ETV Bharat / state

अखेर 'ते' पेपर १८ ऑक्टोबरला होणार, नागपूर विद्यापीठाच्या मूल्यमापन विभागाची माहीती

author img

By

Published : Oct 15, 2020, 10:53 AM IST

९ ऑक्टोंबर रोजी नागपूर विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परिक्षेत तांत्रिक घोळ झाला होता. त्यामुळे त्या दिवशीचे सगळे पेपर रद्द करून ते पेपर लवकरच घेऊ असे विद्यापीठाने सांगितले होते. अखेर 'ते' रद्द झालेले पेपर आता १८ ऑक्टोंबरला घेण्यात येणार आहे. तांत्रिक अडचणी आता दूर झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची स्पष्टोक्ती संबंधित विभागाने दिली आहे.

http://10.10.50.85:6060//finalout4/maharashtra-nle/thumbnail/15-October-2020/9180338_826_9180338_1602738579788.png
Nagpur university online exam

नागपूर- ९ ऑक्टोंबर रोजी नागपूर विद्यापीठातील अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परिक्षेत तांत्रिक घोळ झाला होता. त्यामुळे त्या दिवशीचे सगळे पेपर रद्द करून ते पेपर लवकरच घेऊ असे विद्यापीठाने सांगितले होते. अखेर 'ते' रद्द झालेले पेपर आता १८ ऑक्टोबरला घेण्यात येणार आहे. तांत्रिक अडचणी आता दूर झाल्याने हा निर्णय घेण्यात आल्याची स्पष्टोक्ती संबंधित विभागाने दिली आहे. त्यामुळे फेर परिक्षेच्या या निर्णयामुळे हजारो विद्यार्थांना दिला मिळाला आहे.

नागपूर विद्यापीठाकडून घेण्यात येणाऱ्या अंतिम वर्षाच्या ऑनलाईन परिक्षेत दररोज नवनविन अडचणी समोर येत आहे. अगदी परिक्षेच्या पहिल्या दिवशीच तांत्रिक अडचणीमुळे अनेक विद्यार्थांना परिक्षा देता आली नाही. त्यामुळे त्या दिवशीचे सर्वच पेपर रद्द करण्यात आले. मात्र आता ते पेपर पुन्हा घेतले जाणार आहेत. १८ ऑक्टोंबरला ही फेर परिक्षा होणार आहे. यात वेळेचे नियोजन करूनच टप्प्याने परिक्षा घेतली जाणार आहे. विद्यापीठाकडून परिक्षे दरम्यान येणाऱ्या तांत्रिक अडचणी दूर करण्यात आल्यानंतर हा निर्णय संबंधित विभागाने जारी केला आहे. शिवाय विद्यार्थ्यांचे कोणतेही नुकसान होऊ नये यासाठीही विद्यापीठ पूर्ण प्रयत्न करत असल्याची स्पष्टोक्ती माहिती व मूल्यमापन विभागाकडून देण्यात आली आहे. त्यामुळे रद्द झालेले ते पेपर पुन्हा होत असल्यामुळे विद्यार्थांनाही मोठा दिलासा मिळाल्याचे चित्र आहे. असे असले तरी फेर परिक्षा घेतांना अडचणी आल्या तर पुन्हा तोच मानसिक त्रास सहन करावा लागणार असल्याची भिती विद्यार्थ्यांनी व्यक्त केली आहे. त्यामुळे ऑनलाईन यंत्रणा पूर्णतः सुरळीत करून या पुढील परिक्षेत विद्यार्थ्यांना अडचणी येणार नाही. याकडेही विद्यापीठाने लक्ष द्यावे. अशी भावनाही विद्यार्थ्यांकडून व्यक्त करण्यात येत आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.