ETV Bharat / state

नागपूर लोकसभा मतदारसंघातून ६, तर रामटेकमधून ३ उमेदवारांची नामांकने रद्द

author img

By

Published : Mar 27, 2019, 1:17 PM IST

Updated : Mar 27, 2019, 3:23 PM IST

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकसभेसाठी नाम निर्देशन पत्र सादर केलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुद्गल यांच्या उपस्थितीत पार पडली. रामटेक लोकसभा मतदारसंघातील अर्जाची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार

नागपूर - नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली. यामध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे ३, तर नागपूर लोकसभा मतदारसंघातून ६ उमेदवारांचे उमेदवारी अर्ज रद्द ठरविण्यात आले आहे. रामटेक मतदारसंघातील पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार सचिन शेंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे.

उमेदवारी अर्ज दाखल केलेले उमेदवार

जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकसभेसाठी नाम निर्देशन पत्र सादर केलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुद्गल यांच्या उपस्थितीत पार पडली. रामटेक लोकसभा मतदारसंघातील अर्जाची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके यांच्या उपस्थितीत घेण्यात आली.

नागपूर लोकसभा मतदारसंघातून बळीराजा पार्टीचे उमेदवार खुशबू बेलेकर, अपक्ष उमेदवार आनंदराव खोब्रागडे, अपक्ष उमेदवार मन्सूर जयदेव शेंडे आणि निलेश महादेवराव ढोके, विश्व शक्ती पक्षाचे योगेश रमेश जयस्वाल आणि कृष्णराव निमजे यांचे अर्ज रद्द करण्यात आले आहेत.

रामटेक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार गोपाल दुमाने, दिपक शेंडे आणि मीना मोडघरे यांचे अर्ज अवैध ठरले आहेत. याशिवाय रामटेक लोकसभा मतदारसंघातील पीपल्स पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार सचिन शेंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे. त्यामुळे छाननीनंतर रामटेक लोकसभा मतदारसंघात २०, तर नागपूर लोकसभा मतदारसंघात ३३ उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे.

Intro:लोकसभेच्या नागपूर आणि रामटेक लोकसभा मतदारसंघासाठी नामनिर्देशनपत्रांची छाननी प्रक्रिया आज पूर्ण करण्यात आली नामनिर्देशनपत्रांची छाननी मध्ये रामटेक लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांचे तर नागपूर लोकसभा मतदारसंघातून सहा उमेदवारांचे उमेदवारी अर्ज रद्द ठरविण्यात आले आहे रामटेक लोकसभा मतदारसंघातील पीपल्स पार्टी ऑफ इंडिया चे उमेदवार सचिन शेंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे तर छाननीनंतर रामटेक लोकसभा मतदारसंघात20 तर नागपूर लोकसभा मतदारसंघात 33 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे


Body:जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात लोकसभेसाठी नाम निर्देशन पत्र सादर केलेल्या उमेदवारी अर्जाची छाननी जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी अश्विन मुद्गल यांच्या उपस्थितीत झाली तर रामटेक लोकसभा मतदारसंघातील अर्जाची छाननी निवडणूक निर्णय अधिकारी श्रीकांत फडके यांच्या उपस्थितीत उमेदवारांच्या प्रतिनिधींसमोर पार पडली या अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत नागपूर लोकसभा मतदारसंघातून सहा उमेदवारांचे अर्ज बाद करण्यात आले आहे तर रामटेक लोकसभा मतदारसंघातून तीन उमेदवारांचे अर्ज अवैध ठरले आहेत नागपूर लोकसभा मतदारसंघातून बळीराजा पार्टीचे उमेदवार खुशबू बेलेकर अपक्ष उमेदवार आनंदराव खोब्रागडे अपक्ष उमेदवार मन्सूर जयदेव शेंडे निलेश महादेवराव ढोके विश्व शक्ती पार्टीचे योगेश रमेश जयस्वाल आणि कृष्णराव निमजे यांचे अर्ज बाद झाले आहे तर रामटेक लोकसभा मतदारसंघातील अपक्ष उमेदवार गोपाल दुमाने दिपक शेंडे आणि मीनाताई मोडघरे यांचा अर्ज अवैध ठरविण्यात आला आहे याशिवाय रामटेक लोकसभा मतदारसंघातील पीपल पार्टी ऑफ इंडियाचे उमेदवार सचिन शेंडे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे त्यामुळे छाननीनंतर रामटेक लोकसभा मतदारसंघात20 तर नागपूर लोकसभा मतदारसंघात 33 उमेदवारांचे अर्ज वैध ठरले आहे


Conclusion:
Last Updated : Mar 27, 2019, 3:23 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.