ETV Bharat / state

Babasaheb Ambedkar Jayanti : शांतीवन चिचोली येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मृति संग्रहालयात बाबासाहेबांच्या विविध वस्तुचे जतन

author img

By

Published : Apr 12, 2023, 11:01 PM IST

Updated : Apr 14, 2023, 6:07 AM IST

नागपूर जिल्ह्यातील शांतीवन चिचोली येथील महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तु संग्रहालयाचे उदघाटन रद्द करावे लागले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ॲानलाईन पद्धतीने उद्या वस्तू संग्रहालयाचे उद्घाटन होणार होते. मात्र, वस्तू संग्रहालयाचे कामच अपूर्ण असल्याने उद्घाटन रद्द करण्याची नामुष्की नागपूर सुधार प्रन्यास प्रशासनावर ओढवली आहे. निर्माणकार्य बरेच बाकी असल्याने आता सहा महिन्यानंतर पंतप्रधानांची वेळ मागितली जाणार आहे.

Babasaheb Ambedkar Jayanti
Babasaheb Ambedkar Jayanti

नागपूर : संविधान निर्माते बाबासाहेब आंबेडकर यांच्या १२५ व्या जयंती निमित्त शांतिवन चिचोलीच्या डॉ.बाबासाहेबांच्या स्मृति संग्रहालयाचे उद्घाटन करण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. मात्र, संग्रहालयाचे काम अपूर्ण राहिल्याने उद्घाटन कार्यक्रम रद्द करावा लागला आहे. परंतु काम पूर्ण होण्यापूर्वीचं उद्घाटनाचा बेत आखण्यात आला होता. वस्तू संग्रहालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आयुष्यभर वापरलेल्या अनेक वस्तूंचे जतन शांतीवन वस्तु संग्रहालयात करण्यात आले आहे. याशिवाय डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या अस्थी जतन करून ठेवल्या आहेत.

१७ कोटींचा प्रकल्प : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तूंचे जतन व्हावे ही सर्व देशवासियांची ईच्छा होती. म्हणून लोकभावनेचा आदर करत राज्याचे तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार यांच्या हस्ते १९९० साली नागपूर-काटोल मार्गावरील शांतीवन चिचोली येथे वस्तू (स्मृति) संग्रहालयाचे भूमिपूजन झाले होते. तब्बल सहा वर्षानंतर देशाचे तत्कालीन उपराष्ट्रपती के आर. नारायणन यांच्या हस्ते उद्घाटन झाले. तेव्हा पासून वस्तू संग्रहालय सुरू होते. मात्र, बाबासाहेबांच्या वस्तू, कपडे, इतर साहित्यांची अवस्था जीर्ण होत असल्याने त्यावर प्रक्रिया देखील करण्यात आली. मात्र, स्मृति संग्रहालय पुनर्निर्मितीसाठी केंद्र शासनाने २०१६ साली १७.३ कोटींचा निधी मंजूर केला होता.

संग्रहालय आहेत या वस्तू : शांतीवन चिचोली येथे डॉ.बाबासाहेब स्मृति संग्रहालयात चारशे पेक्षा अधिक वस्तूंचे जतन करण्यात आले आहे. यामध्ये बाबासाहेबांनी घातलेले विविध प्रकारचे कोट, शर्ट पॅण्ट, टाई, दऊत, लालटेन, वकिली कोट, टोप्या, पेन, छत्री, घरगुती कपडे, शेकडो पुत्तके, पेग्टींस, छडी, टाक, रेडीयो, चश्मासह अनेक वस्तूंचा समावेश आहे. एवढेच नाही तर, भारतीय राज्यघटनेचा मुळगाभा ज्यावर टाईप कला तो टाईप राईटर सुध्दा शांतीवन चिचोली येथे डॉ. बाबासाहेब स्मृति संग्रहालयात जतन करण्यात आला आहे.

राज्यातील पहिले संग्रहालय : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वस्तू, साहित्य संग्रहालय नागपूर शहरापासून १५ किलोमीटर अंतरावर आहे. नागपूर इम्प्रूव्हमेंट ट्रस्टने (एनआयटी) ४० कोटीं रुपये खर्च करून ११.५ एकर जागेवर विस्तार संग्रहालय विकसित करण्याचे नियोजन आहे. बाबासाहेब आंबेडकरांचे निकटवर्तीय स्वर्गीय वामनराव गोडबोले यांनी चिचोली गावात ११.५ एकर जागेत छोटेसे संग्रहालय विकसित केले होते.

हेही वाचा - Babasaheb Ambedkar Jayanti : बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त बार्टीतर्फे घर घर संविधान योजना

Last Updated : Apr 14, 2023, 6:07 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.