ETV Bharat / state

Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरी यांच्या धमकी प्रकरणातील, अफसर पाशा नागपूर पोलिसांच्या ताब्यात

author img

By

Published : Jul 15, 2023, 8:52 PM IST

Nitin Gadkari Threat Case
अफसर पाशा नागपूर पोलिसांच्या ताब्यात

केंद्रीय भूपृष्ठ वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना आलेल्या धमकी आणि खंडणी प्रकरणामागील मास्टर माईंड दहशतवादी अफसर पाशा याला, नागपूर पोलिसांनी बेळगावच्या कारागृहातून अटक केल्यानंतर नागपुरात आणले आहे.

अफसर पाशा नागपूर पोलिसांच्या ताब्यात

नागपूर : नितीन गडकरी यांना आलेल्या धमकी आणि खंडणी प्रकरणामागील या प्रकरणात पाशाचे नाव समोर आल्यानंतर, दोन दिवसांपासून नागपूर पोलिसांचे एक पथक बेळगावात तळ ठोकून बसले होते. आज अखेर अफसर पाशाला अटक करण्यात आली आहे. अफसर पाशाला जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांच्या रिक्रुटमेंटसाठी पण जबाबदार मानले जाते. एवढ्या कुख्यात दहशतवाद्यांचा गडकरी यांच्या कार्यालयातील धमकी प्रकरणाशी काय संबंध आहे, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

बेळगावच्या तुरुंगात कैदेत होता : आरोपी अफसर पाशाचे लष्कर-ए-तैयबासह अनेक दहशतवादी संघटनांशी संबंध आहे ही, बाब देखील तपासात उघड झाली आहे. मास्टर माईंड कुख्यात दहशतवादी बशीरुद्दीन नूर अहमदला उर्फ अफसर पाशा लष्कर ए तोयबाचा कुख्यात दहशतवादी असून, २०१४ पासून बेळगावच्या तुरुंगात कैदेत होता. बेळगावच्या तुरुंगातच त्याने जयेश पुजारी उर्फ शाकीरचे ब्रेनवॉश करत त्याचा दहशतवादी नेटवर्कसाठी वापर करून घेतला होता. अफसर पाशावर २००३ च्या ढाका आणि २००५ च्या बेंगलूरु बॉम्ब ब्लास्टचा आरोप आहे. अफसर पाशाने जयेशला नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात फोन करून खंडणी मागण्यासाठी प्रवृत्त केले होते.



वर्षाच्या सुरुवातीला दोन वेळा दिली धमकी : या वर्षाच्या सुरुवातीच्या दोन महिन्यांत केंद्रीय मंत्री भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या नागपूर येथील जनसंपर्क कार्यालयात कर्नाटक राज्यातील बेळगाव कारागृहातुन जयेश पुजारी याने दोनदा धमकीचे फोन करून खंडणी मागितली होती. याप्रकरणी नागपूर पोलिसांनी दोन गुन्हे नागपूरात दाखल केले आहेत. तर या प्रकरणाचा तपास हाती घेतल्यावर एनआयएने बेंगळुरू येथे एक गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणात आता दहशतवादी अफसर पाशाचे नाव पुढे आल्याने, प्रकरणाचे गांभीर्य आणखी वाढले आहे.



पीएफआयच्या संपर्कात होता जयेश : जयेश पुजारा उर्फ शाकीरचे संबंध दहशतवादी संघटनांसोबत असल्याने नागपूर पोलिसांनी त्याच्यावर युएपीए अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. तो पीएफआय नॅशनल एक्झिक्यूटिव्ह कौन्सिलचा सचिव मोहम्मद अफसर पाशाच्या संपर्कात आला होता. त्यानंतर आणखी एका कट्टरवादी पदाधिकऱ्यांच्या तो संपर्कात होता अशी माहिती, तपासात पुढे आली आहे. त्यांनी जयेशचा ब्रेन वॉश केल्याचे पुढे आले आहे. नागपूर पोलिसांच्या तपासात जयेश पुजारीच्या दहशतवादी संघटनांशी संबंध असल्याबाबतचे महत्त्वाचे धागेदोर मिळाले आहेत.


हेही वाचा -

  1. Nitin Gadkari Extortion Case : नितीन गडकरी खंडणी प्रकरण; एनआयए ऐवजी नागपूर पोलीस दाखल करणार जयेश पुजारीविरोधात आरोपपत्र
  2. Nitin Gadkari : आपला देश हा दुःखी आत्म्याचा महासागर, आमदारांनी बांधले आहे मंत्रीपदाचे बाशिंग - नितीन गडकरी
  3. Nitin Gadkari Threat Case : नितीन गडकरींच्या धमकीचे धागेदोरे थेट लष्कर-ए-तोयबापर्यंत! मास्टमाईंडला अटक करण्याकरिता पोलीस बेळगावला रवाना
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.