ETV Bharat / state

Bacchu Kadu Role : रवी राणांची माघार आता बच्चू कडू भूमिका जाहीर करणार

author img

By

Published : Oct 31, 2022, 7:05 PM IST

दोन नेत्यांमधील वाद मिटवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थी केल्यानंतर वाद (Ravi Rana Vs Bacchu Kadu Controversy) बऱ्यापैकी निवळल्यासारखा वाटत आहे. आज बच्चू कडू यांचे मुंबईवरून नागपूरात आगमन (State Minister Bacchu Kadu Nagpur Arrival) झाले असता त्यांनी तसे संकेत दिले आहेत. आज सायंकाळी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून उद्या अमरावतीमध्ये (Bacchu Kadu Amravati Protest) आपली पुढील भूमिका जाहीर (Bacchu Kadu will announce his role tomorrow) करू,असे त्यांना स्पष्ट केले आहे.

Bacchu Kadu
बच्चू कडू

नागपूर: आमदार रवी राणा आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांच्यातील विकोपाला गेलेला वाद (Ravi Rana Vs Bacchu Kadu) अखेर शांत होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दोन नेत्यांमधील वाद मिटवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थी केल्यानंतर वाद (Ravi Rana Vs Bacchu Kadu Controversy) बऱ्यापैकी निवळल्यासारखा वाटत आहे. आज बच्चू कडू यांचे मुंबईवरून नागपूरात आगमन (State Minister Bacchu Kadu Nagpur Arrival) झाले असता त्यांनी तसे संकेत दिले आहेत. आज सायंकाळी कार्यकर्त्यांसोबत चर्चा करून उद्या अमरावतीमध्ये (Bacchu Kadu Amravati Protest) आपली पुढील भूमिका जाहीर (Bacchu Kadu will announce his role tomorrow) करू,असे त्यांना स्पष्ट केले आहे. Bacchu Kadu Role, latest news from Nagpur

बच्चू कडू म्हणाले, कार्यकर्ता माझा आत्मा - आमदार राणांनी दिलगिरी व्यक्त केली आहे. तर बच्चू कडू यांनी अद्यापही आपली भूमिका स्पष्ट केलेली नाही. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोघेही माझे नेते आहेत. त्यांनी वाद मिटवण्यासाठी पुढाकार घेतला. परंतु मी कोणताही निर्णय घेऊ शकत नाही. कार्यकर्ता माझा आत्मा आहे. ते जो आदेश देतील ते मान्य करणे बाध्य असल्याचे बच्चू कडू यांनी व्यक्त केले आहे.


कार्यकर्त्यांसोबत बैठक घेतल्यानंतर निर्णय घेऊ: आज सायंकाळी कार्यकर्त्यांसोबत बैठक घेणार आहो. त्यानंतर उद्या आमचा जाहीर मेळावा आहे. राज्यभरातले कार्यकर्ते येणार आहेत. तेथे चर्चा करून आमची पुढील भूमिका आम्ही स्पष्ट करू असं त्यांनी सांगितले आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.