ETV Bharat / state

कापूस उत्पादक शेतकऱ्यांची लूट कधी थांबणार? पंतप्रधान मोदी यांना पत्र

author img

By

Published : Oct 22, 2020, 6:34 AM IST

शेती उत्पादकास त्याचा मूळ नफा न मिळता तो अडत्यांनाच मोठ्या प्रमाणात मिळतो. त्या प्रमाणे कापूस उत्पादक शेतकऱ्यांचीही परिस्थिती झाली आहे. कापडाचे दर वाढले. मात्र, कापसाचे दर जैसे थे आहेत..मग नफा कोण कमवते असा सवाल थेट पंतप्रधान मोदींना पत्र लिहून करण्यात आला आहे.

letter for pm modi
शेतकरी नेते विजय जावंधिया

नागपूर- सध्या राज्यातील राजकारण शेतकऱ्यांच्या मुद्द्यावर तापले असताना शेतकरी नेते विजय जावंधिया यांनी थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. देशातील कापूस उत्पादकांसह अन्य शेतकऱ्यांची सुरू असलेली लूट केव्हा थांबणार? असा थेट सवाल त्यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्राच्या माध्यमातून केला आहे.

०३ ऑक्टोबर या दिवशी अटल टनलच्या उद्घाटन वेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शेतकऱ्यांना संबोधित करताना दलाल, आणि अडत्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांची होणारी लुट थांबवण्यासाठी तीन कायदे आणले, असा दावा केला आहे. हिमाचल प्रदेश फळे, भाजीपाला उत्पादन करणारे प्रमुख राज्य आहे. सफरचंद ४०-५० रुपये किलो भावाने निघतात. दिल्लीत शंभर ते दीडशे रुपयांत पोहोचतात. मग, शंभर रुपये जातात कुठे? हीच व्यथा कापूस उत्पादकांची देखील आहे.

vijay jawandhihya letter to pm
पंतप्रधान मोदी यांना पत्र
vijay jawandhihya letter to pm
पंतप्रधान मोदी यांना पत्र

देशात कापसाचे भाव कमी असतात मात्र, कपड्यांचे भाव वाढतात ही स्थिती कायम असल्याचे जावंधिया यांनी म्हटले आहे. २०११-१२ साली ज्यावेळी देशात मनमोहन सिंग यांचे सरकार अस्तित्वात होते त्यावेळी ६० ते ६५ हजार रुपये खंडी रूईचे भाव होते. त्यावेळी मिल मालकांनी कापडाचे भाव वाढवले, ज्यामुळे कापडाचे भाव वाढले होते. आता गेल्या अनेक वर्षांपासून कापसाचे भाव सुमारे ४० हजार रुपये खंडी आहे. सद्यस्थितीत तर ३६ हजारे ३९ हजार रुपये खंडी आहेत. अशावेळी होजियरीचे भाव कमी झाले नाहीत. कापूस ते कापड हे गणित महाराष्ट्राला माहीत आहे. पण या मध्ये केवळ उद्योजकांचा फायदा होताना दिसतो आहे. मात्र कापूस उत्पादक शेतकरी अजूनही लुटला जातो. मग सफरचंदप्रमाणे कापसाचा नफा कुठे जात आहे. याचा शोध घेण्याची गरज निर्माण झाली असल्याचा प्रश्न विजय जावंधिया यांनी उपस्थित केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.