ETV Bharat / state

नागपूरकर डेंग्यूने त्रस्त, महापौर मात्र रेडिओ जॉकी बनण्यात व्यस्त - काँग्रेस

author img

By

Published : Sep 2, 2021, 7:13 AM IST

'नागपूरकर डेंग्यूने त्रस्त, महापौर मात्र रेडिओ जॉकी बनण्यात व्यस्त' असे फलक हातात घेऊन नारेबाजी करत युवक काँग्रेसने आंदोलन केले.

नागपूर
नागपूर

नागपूर : शहरात गेल्या काही दिवसात डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना दिसत आहेत. तर, मनपा प्रशासन बेजाबदार पद्धतीने वागत असल्याचा आरोप करत युवक काँग्रेसचे आंदोलन केले. यावेळी आंदोलक चक्क महापौर दालनात घुसले. यावेळी हातात शेणाच्या गवऱ्या घेऊन हे आंदोलन करण्यात आले. तसेच त्यांनी फॉगिंग मशीनच्या साह्याने धूर करत आंदोलन केले. यावेळी युवक काँग्रेसने जोरदार घोषणाबाजी केली. दरम्यान, 'नागपूरकर डेंग्यूने त्रस्त, महापौर मात्र रेडिओ जॉकी बनण्यात व्यस्त' असे फलक हातात घेऊन नारेबाजी करण्यात आली.

महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव अक्षय हेटे

डेंग्यू रुग्णसंख्येत वाढ

शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत आहेत. मोठ्या प्रमाणात घरा-घरात डेंग्यूचे रुग्ण सापडत आहेत. पण महानगर पालिकेकडून दुर्लक्ष केले जात आहे. शहरात 10 घरामागे डेंग्यूचे रुग्ण मिळत होते. ही संख्या आता जवळपास बाराशेच्या घरात जाऊन पोहोचली आहे. तर जवळपास 850 रुग्ण हे मेडिकलमध्ये उपचार घेत आहेत. पण शहरात कुठेही फॉगिंग मशीनने फवारणी केली जात नाही. यामुळे शहरात डेंग्यू वाढत असताना महानगर पालिका झोपी गेली आहे. त्यांना जागे करण्यासाठी हे आंदोलन करण्यात आल्याचे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे सचिव अक्षय हेटे यांनी म्हटले.

नागपुरात युवक काँग्रेसचे आंदोलन
नागपुरात युवक काँग्रेसचे आंदोलन

'नागपूरकर डेंग्यूने त्रस्त, महापौर मात्र रेडिओ जॉकी बनण्यात व्यस्त'

शहरात डेंग्यूचे रुग्ण वाढत असताना महापौर उपाययोजना करण्यापेक्षा ते रेडिओवर संवाद साधत रेडिओ जॉकी बनून काम करत असल्याचा आरोप आंदोलकांनी केला आहे. ' डेंग्यू रोखण्यासाठी मोहीम न रावबावता निवडणुका लक्षात घेऊन बुथ बैठका घेत आहेत. पण बाजूच्या घरात डेंग्यूने कोणी मेला तर त्याकडे लक्ष द्यायला त्यांना वेळ नाही. याना फक्त निवडणुकीचे वेध लागले आहे. फॉगिंग माशीन नाही, म्हणून महापौर यांना गवऱ्या देत आहे. आता याने फॉगिंग करा. पण लक्ष द्या', अशी भूमिका युवक काँग्रेसचे प्रदेश सचिव अक्षय हेटे यांनी मांडली.

हेही वाचा - खळबळजनक.. परभणीत सावकारांच्या जाचाला कंटाळून दोन तरुणांची आत्महत्या

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.