ETV Bharat / state

Match Betting : पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलँड सामन्यावर सट्टा लावणाऱ्या आरोपीला अटक

author img

By

Published : Nov 10, 2022, 1:34 PM IST

टी 20 वर्ल्डकपची पहिली सेमिफायनल मॅच पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलँड ( Semi Final Match Pakistan vs New Zealand ) या दोन संघात खेळण्यात आली. माहितीच्या आधारे लकडगंज परिसरातील नेहरू पुतळा भागातील एका ऑफिसमध्ये धाड टाकून एका सट्टेबाजाला अटक ( Bookie arrested ) केली आहे.

Accused of betting arrested
सट्टा लावणाऱ्या आरोपीला अटक

नागपूर : टी 20 वर्ल्डकपची पहिली सेमिफायनल मॅच पाकिस्तान विरुद्ध न्यूझीलँड ( Semi Final Match Pakistan vs New Zealand ) या दोन संघात खेळण्यात आली. या सामन्यावर सट्टा लावला जात असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या झोन क्रमांक 3च्या पथकाला समजली होती. त्या माहितीच्या आधारे लकडगंज परिसरातील नेहरू पुतळा भागातील एका ऑफिसमध्ये धाड टाकून एका सट्टेबाजाला अटक ( Bookie arrested ) केली आहे.

न्यूझीलँड विरुद्ध पाकिस्तान मॅच वर बेटिंग सुरू : गुन्हे शाखेच्या युनिट क्रमांक तीनचे प्रभारी जितेश आरवेल्ली यांना गुप्तबातमीदारांमार्फत माहिती मिळाली की पोलीस स्टेशन लकडगंज येथील इतवारी, नेहरू पुतळा, नागपूर येथील आर.पी ट्रेंड्स येथे न्यूझीलँड विरुद्ध पाकिस्तान मॅच वर बेटिंग सुरू आहे. माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त गजानन राजमाने यांच्या निर्देशानुसार सहाय्य पोलीस आयुक्त लकडगंज सचिन थोरबोलेच्या नेतृत्वात धाड टाकण्यात आली असता प्रकाश टोपणदास क्रीशणानी हे बेटिंग करताना आढळून आले.


5 लाखांची बेटिंग : गुन्हे शाखेच्या युनिट तीनने धाड कारवाई केली तेव्हा सट्टेबाज प्रकाश टोपणदास क्रीशणानी हे बेटिंग करताना आढळून आले. लोटसबुक 24. 7 या साईटवर बेटिंग सुरू होती. पोलिसांच्या सुरवातीच्या तपासात 5 लाख रुपयांची बेटिंग सुरू होती अशी माहिती पुढे आली आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.