ETV Bharat / state

नागपूरमध्ये दिवसभरात १,९६६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद; १२२९ जणांना डिस्चार्ज

author img

By

Published : Sep 4, 2020, 9:03 PM IST

नागपूरमध्ये दिवसभरात १९६६ रुग्णांची नोंद झाल्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३६, ३९८ इतकी झाली आहे. १९६६ रुग्णांपैकी २०९ रुग्ण नागपूर ग्रामीण भागातील आहेत तर १,७५६ रुग्ण हे शहराच्या विविध परिसरातील आहेत.संप्टेंबर महिन्यातील पहिल्या ४ दिवसात ६,८४३ रुग्णांची नोंद झाली आहे. दिवसभरात १२२८ जण कोरोनामुक्त झाले आहेत.

nagpur corona update
नागपूर कोरोना अपडेट

नागपूर- जिल्ह्यात दिवसभरात कोरोनाच्या १९६६ रुग्णांची नोंद झाली आहे.नागपूरमध्ये कोरोनाचा धोका वाढतोय हे पुन्हा अधोरेखित झाले आहे. सलग चौथ्या दिवशी नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ नोंदवण्यात आली आहे. सप्टेंबर महिन्याच्या केवळ चारच दिवसांमध्ये नागपुरात ६८४३ रुग्णांची नोंद झाली आहे तर १७१ रुग्णांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.

उपराजधानी नागपुरात कोरोना रुग्णांच्या संख्येत प्रचंड मोठी वाढ होत असल्याने कोरोना प्रसार रोखण्यासाठी मुंबई पॅटर्न राबवण्याची तयारी केली जात आहे. मात्र, ही प्रक्रिया सुरू होताच नागपूरमध्ये पुन्हा एकदा कोरोनाचा उद्रेक झाल्याचे आकडे समोर आले. अवघ्या २४ तासात नागपूर शहर आणि जिल्ह्यात तब्बल १९६६ रुग्णांची नोंद झाली आहे.

सप्टेंबर महिना सुरू झाल्यापासून नागपूरमध्ये कोरोना रुग्णांची संख्या वेगाने वाढत आहे. सलग तिसऱ्या दिवशीही उपराजधानी जिल्ह्यात कोरोना रुग्णांच्या संख्येचा उद्रेक झाल्याचे स्पष्ट झाले आहेत. दिवसभरात १९६६ रुग्णांची नोंद झाली आहे, त्यामुळे जिल्ह्यातील एकूण रुग्णसंख्या ३६३९८ इतकी झाली आहे. १९६६ रुग्णांपैकी २०९ रुग्ण नागपूर ग्रामीण भागातील आहेत तर १७५६ रुग्ण हे शहराच्या विविध परिसरातील आहेत.

आज १२२८ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे नागपुरात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची एकूण संख्या २४११० इतकी झाली आहे. आज ३९ रुग्णांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला आहे. कोरोनामुळे नागपुरात मृत्युमुखी पडलेल्या रुग्णांची एकूण संख्या १२१६ इतकी झाली आहे. सध्या नागपूरमध्ये रुग्ण कोरोनामुक्त होण्याचे प्रमाण ६६.२६ टक्के इतके आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.