ETV Bharat / state

IND vs AUS Test Series: भारत आणि ऑस्ट्रेलिया 4 कसोटी सामन्यांची मालिका; भारतीय संघाने केला दोन सत्रात सराव

author img

By

Published : Feb 4, 2023, 8:43 AM IST

IND vs AUS Test Series
भारतीय संघाने दोन सत्रात केला सराव

भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात 4 कसोटी सामन्यांची मालिका सुरु होत आहे. या मालिकेतील पहिला सामना 9 फेब्रुवारीपासून नागपुरात सुरू होणार आहे. रवींद्र जडेजाने ऑगस्ट २०२२ मध्ये शेवटचा सामना खेळला होता. दुबईत झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताचा हाँगकाँगविरुद्ध सामना झाला होता. या सामन्यादरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती.

नागपूर: प्रदीर्घ कालावधीनंतर पुनरागमन करणाऱ्या रवींद्र जडेजाने ऑस्ट्रेलियाविरुद्ध ९ फेब्रुवारीपासून सुरू होणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यापूर्वी शुक्रवारी येथे नेटमध्ये जोरदार गोलंदाजीसह फलंदाजीसाठी पुरेसा वेळ दिला. ओल्ड सिव्हिल लाइन्स मैदानावर भारतीय खेळाडूंनी दोन वेगवेगळ्या सत्रात सराव केला. गुडघ्याच्या ऑपरेशनमुळे जवळपास पाच महिने मैदानाबाहेर असलेल्या जडेजाने अलीकडेच तामिळनाडूविरुद्धच्या रणजी ट्रॉफी सामन्यातून स्पर्धात्मक क्रिकेटमध्ये पुनरागमन केले. त्या सामन्यात त्याने सात विकेट घेतले. जडेजाने पहिल्या सत्रात पुरेसा वेळ गोलंदाजी आणि फलंदाजीचा सराव केला.

सरावात घेतला भाग: चेतेश्वर पुजारा, जयदेव उनाडकट आणि उमेश यादव वगळता बहुतेक खेळाडू मर्यादित षटकांच्या क्रिकेटमधून आलेले आहेत. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखालील संघ व्यवस्थापन प्रत्येक खेळाडूला जामठा येथील VCA स्टेडियमवर पहिल्या कसोटीपूर्वी पुरेसा सराव मिळावा यासाठी उत्सुक आहे. पहिल्या तुकडीने सकाळी अडीच तास सराव सत्रात भाग घेतला, तर दुसऱ्या तुकडीने दुपारी सराव केला. भारतीय संघाच्या 16 सदस्यांव्यतिरिक्त, राहुल चहर, वॉशिंग्टन सुंदर, रविश्रीनिवास साई किशोर आणि सौरभ कुमार या चार नेट गोलंदाजांनी सरावात भाग घेतला. नॅथन लियॉन, मिचेल स्वॅपसन आणि डावखुरा फिरकीपटू अ‍ॅश्टन आगर यांच्याशी सामना करण्याची भारत तयारी करत असल्याचे समजते.

श्रेयस अय्यर दुखापतीमुळे बाहेर: ज्या राज्यांचे संघ रणजी करंडक स्पर्धेतून बाहेर आहेत, त्या राज्यांतील फिरकीपटूंना सरावासाठी पाचारण करण्यात आले आहे. या चार फिरकीपटूंशिवाय मुख्य संघात चार फिरकीपटूंचा समावेश आहे. अशा प्रकारे भारतीय संघ आठ फिरकीपटूंसह सराव करत आहे. श्रेयस अय्यर दुखापतीमुळे बाहेर आहे आणि अशा परिस्थितीत केएल राहुल आणि शुभमन गिल यांनी संघाच्या मुख्य गोलंदाजांवर आणि नेटमध्ये थ्रोडाउनचा सराव केला आहे.

५ महिने क्रिकेटपासून दूर : रवींद्र जडेजाने ऑगस्ट २०२२ मध्ये शेवटचा सामना खेळला होता. दुबईत झालेल्या आशिया चषक स्पर्धेत भारताचा हाँगकाँगविरुद्ध सामना झाला होता. या सामन्यादरम्यान त्याच्या गुडघ्याला दुखापत झाली होती. दुखापतीमुळे त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यामुळे तो ५ महिने क्रिकेटपासून दूर होता. दुखापतीमुळे जडेजा ऑस्ट्रेलियात खेळल्या गेलेल्या T20 विश्वचषकात सहभागी होऊ शकला नाही.

ऑस्ट्रेलियाविरुद्ध चमकदार कामगिरी : जडेजा आणि अश्विन हे ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या संघातील मुख्य फिरकी गोलंदाज आहेत. ते पाचव्या किंवा सहाव्या क्रमांकावर फलंदाजीला येऊन मधल्या फळीला मजबूत करतात. जडेजाने 2016-17 मध्ये भारतात ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या शेवटच्या कसोटी मालिकेत चमकदार कामगिरी केली होती.

हेही वाचा: Joginder Sharma Retirement जोगिंदर शर्माची आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती T20 विश्वचषक 2007 च्या हिरोने घेतला संन्यास

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.