ETV Bharat / state

सरकारने चालत्या कामात खिळे टाकून पंक्चर करू नये - नितीन गडकरी

author img

By

Published : Sep 7, 2019, 7:19 PM IST

आम्हाला मदत नको पण, चालत्या कामात सरकारने खिळे टाकून ते काम पंक्चर करण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारला लगावला आहे.

सरकारने चालत्या कामात खिळे टाकून पंक्चर करू नये : नितीन गडकरी

नागपूर - सरकारी मदतीवरती आमचा बहिष्कार आहे. कोणत्याही कामात मी सरकारची मदत घेत नाही. आम्हाला मदत नको पण, चालत्या कामात सरकारने खिळे टाकून ते काम पंक्चर करण्याचा प्रयत्न करू नये, असा टोला केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी सरकारला लगावला आहे.

सरकारने चालत्या कामात खिळे टाकून पंक्चर करू नये : नितीन गडकरी


नागपूरमध्ये विदर्भ-मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाच्या सामंजस्य करार कार्यक्रमावेळी गडकरी बोलत होते. यावेळी राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर देखील उपस्थित होते.

हेही वाचा - नागपूर : अतिवृष्टीच्या इशाऱ्यामुळे शनिवारी शाळांना सुट्टी, पंतप्रधानांचा दौराही रद्द


माझे प्रयोग 'आउट ऑफ द बॉक्स' असतात. त्यामुळे कोणी सहजासहजी विश्वास ठेवत नाहीत. पण ते सगळे प्रयोग मी स्वतः यशस्वी करुन दाखवतो. त्यासाठी सरकारी मदत आणि सबसिडी मी घेत नाही. मला सबसिडी नको मात्र, चालत्या कामात सरकारने आडकाठी घालू नये, असे गडकरी म्हणाले. सरकारी मदती संदर्भात गडकरी यांनी यापूर्वी देखील वक्तव्य केलेली आहेत. नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेत उद्योग व्यवसायाला यशस्वी केले जाऊ शकते. त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे, असेही ते म्हणाले.

Intro:माझ्या कोणत्याही कामात मी सरकारची मदत घेत नसल्याचा पुनरुच्चार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलाय..सरकारी मदती वर आम्हाचा बहिष्कार असल्याचे सांगतांना नितीन गडकरी म्हणाले की आम्हाला मदत नको पण चालत्या कामात सरकारने खिळे टाकून ते काम पंचर करण्याचा प्रयत्न करू नयेBody:नागपुरात विदर्भ मराठवाडा दुग्ध विकास प्रकल्पाच्या सामंजस्य करार कार्यक्रमात केंद्रिय मंत्री नितीन गडकरी आणि राज्याचे पशुसंवर्धन आणि दुग्ध विकास मंत्री महादेव जानकर उपस्थित होते...यावेळी बोलताना गडकरी म्हणाले की माझे प्रयोग आउट ऑफ बॉक्स असतात त्यामुळे कोणी एका-एकी विस्वास ठेवत नाही पण ते सगळे प्रयोग मी स्वतः यशस्वी करत असतो ... त्यासाठी सरकारी मदत आणि सब्सिडी मी घेत नाही ... सरकारला मदत मागत नाही .... मला सबसिडी नको मात्र चालत्या कामात सरकारने खिळे टाकून ते काम पंचर करण्याचा प्रयत्न करू नये.... सरकारच्या मदती संदर्भात गडकरी यांनी या आधी सुद्धा वक्तव्य केलंल आहे ... नवीन तंत्रज्ञानाचा फायदा घेत उद्योग व्यवसायाला यशस्वी केलं जाऊ शकते त्या दृष्टीने प्रयत्न करण्याची गरज आहे

बाईट -- नितीन गडकरी -- केंद्रीय मंत्री
Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.