ETV Bharat / state

Nitin Gadkari Threat Call : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी प्रकरण; 'या' कुख्यात गुंडाचा सहभाग

author img

By

Published : Jan 15, 2023, 8:05 PM IST

Updated : Jan 15, 2023, 8:14 PM IST

Nitin Gadkari
नितीन गडकरी धमकी प्रकरण

केंद्रीय रस्ते व महामार्ग विकास मंत्री नितीन गडकरी यांनी जीवे मारण्याची धमकीचे फोन आल्याने राज्यात एकच खळबळ उडाली होती. नागपुरातील केंद्रीय मंत्री गडीकरींच्या जनसंपर्क कार्यालयात कॉल करून दाऊद इब्राहिम याच्या नावाने धमकी देण्यात आली होती आणि धमकी देणाऱ्याने 100 कोटींची देखील मागणी केल्याचे समोर आले होते. दरम्यान, या प्रकरणात जयेश कांथा नामक एका कुख्यात गुंडाचा सहभाग आढळून आला असून तो बेळगाव कारागृहात कैद आहे.

नागपूर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरींना जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी नागपूर शहरातील धंतोली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात जयेश कांथा नामक एका कुख्यात गुंडाचा सहभाग आढळून आला असून तो बेळगाव कारागृहात कैद आहे. त्याला 2016 मध्ये खुनाच्या गुन्ह्यात फाशीची शिक्षा झाली आहे. जयेश कांथावर कारागृहातुन पळून जाण्याचा गुन्हा दाखल असून खंडणी मगितल्याचा जुना रेकॉर्ड आहे.

पोलिसांचे पथक बेळगावला रवाना : नागपूर पोलिसांचे एक पथक बेळगावला पोहचले आहे. नागपूर पोलिसांनी आरोपीकडून डायरी जप्त केली आहे, त्यात कोणाचे नंबर आहे याचा तपास सुरू आहे. ज्या मोबाईलवरून धमकीचे कॉल आले तो मोबाईल कारागृहात असल्याने त्या संदर्भात बेळगावात गुन्हा दाखल केला जाणार आहे. तपास सध्या प्राथमिक पातळीवर आहे, आरोपीला फाशीची शिक्षा भोगत असल्याने कायदेशीर प्रक्रिया करून त्याला ताब्यात घेण्याचा प्रयत्न असेल, अशी माहिती पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांनी दिली आहे.


संपर्क कार्यालयात धमकीचा फोन : नितीन गडकरी यांचे नागपूरातील खामल्यात जनसंपर्क कार्यालय आहे. या कार्यालयात फोन आला. त्या फोनवरून बोलणाऱ्या व्यक्तीने दाऊद इब्राहिमचा हस्तक असल्याचे सांगून नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिली आणि काही सेकंदातच त्याने फोन कट केला. फोन घेणाऱ्याने लगचे भारतीय जनता पक्षातील वरिष्ठांना ही माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनाही माहिती देण्यात आली. अर्ध्या तासातच गडकरी यांच्या संपर्क कार्यालयाच्या सुरक्षेत वाढ केली आहे. तसेच, दहशतवाद विरोधी पथक आणि नक्षलवाद विरोधी अभियानाचे पथकासह अन्य यंत्रणा सतर्क झाली आहे.

एका तासात तीन कॉल: नितीन गडकरी यांच्या जनसंपर्क कार्यालयात सकाळी साडेअकरा वाजताच्या पहिला फोन आला. त्यानंतर साडे बारा वाजताच्या दरम्यान आणखी दोन फोन आले. पलीकडून बोलणा-या व्यक्तीने दाऊद ईब्राहिमचा हस्तक असल्याचे बोलत असल्याचे सांगितले. यावेळी आरोपीने नितीन गडकरी यांना जीवे मारण्याची धमकी दिली. यासंदर्भात भारतीय जनता पक्षातील नेत्यांना माहिती मिळताच त्यांनी कार्यालयाकडे धाव घेतली. स्थानिक पोलिसांसह दहशतवाद विरोधी पथक आणि नक्षलवाद विरोधी अभियानाच्या पथकासह अन्य यंत्रणा सतर्क झाले आहेत.

पोलीस बंदोबस्त वाढवला: पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी गडकरी यांचे वर्धा रोडवरील घर आणि खामल्यातील जनसंपर्क कार्यालयासमोर मोठा ताफा तैनात केला आहे. शस्त्रधारी पोलिसांची तुकडी तैनात करण्यात आली असून घराकडे आणि जनसंपर्क कार्यालयाकडे जाणारे रस्ते तात्पुरत्या स्वरुपात बंद करण्यात आले आहे. नागपूर पोलिसांची बॉम्ब शोधक व नाशक पथक आणि श्वानपथकही सज्ज ठेवण्यात आले आहे. पोलिसांनी परिसरातही बंदोबस्त वाढवला आहे.

हेही वाचा : Devendra Fadnavis in Beed : वॉटर ग्रीड योजनेविषयी उपमुख्यमंत्र्यांचे मोठे विधान, म्हणाले, मराठवाड्याला पाणी मिळण्यासाठी...

Last Updated :Jan 15, 2023, 8:14 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.