ETV Bharat / state

Asian Games 2023 : नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा, ओजस देवतळेची 'सुवर्ण' कामगिरी, जिंकलं तिसरं 'गोल्ड मेडल'

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Oct 7, 2023, 8:00 AM IST

Updated : Oct 7, 2023, 11:56 AM IST

Asian Games 2023
ओजस देवतळे

Asian Games 2023 : नागपूरच्या ओजस देवतळेनं आशियाई गेम्समध्ये तिसरं सुवर्णपदक जिंकलं आहे. ओजसनं तिसरं सुवर्ण पदक जिंकून नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे.

नागपूर Asian Games 2023 : आशियाई गेम्समध्ये नागपूरच्या ओजस देवतळेनं पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड या प्रकारात अंतिम सामना खेळत गोल्ड मेडल जिंकलं आहे. ओजसनं आशियाई गेम्समध्ये तीन गोल्ड मेडल मिळवत इतिहास घडवला आहे. नागपूरच्या ओजस देवतळे यानं आर्चरी मिक्स टीम कपांऊंड इव्हेंटमध्ये ही भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. ओजस जगातील तिरंदाजी क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला आंतरराष्ट्रीय तिरंदाज आहे.

ओजस देवतळेची 'सुवर्ण' कामगिरी, जिंकलं तिसरं 'गोल्ड मेडल'

सुवर्ण पदकाची हॅटट्रीक : ओजस देवतळेनं आशियाई गेम्समध्ये सुवर्ण पदकाची हॅटट्रीक साधल्यानं नागपूरच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला गेला आहे. ओजसनं आशियाई गेम्समध्ये तीन सुवर्ण पदकाची कमाई करत हॅटट्रीक केली आहे. त्यामुळे नागपूरकरांनी शहरात मोठा जल्लोष साजरा केला आहे. ओजस देवतळेनं सुवर्ण पदक जिंकून इतिहास रचला आहे. ओजस हा आशियाई गेम्समध्ये सुवर्णपदक जिंकणारा पहिलाच नागपूरकर ठरला आहे.

Asian Games 2023
ओजस देवतळेचं कुटुंब

गोल्ड मेडल जिंकणारा नागपूरचा एकमेव खेळाडू : आशियाई गेम्समध्ये नागपूरच्या ओजस देवतळेनं पुरुषांच्या वैयक्तिक कंपाऊंड या प्रकारातील अंतिम सामन्यात गोल्ड मेडल जिंकलं आहे. ओजसनं आशियाई गेम्समध्ये तीन गोल्ड मेडल मिळवत इतिहास घडवला आहे. ओजसनं आज सुवर्ण वेध घेताचं नागपुरात इतिहास घडला आहे. आशियाई क्रीडा स्पर्धेत मेडल जिंकणारा ओजस हा नागपूरचा एकमेव खेळाडू ठरला आहे. ओजसला गोल्ड मेडल मिळताचं त्याच्या कुटुंबीयांनी जोरदार जल्लोष करत आनंदोत्सव साजरा केला. फटाके फोडत व मिठाई वाटून ओजसच्या मित्रपरिवारानं सुद्धा जल्लोष केला आहे. ओजस यानं आर्चरी मिक्स टीम कपांऊंड इव्हेंटमध्येही भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं होतं. त्यानंतर ओजसनं आर्चरी मेन्स कंपाऊंड टीम इव्हेंटमध्ये सुद्धा भारताला सुवर्णपदक मिळवून दिलं आहे. ओजस जगातील अर्चरी क्रमवारीत अव्वलस्थानी असलेला आंतरराष्ट्रीय तिरंदाज आहे.

हेही वाचा :

Asian Games 2023
ओजस देवतळेचं कुटुंब
  1. Asian Game 2023 : आशियाई गेम्समध्ये भारताला सुवर्णपदक, उपमुख्यमंत्र्यांनी साधला 'चँपियन'च्या आई-वडिलांशी संवाद
  2. Asian Games २०२३ : आशियाई गेम्समध्ये भारताला सुवर्णपदक, उपमुख्यमंत्र्यांनी साधला 'चँपियन'च्या आई-वडिलांशी संवाद
Last Updated :Oct 7, 2023, 11:56 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.