ETV Bharat / state

Nagpur Crime : धक्कादायक! दगडाने ठेचून तरुणाची निर्घृण हत्या

author img

By

Published : Aug 1, 2023, 10:42 PM IST

Updated : Aug 2, 2023, 3:15 PM IST

Nagpur Crime
दगडाने डोकं ठेचून तरुणाची निर्घुनपणे हत्या

नागपूरमध्ये गुन्हेगारीच्या घटना वाढत चालल्या आहेत. संघर्षनगर येथे एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे.

माहिती देताना नरेंद्र नाईकवाड

नागपूर : पूर्व नागपूर भागातील नंदनवन पोलीस ठाणे हद्दीत असलेल्या संघर्ष नगर येथे एका तरुणाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आली आहे. तुषार किशोर इंगळे असे मृतकाचे नाव असून तो गंगाबाई घाट परिसरातील गुजर नगर येथील रहिवासी आहे. तुषारची हत्या कोणी व का केली यासंदर्भात अद्याप खुलासा झालेला नाही. पोलिसांनी अज्ञात आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. तसेच पोलिस परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासत आहेत.


ऑगस्ट महिन्याच्या सुरवातीलाच हत्येची घटना : नागपूर शहरातील संघर्षनगर, देशी दारू भट्टी समोरील मोकळ्या प्लॉटच्या जागेत ही घटना घडली आहे. अज्ञात आरोपीने तुषार इंगळे या तरुणाची दगडाने ठेचून हत्या केल्यानंतर छिन्नविच्छिन्न अवस्थेत मृतदेह सोडून पळ काढला आहे. घटनेची माहिती समजताच पोलिसांचे एक पथक ताबडतोब घटनास्थळी दाखल झाले आहे. साधारणता १५ ते २० वयोगटातील तरुणाची हत्या झाल्याचे निष्पन्न झाले.



ओळख पटवणे झाले अवघड : मृतकाचा चेहरा आणि शरीराचे इतर अवयव दगडाने ठेचल्यामुळे मृतदेहाची ओळख पटवणे कठीण झाले होते. नंदनवन पोलीस ठाण्यातील विविध पथकांनी मृतकाची ओळख पटवण्यासाठी प्रयत्न केला असता, तो तुषार किशोर इंगळे या १७ वर्षीय तरुणाचा असल्याची शंका आली. पोलिसांनी तुषारच्या कुटुंबीयांना मृतदेह दाखवला तेव्हा तो तुषारच असल्याचे समजले.



मजुरांनी दिली पोलिसांना माहिती : संघर्ष नगर आणि कामाक्षी नगर येथे दगडांवर मजुरांचे नक्षीकाम सुरू आहे. याच ठिकाणी मंगळवारी सकाळी मजूर कामावर पोहोचले असताना रक्ताच्या थारोळ्यात तरुणाचा मृतदेह दिसून आला. मजुरांनी घटनेची माहिती नंदनवन पोलिस ठाण्याला कळवली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

हेही वाचा -

  1. Nagpur Crime News : धक्कादायक ! २४ तासात जिल्ह्यात तीन वेगवेगळ्या घटनेत चौघांची हत्या
  2. Servant Murder Case Kalyan: रिव्हॉल्वर गहाळ केल्याच्या संशयातून नोकराचा खून करून मृतदेह जाळले
  3. Crime News : धक्कादायक! अवघ्या 100 रुपयांसाठी बापाने पोराचा गळा चिरला!
Last Updated :Aug 2, 2023, 3:15 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.