ETV Bharat / state

Gram Panchayat Election Result 2022 : कोल्हापूर जिल्ह्यातील ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल वाचा, एका क्लिकवर

author img

By

Published : Dec 20, 2022, 12:04 PM IST

आज कोल्हापूर ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल (gram panchayat election 2022 maharashtra result) आहे. रविवारी मतदान झाले होते. निवडणूकीचा निकाल आपण सविस्तर वाचू (Kolhapur Gram Panchayat Election Result 2022) या.

Gram Panchayat Election Result 2022
ग्रामपंचायत निवडणूक निकाल 2022

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील गावांचे सत्ताधारी कोण याचा फैसला आज होत (Kolhapur Gram Panchayat Election Result) आहे. या ग्रामपंचायतीसाठी रविवारी चुरशीने मतदान झाले होते. त्याच्या मतमोजणीला सकाळी 8 वाजता प्रारंभ झाला आहे. कोल्हापूर ग्रामपंचायत निवडणूकीचे निकाल जाणून घेवू या.


ग्रामपंचायत निवडणूक निकाल : कागल तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूकीचा निकाल जाहीर झाला आहे. बामणीत मुश्रीफ गटाला धक्का बसला आहे. सरपंचपदी राजे गटाने बाजी मारली आहे.
कसबा सांगाव तालुक्यातील कागल मुश्रीफ गटाला धक्का बसला आहे. राजे- मंडलिक गटाचा उमेदवार सरपंच पदी निवडून आला आहे. शिरोळ तालुक्यातील चौथी ग्रामपंचायत शिंदे गटाच्या ताब्यात गेली आहे. संभाजीपूरमधूनही सरपंच पदाचे शिंदे गटाचे सचिन कुडे उमेदवार विजयी झाले (Gram Panchayat Election Result 2022) आहे.


शिंदे गट : अकिवाटमधून सरपंच पदाच्या वंदना सुहास पाटील उमेदवार विजयी झाल्या आहेत. खिद्रापूरमधून सरपंच पदाच्या उमेदवार सारिका कुलदीप कदम विजयी झाल्या आहेत. टाकवडेमधून सरपंच पदाच्या उमेदवार सविता मनोज चौगुले विजयी झाल्या आहेत.
ठाकरे गट : वडणगे गावात शिवसेना ठाकरे गटाची सत्ता आली आहे. उमेदवार संगीता शहाजी पाटील 4679 मतांनी सरपंच पदी विजयी झाल्या (Kolhapur Gram Panchayat Election Result 2022) आहेत.



करवीर तालुका : करवीर तालुक्यातील कावणे गावात शुभांगी प्रतापसिंह पाटील (भाजप) सरपंच पदी निवडून आल्या आहेत. भाजपचे चार आणि काँग्रेसचे पाच असे सद्या करवीरमध्ये उमेदवार निवडून आले आहेत. भाजपने पहिल्याच निकालात खाते उघडले आहे. कागल तालुक्यातील पिराचीवाडी येथे मुश्रीफ गटाचे सर्वच्या सर्व उमेदवार तसेच सरपंच पदाचे उमेदवार कल्पना सुभाष भोसले विजयी झाल्या आहेत.
प्रयाग चिखलीमध्ये भाजप गटाची सत्ता, महाडिक गटाचे रघु पाटील सरपंच पदावर विजयी झाले आहे. हिरवडे खालसा गावात काँग्रेस शेकापचे सरपंच पदाचे उमेदवार नदाफ विजय झाले (Kolhapur Gram Panchayat) आहे.


पन्हाळा तालुका : गोटे गावात दिपाली विजय पाटील सरपंच पदी विजयी झाल्या आहेत. मोरेवाडी गावात रणजीत तांदळे सरपंचपदी विजयी झाल्या आहेत.
कागल तालुका : कागल तालुक्यात 26 पैकी 12 सरपंच पदाचे निकाल आले आहेत. राष्ट्रवादीचे 04 उमेदवार, भाजपचे 04 उमेदवार, शिंदे गटाचे 02 उमेदवार, ठाकरे गटाचे 02 उमेदवार निवडून आले आहेत. भाजप आणि राष्ट्रवादीमध्ये जोरदार लढत यावेळी दिसून (Kolhapur Gram Panchayat Election Result) आली.
शिरोळ : शिरोळमध्ये राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेने खोलले खाते आहे. हेरवाड ग्रामपंचायतीवर स्वाभिमानी आणि काँग्रेस आघाडीची सत्ता आली आहे. रेखा अर्जुन जाधव सरपंचपदी विजयी झाल्या आहेत.
आजरा : आजरा तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणूक पहिला निकाल आला आहे. चितळे ग्रामपंचायतवर भाजपचा झेंडा फडकला आहे. सरपंच उमेदवार रत्नप्रभा भुतुले विजयी विजयी झाल्या आहेत.
आजरा तालुक्यातील सरबळवाडी राष्ट्रवादीचा झेंडा फडकला आहे. सरपंच उमेदवार सुनिता कांबळे विजयी झाल्या आहेत.
राधानगरी : राधानगरी तालुक्यात शिंदे गटान खाते खोलले आहे. राधानगरी तालुक्यातील हसणे गावच्या पुजा शरद पाटील सरपंचपदी विजयी झाल्या (Gram Panchayat Election) आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.