ETV Bharat / state

international Womens Day Special 2023 : दोन मुलांचा सांभाळ करत नागपूरच्या झोयाने पटकावले मिसेस युनिव्हर्स स्पर्धेत तिसरे स्थान

author img

By

Published : Mar 8, 2023, 4:08 PM IST

नागपूरच्या झोया सिराज शेख यांनी बुल्गेरिया देशाच्या सोफिया शहारातील मिसेस युनिव्हर्स पेजेंट २०२२-२३ स्पर्धेत मोस्ट आर्टिस्टिक नॅशनल कॉस्च्यूम अवॉर्ड जिंकला आहे. स्पर्धेत थर्ड रनर-अपचा खिताब पटकावला आहे.

woman day special
झोया सिराज शेख

झोयाने शेखने मिसेस युनिव्हर्स स्पर्धेत पटकावले तिसरे स्थान

नागपूर : दोन लहान लेकरांचा सांभाळ करताना लग्नापूर्वी उघड्या डोळ्यांनी बघितलेल्या स्वप्नांच्या दिशेने झेप घेत नागपूर यथे राहण्याऱ्या एका गृहिणीने मोठी मजल मारली आहे. थेट बुल्गेरिया देशाच्या सोफिया शहारापर्यंतचा प्रवास पूर्ण केला आबे. मानाची समजली जाणारी मिसेस युनिव्हर्स पेजेंट २०२२-२३ सौन्दर्यवती स्पर्धेत मोस्ट आर्टिस्टिक नॅशनल कॉस्च्यूम अवॉर्ड जिंकत स्पर्धेत थर्ड रनर-अपचा खितांब पटकावला आहे. नुकतीच ही स्पर्धा संपन्न झाली आहे. झोयाने सिराज शेख असे या गृहीणेचे नाव आहे.

नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा : त्या केवळ गृहिणी नाही तर त्यांना समाजाप्रती आपण काही तरी देणे लागतो याची जाणीव आहे. त्या कारा फाऊंडेशन याच्या माध्यमातून समाजसेवा देखील करतात. याशिवाय त्या कारा प्रोडक्शन देखील चालवतात. झोया सिराज शेख यांनी मिळवलेल्या घवघवीत यशामुळे नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.




तीन खिताब मिळाले : झोया सिराज शेख यांना एकूण तीन खितांब मिळाले आहेत. त्यामध्ये मिसेस युनिव्हर्स बिलियन्स अवॉर्डचा देखील समावेश आहे. याशिवाय त्यांनी टॉप २५ मिसेस युनिव्हर्सच्या श्रेणीत देखील जागा मिळवत मिसेस युनिव्हर्स थर्ड रनर-अप म्हणून यश मिळवले आहे. मिसेस युनिव्हर्स पेजेंट २०२२-२३ ही स्पर्धा बुल्गेरिया देशाच्या सोफिया येथे सात दिवस चालली, त्यानंतर प्रायोजित यात्रा, सिटी टूर यासह कौटुंबिक हिंसाचाराच्या विरोधात जनजागृती सारख्या विषयांवर चर्चा सत्र देखील आयोजित करण्यात आले होते.

समाजसेवा एक मिशन : झोया सिराज शेख यांच्या मते समाजसेवेकडे एक मिशन म्हणून बघण्याची गरज आहे. तसे झाल्यास इतरांच्या दुःखाची जाणीव आपल्याला होईल. झोया गेल्या अनेक वर्षांपासून गरजू महिला आणि लहान मुलांच्या मदतीसाठी तात्पुर असतात, त्या कारा फाऊंडेशनच्या माध्यमातून अनेक योजना देखील राबतात.


कुटुंबाची भक्कम साथ करी संकटांवर मात : झोया यांनी सोफिया शहरापर्यंतचा केलेला प्रवास नक्कीच सोपा नाही. दोन लहान मुलांपासून दूर हजारो किलोमीटर दूर राहून स्वप्न पूर्तीसाठी केलेली जिद्द आज त्यांना यशाच्या रूपाने मिळाली आहे. पती सिराज शेख यांनी भक्कम साथ मिळाल्यामुळे इथपर्यंतचा टप्पा पार करता आल्याचे त्या सांगतात. फॅशन इंडस्ट्रीची जान झोया शेख यांना आहे त्यामुळेच आज त्यांचे नागपूरच्या फॅशन जगतात नाव होऊ लागले आहे.



हेही वाचा :International Womens Day 2023 : पोलीस दलातही सुरूवातीला करावा लागला संघर्ष , वरिष्ठ पोलीस निरीक्षक ज्योती देसाईंचा प्रवास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.