ETV Bharat / state

सोनिया गांधींकडून नितीन राऊत यांच्या 'मिशन ऑक्सिजन'चे कौतुक

author img

By

Published : May 23, 2021, 9:44 PM IST

कोरोना महामारीच्या काळात जाणवणा-या भीषण ऑक्सिजन टंचाईवर मात करण्यासाठी, राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी राबविलेल्या ‘मिशन ऑक्सिजन’ या मोहिमेचे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कौतुक केले आहे. राज्यात तीन टप्प्यांत हे मिशन राबविले जात असून, यामध्ये राज्याला दररोज २०७० जंबो ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होणार असून, यामुळे हजारो लोकांचा जीव वाचणार आहे.

सोनिया गांधी
सोनिया गांधी

नागपूर - कोरोना महामारीच्या काळात जाणवणा-या भीषण ऑक्सिजन टंचाईवर मात करण्यासाठी, राज्याचे उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी राबविलेल्या ‘मिशन ऑक्सिजन’ या मोहिमेचे काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी कौतुक केले आहे. राज्यात तीन टप्प्यांत हे मिशन राबविले जात असून, यामध्ये राज्याला दररोज २०७० जंबो ऑक्सिजन सिलिंडर उपलब्ध होणार असून, यामुळे हजारो लोकांचा जीव वाचणार आहे.

कोरोना महामारीच्या काळात उर्जा विभागाने व काँग्रेस पक्षाच्या कार्यकर्त्यांनी केलेल्या कामाबद्दलची माहिती पत्राद्वारे डॉ. राऊत यांनी सोनिया गांधी यांना पाठविली होती. सोनिया गांधी यांनी उर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या नेतृत्वात सुरू असलेल्या राज्यातील विविध हॉस्पीटलला ऑक्सीजनचा पुरवठा करण्याच्या कामाचे कौतुक २१ मे रोजी पाठविलेल्या पत्राद्वारे केले आहे. तसेच महाराष्ट्र राज्यातील महाविकास आघाडी सरकार व कोरोनाचा सामना करण्यासाठी लढा देत असलेल्या राज्यातील लाखो कोरोना योद्ध्यांच्या कार्याला मनापासून पाठिंबा असल्याचे काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी यांनी पत्रात म्हटले आहे.

औष्णिक केंद्रातून ऑक्सिजनची निर्मिती

औष्णिक वीज केंद्रात वापरल्या जाणाऱ्या पाण्यात शेवाळ-सूक्ष्मजंतू होऊ नयेत यासाठी त्या पाण्यावर रासायनिक प्रक्रिया करण्यासाठी ओझोनायझेशन प्लांट स्थापित केलेले असतात. सर्व दक्षता घेऊन अशा प्लांटमधून अतिरिक्त यंत्रणा उभारून किमान ९५ टक्के शुद्धता असलेल्या वैद्यकीय ऑक्सिजन निर्मिती होऊ शकते. याच आधारावर अभ्यास करून ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांच्या मार्गदर्शनाखाली विद्युत विभागाची संपूर्ण यंत्रणा ऑक्सिजन प्लांट उभारणीच्या कामाला लागली. या ऑक्सिजन मिशनंतर्गत पहिल्या टप्प्यात महानिर्मितीच्या परळी वीज केंद्राने कमी दिवसांत युद्ध पातळीवर अंबेजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण रुग्णालयात ऑक्सिजन प्लांट उभारला. या प्लांटची क्षमता प्रतिदिन 288 जम्बो सिलिंडर इतकी आहे.

सोनिया गांधी यांचे पत्र
सोनिया गांधी यांचे पत्र

दुसऱ्या टप्प्यात खापरखेडा, पारस वीज केंद्रातून ऑक्सिजनची निर्मिती

दुसऱ्या टप्प्यात आता खापरखेडा, पारस वीज केंद्रातील सद्यस्थितीतील ओझोनायझेशन प्लांट नजीकच्या शासकीय रुग्णालयांच्या परिसरात स्थलांतरित करून, तिथून ऑक्सिजन निर्मिती केली जाणार आहे. खापरखेडा वीज केंद्राद्वारे तासी ४२ घनमीटर क्षमतेने आणि पारस वीज केंद्राद्वारे तासी ५० घनमीटर क्षमतेने ऑक्सिजन पुरवठा करण्यात येणार आहे. तसेच तिस-या टप्प्यात कोराडी(नागपूर), पारस(अकोला) आणि परळी (बीड) येथील वीज केंद्र परिसरातच रिफिलिंग किंवा बॉटलींग प्लांट उभारण्यात येणार आहेत.

हेही वाचा - पुण्यातील पहिले बाल कोविड सेंटर येरवडा येथे सुरू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.