ETV Bharat / state

Aaditya Thackeray : कुणी खोके वाटतंय, कुणी पेढे - आदित्य ठाकरे

author img

By

Published : Dec 20, 2022, 5:00 PM IST

ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आघाडीवर असल्याचा आनंद भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Criticized Chandrasekhar Bawankule) यांनी विधानभवन परिसरात पेढे वाटून व्यक्त केला. यावर आमदार आदित्य ठाकरे (Former Minister Aditya Thackeray) यांनी कुणी खोके वाटतंय तर कुणी पेढे, अशी टीका केली. today Nagpur winter assembly session news

Aditya Thackeray
आदित्य ठाकरे

प्रतिक्रिया देतांना माजी मंत्री आदित्य ठाकरे

नागपूर : ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप आघाडीवर असल्याचा आनंद भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Criticized Chandrasekhar Bawankule) यांनी विधानभवन परिसरात पेढे वाटून व्यक्त केला. यावर आमदार आदित्य ठाकरे यांनी कुणी खोके वाटतंय तर कुणी पेढे, अशी टीका केली. विद्यमान सरकार केवळ 40 गद्दारांसाठी काम करत आहे. त्यांना जनतेचे प्रश्न सोडवायचे नाही, असा आरोप आदित्य ठाकरे (Former Minister Aditya Thackeray) यांनी केला आहे. today Nagpur winter assembly session news

सीमावादावर राज्याचे घटनाबाह्य मुख्यमंत्री उत्तर द्यायला तयार नाही. एका राज्याचे मुख्यमंत्री या मुद्यावर आक्रमक असताना दुसऱ्या राज्याचे मुख्यमंत्री बोलायला देखील तयार नाही, असे पहिल्यांदाच होत आहे. जो प्रश्न सर्वोच्च न्यायालयात सुटायला हवा तो रस्त्यावर मांडण्यात येत आहे.

आम्ही कर्नाटक राज्याबाबत दिल्लीला काय चर्चा झाली, ते जाणुन घेण्यास उत्सुक आहोत. कारण कर्नाटकचे मुख्यमंत्री प्रचंड राग व्यक्त करित असतांना, मात्र महाराष्ट्राचे मुख्यमंत्री घाबरट भुमिका घेतांना दिसत आहे. या सिमाप्रश्नाबाबत सरकारची भूमिका काय आहे, ते महाराष्ट्राच्या जनतेला बघायाचं आहे, असे म्हणत आताचे मुख्यमंत्री हे घटनाबाह्य आहे, अशी पुष्टी देखील यावाळी माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी जोडली. तसेच, मुंबईतील गोखले उड्डाणपुल आणि एनआयटी घोटाळ्याबाबत चौकशीची मागणी देखील चर्चासत्रा दरम्यान केली असल्याचे त्यांनी सांगितले.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.