आदित्य ठाकरे होणार सामील

नांदेड : महाराष्ट्रात दाखल झालेल्या भारत जोडो यात्राचा ( Bharat jodo yatra ) आज 5वा दिवस सुरु आहे. काल जाहीर सभेनंतर यात्रा महादेव पिंपळगाव येथे मुक्कामी होती. यात्रेत आज युवासेनाप्रमुख व माजी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे ( Former Environment Minister Aditya Thackeray ) सुद्धा सहभाग होणार आहे. दुपारी 2.15 वाजता नांदेडच्या चौरंभा फाटापासून आदित्य ठाकरे हे सहभागी होतील. बंडखोर आमदार संतोष बांगर यांचा मतदारसंघात आदित्य काय बोलतील हे पाहावे लागणार आहे.

यात्रा आज नांदेड जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात : काँग्रेस नेते राहुल गांधी आज नांदेड जिल्ह्यातून वाशिम जिल्ह्यात जाणार आहेत. राज्यातल्या नांदेड, हिंगोली, वाशीम, अकोला आणि बुलढाणा अशा ५ जिल्ह्यातून 14 दिवस हि यात्रा तब्बल 384 किलोमीटरचा प्रवास करणार आहे. अकोला जिल्ह्यातील यात्रा मार्गांवर राहुल गांधी कारने प्रवास करणार आहेत.

आदित्य ठाकरे आज काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेत होणार सामील : राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा सध्या महाराष्ट्रात आहे. या यात्रेसाठी महाविकास आघाडीच्या सर्वच नेत्यांना आमंत्रीत केले आहे. राष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि शिवसेना नेते आदित्य ठाकरे आज काँग्रेस पक्षाच्या भारत जोडो यात्रेत सामील होणार आहेत. काल राष्ट्रवादीचे जयंत पाटील, सुप्रिया सुळे आणि जितेंद्र आव्हाड हे पण यात्रेत सहभागी झाले होते. संजय राऊत हे पण या यात्रेत सहभागी होउ शकतात, असे सांगण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.